मार्मागोवा किल्ला

गिरीदुर्ग गोवा डोंगररांग नाही
🏔️
श्रेणी नुसार स्तर
सोपी
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
200
🏰
किल्ल्याचा प्रकार
गिरीदुर्ग
📍
जिल्हा
गोवा

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Mormugao Fort

Mormugao Fort

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

दक्षिण गोव्यात असलेल्या दाबोली विमानतळा पासून ८ किलोमीटर अंतरावर असलेल्या मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या (Mormugao Port Authority ) आवारात मार्मागोवा किल्ला आहे.

ऐतिहासिक पार्श्वभूमी

पोर्तुगीजानी इसविसन १६२४ मध्ये मार्मागोवा बंदराचे रक्षण करण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती केली होती. या किल्ल्या जवळ असलेल्या वास्को द गामा ही पोर्तुगीजांची पहिली राजधानी होती. १७०३ मध्ये पोर्तुगीज व्हॉइसराय मध्ये किल्ल्यातून गावात स्थलांतर केले होते. मार्मागोवा बंदरावर मराठ्यांचे हल्ले होत असल्याने पुढील काळात पोर्तुगीजांनी त्यांची राजधानी ओल्ड गोव्यात हालवली.

महत्त्वाची ठिकाणे

मुरगाव बंदर प्राधिकरणाच्या आवारात शिरल्यावर पार्कींग पर्यंत चालत जाण्यासाठी २ मिनिटे लागतात. या पार्कींगच्या समोरच एक सिमेंट मध्ये बांधलेली छोटी पायवाट आहे. या पायवाटेने किल्ल्याकडे जातांना डाव्या बाजूला विहिर आहे. पुढे चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या तटबंदी जवळ पोहोचलो. या तटबंदीत एक बुरुज आहे. त्या बुरुजा मागे किल्ल्याचे प्रवेशव्दार आहे. त्याचे रक्षण करण्यासाठी त्याच्या समोर बुरुजाची रचना करण्यात आलेली आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या बाजूला एक चर्च आहे , तर डाव्या बाजूला एक क्रॉस आहे. चर्च जवळून किल्ल्याच्या फ़ांजीवर जाण्यासाठी जिना आहे. फ़ांजी वरुन तटबंदीच्या बाजूने पुढे चालत गेल्यावर टोकावर एक बुरुज आहे. या बुरुजा वरुन समुद्र आणि बंदर दृष्टीक्षेपात येते. समुद्राला लागून असलेल्या डोंगरावर हा किल्ला मोक्याच्या जागी बांधलेला आहे.

बुरुज पाहून परत पायर्‍या उतरुन चर्चपाशी आल्यावर खाली उतणार्‍या पायर्‍या उतरुन गेल्यावर उजव्या बाजूच्या तटबंदीत एक अर्धगोलाकार छत असलेली वास्तू आहे. किल्ल्याच्या खालच्या भागात तटबंदीचे अवशेष आहेत. समुद्राच्या बाजूने किल्ला संरक्षित करण्यासाठी या ठिकाणी दोन टप्प्यात तटबंदी आणि बुरुज बांधलेले असावेत. या तटबंदीच्या खालच्या बाजूला पूर्वीच्या काळी समुद्राला लागूनही तटबंदी आणि आणि बुरुज असावेत. आज या ठिकाणी बंदर असल्याने ते नष्ट झाले असावेत . हे पाहून किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते.

किल्ला पाहायला अर्धा तास लागतो.

कसे पोहोचावे

मार्मागोवा किल्ला गोव्यातील मडगाव पासून ३३ किलोमीटर अंतरावर आहे आणि दाबोली विमानतळा पासून ८ किलोमीटर अंतरावर आहे.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ N/A

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

सर्वोत्तम काळ

🌤️ वर्षभर

जवळील गावे

Wasco

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.