मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला)

समुद्र किनाऱ्यावरील किल्ले मुंबई डोंगररांग नाही
🏔️
श्रेणी नुसार स्तर
सोपी
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
0
🏰
किल्ल्याचा प्रकार
समुद्र किनाऱ्यावरील किल्ले
📍
जिल्हा
मुंबई

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Madh Fort (Versova Fort)

Madh Fort (Versova Fort)

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

मुंबईच्या उत्तरेकडील मढ आयलंड येथील छोट्या टेकडीवर ‘मढचा किल्ला‘ वसलेला आहे. वर्सोवा गाव व मढ बेट यांच्यामध्ये असलेल्या खाडीच्या मुखावर इ.स १६०० मध्ये पोर्तूगिजांनी हा किल्ला बांधला. या किल्ल्याचा उपयोग मार्वे खाडीवर नजर ठेवण्यासाठी व तुरुंग म्हणून केला गेला.

महत्त्वाची ठिकाणे

मुंबईत आजमितीस असणार्‍या सर्व किल्ल्यांमध्ये हा किल्ला सुस्थितीत आहे. किल्ल्याची संपूर्ण तटबंदी व बुरुज शाबूत आहेत. हा किल्ला ३ बाजूंनी जमिनीने वेढलेला असून एका बाजूस अरबी समुद्र आहे. किल्ला भारतीय सशस्त्र दलाच्या ताब्यात असल्यामुळे किल्ल्यात जाता येत नाही; परंतु किल्ला बाहेरच्या बाजूने पहाता येतो. किल्ल्याच्या तट व बुरुजांमध्ये वेगवेगळ्या पातळ्यांवर जंग्यांची रचना करण्यात आलेली आहे. किल्ल्याच्या अरबी समुद्राकडील बाजूस असणारा ‘‘चोर दरवाजा‘‘ सध्या दगडांनी बंद केलेला आहे. तसेच मुख्य प्रवेशद्वार बंद करुन बुरुजातून किल्ल्यात जाण्यासाठी पायर्‍या बनवलेल्या आहेत.

कसे पोहोचावे

मालाड पश्चिमेहून सुटणार्‍या बेस्टच्या २७१ क्रमांकाच्या बसने १५ किमी वरील वर्सोवा किल्ल्यावर जाता येते. बसच्या शेवटच्या थांब्यावर उतरुन किल्लेश्वर महादेव मंदिराकडे चालत गेल्यास, आपण किल्ल्याच्या मागच्या बाजूस पोहचतो. महादेव मंदिराच्या मागच्या बाजूने एक पायवाट किल्ल्याच्या तटबंदीजवळ जाते. ह्या पायवाटेने तटबंदी व बुरुजांच्या कडेने आपण किल्ल्याला बाहेरुन फेरी मारु शकतो. किल्ला सशस्त्र दलाच्या ताब्यात असल्यामुळे परवानगी शिवाय किल्ला आतून पहाता येत नाही, तसेच छायाचित्रणास मनाई आहे.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ N/A

सुविधा व सोयी

सर्वोत्तम काळ

🌤️ N/A

जवळील गावे

वर्सोवा, मालाड

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.