मोटी दमण किल्ला

समुद्र किनाऱ्यावरील किल्ले दमण डोंगररांग नाही
🏔️
श्रेणी नुसार स्तर
सोपी
📏
समुद्र सपाटीपासून उंची (फ़ूट)
0
🏰
किल्ल्याचा प्रकार
समुद्र किनाऱ्यावरील किल्ले
📍
जिल्हा
दमण

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Moti Daman Fort

Moti Daman Fort

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत

सर्व नकाशांचा संग्रह पहा

प्रस्तावना

दमणगंगा नदीच्या दक्षिण तीरावर मोटी दमण किल्ला आहे. नानी दमण आणि मोटी दमन या दोन किल्ल्यामध्ये मोटी दमण किल्ला आकाराने मोठा आहे. सोळाव्या शतकात पोर्तुगिजांनी हा किल्ला बांधला. भारत स्वतंत्र झाल्यावर इसवीसन १९६१ मध्ये हा किल्ला भारताच्या ताब्यात आला.नानी दमण किल्ला आणि मोटी दमण किल्ला दमणगंगा नदीच्या उत्तर आणि दक्षिण तीरावर समोरासमोर आहेत.

महत्त्वाची ठिकाणे

सध्या या किल्ल्यात दमण मधली सर्व सरकारी ऑफ़ीसेस आहेत. किल्ल्यात एक लाईट हाऊस आहे. किल्ल्याची प्रवेशव्दारे, तटबंदी, बुरुज आणि किल्ल्याच्या बाहेरील खंदक सुस्थितीत ठेवण्यात आलेला आहे. किल्ल्याला पोर्तुगिज शैलीतील १० पंचकोनी बुरुज आहेत. बुरुजांवर आणि तटबंदीवर पोर्तुगिज बांधणीची खासियत असलेले कॅप्सुल बुरुज आहेत. किल्ल्याला उतरेला आणि दक्षिणेला अशी दोन प्रवेशव्दारे आहेत. प्रवेशव्दारांवर शिलालेख आणि कोट ऑफ़ आर्म कोरलेले आहेत. किल्ल्यात बॉम जिजस चर्च नावाचे चर्च आहे या चर्च मधील लाकडावर केलेले कोरीवकाम पाहाण्यासारखे आहे. मोटी दमण किल्ल्याच्या समोरील किनार्‍यावर नानी दमण किल्ला आहे. मोटी दमण किल्ल्यातून बाहेर पडून दमणगंगा नदीवरील पूल ओलांडून नानी दमण किल्ल्यात जाता येते.

कसे पोहोचावे

वापी ते दमण १२ किलोमीटर अंतर आहे. वापीहून बस, रिक्षा आणि खाजगी वहानाने दमणला जाता येते.

ट्रेकसाठी लागणारा वेळ

⏱️ N/A

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

सर्वोत्तम काळ

🌤️ जुलै ते मार्च

जवळील गावे

दमण

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा

किल्ले स्वच्छ ठेवा

किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.