माढा गढी/किल्ला
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Madha Fort
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
सोलापूर जिल्हा हा तिथे असलेले मजबूत भुईकोट किल्ले/गढी यांसाठी ओळखला जातो. इतिहासातील अनेक नामवंत सरदार पदाधिकारी यांच्या गढया जिल्ह्यात सर्वत्र पहावयास मिळतात. त्यांचे अवशेष काही प्रमाणात आजही त्यांच्या ऐतिहासिक पणाची साक्ष देत आहेत.
कसे पोहोचावे
सोलापूर ते माढा ६५ किलोमीटर अंतर आहे. पुणे सोलापूर महामार्गावरील टेंभुर्णी या गावापासून माढा हे ठिकाण ३५ किलोमीटर अंतरावर आहे. कुर्डूवाडी हे जवळचे रेल्वे स्थानक माढ्यापासून १२ किलोमीटर अंतरावर आहे.
महत्त्वाची ठिकाणे
सोलापूर जिल्ह्यातील एक महत्वाचे तालुक्याचे ठिकाण म्हणजे माढा होय. माढा गावातच मध्यवर्ती ठिकाणी रावरंभा निंबाळकर यांनी बांधलेला एक गढीवजा किल्ला आहे. गढीचे प्रवेश द्वार आणि तटबंदी सुस्थितीत आहे. नगरपालिकेने प्रवेशद्वाराच्या दुतर्फा शोभिवंत वृक्षांची लागवड केलेली आहे. गढीला चार बाजूंना चार गोलाकार बुरूज आहेत. गढी मध्ये प्रवेश केल्यावर उजवीकडे वळून पायर्यांच्या द्वारे तटबंदीवर तसेच बुरुजावर जाता येते. बुरुजांवर तोफा ठेवण्यासाठी केलेला मोठा उंचवटा स्पष्टपणे दिसून येतो. बऱ्याच ठिकाणी अंतर्गत बाजूने तटबंदीची पडझड झाल्याने गढीला पूर्ण फेरी तटबंदीवरून मारता येत नाही. गढीच्या मध्यभागी एका जुन्या मोठ्या बारवेचे दर्शन होते. परंतु सर्वत्र वाढलेल्या झाडाझुडपांनी या बारवेची रचना नीट लक्षात येत नाही. तटबंदीच्या खालील बाजूस काही खोल्यांची रचना केलेली दिसून येते. तसेच एक अर्धा तुटलेला रांजण जमिनीत गाडला गेलेला आहे. गढीच्या बाहेरील बाजूस सध्या शाळेची इमारत आहे. काही वर्षांपूर्वी ही शाळा गढीमध्ये भरत असे. शाळेच्या आवारातच अजून एक विहीर अथवा बारव दिसून येते. ती बऱ्याच प्रमाणात बुजलेली आहे. पूर्ण गढी पाहण्यासाठी अर्धा ते पाऊण तास पुरेसा आहे.
गढी पासून काही अंतरावरच ग्रामदैवत माढेश्वरी देवीचे जुने मंदिर पाहण्यासारखे आहे. करमाळ्याच्या कमळाई देवी मंदिरा सारखीच रचना या मंदिराची आहे. पंचायतन प्रकारातील हे मंदिर प्रशस्त असून सहसा महाराष्ट्रातील मंदिरांमध्ये न दिसणारी गोपूर रचना येथे दिसून येते. प्रवेश द्वाराच्या उजवीकडे जमिनीत बसवलेली चार बाजूंनी कोरलेली वीरगळ सुस्थितीत आहे.
सुविधा व सोयी
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा