नागलाबंदर किल्ला
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Nagla bunder Fort
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
प्राचीन काळी कल्याण हे महत्वाचे बंदर होते. अरबी समुद्रातून उल्हासखाडी मार्गे जहाजांची ये-जा चालत असे. ह्याच जलमार्गावर घोडबंदर, नागलाबंदर ही प्राचीन बंदरे होती. ह्या बंदरांचे व जलमार्गाचे रक्षण करण्यासाठी घोडबंदर, गोमुख व नागलाबंदर हे तीन किल्ले बांधले गेले.
नागला बंदर किल्ला परिसर ही खाजगी मालमत्ता असल्याने पूर्व परवानगी शिवाय किल्ला परिसरात जाता येत नाही.
महत्त्वाची ठिकाणे
ठाणे - बोरीवली रस्त्यावर नागलाबंदर थांब्यावर उतरुन नागलाबंदर गावात चालत जाण्यास १० मिनीटे लागतात. नागलाबंदर गावात खाडी शेजारी असलेल्या छोट्या टेकडीवर नागलाबंदर किल्ल्याचे काही अवशेष काळाशी झुंजत उभे आहेत. ह्या टेकडीशेजारी असलेल्या दगडांच्या खाणीमुळे आणि अतोनात वाढलेल्या झुडुपांमुळे किल्ल्याच्या अवशेषांची पार रया गेलेली आहे व हे मुळ अवशेष कशाचे आहेत हे ओळखणे देखिल कठीण झाले आहे. ह्या अवशेषांची योग्यवेळी निगा न राखल्यास गोमुखकिल्ला व धारावी किल्ल्याप्रमाणे नागलाबंदर किल्लाही काळाच्या उदरात नष्ट होईल.
गोमुख किल्ला: नागला बंदर किल्ल्यापासून ४ किमी अंतरावर उल्हासखाडी एक झोकदार वळण घेते. ह्याच ठिकाणी सह्याद्रीची एक सोंड खाडीजवळ उतरते. ह्याच सोंडेवर गढीवजा गोमुख किल्ला उभा होता. आज ह्या जागी किल्ल्याचे कोणतेही अवशेष नाहीत. ठाणे - बोरीवली रस्त्यावर गोमुख गावात उतरुन ह्या ठिकाणी जाता येते. आज जरी किल्ला अस्तित्वात नसला तरी त्याचे नेमके भौगोलिक स्थान व उल्हासखाडीवर पहारा देण्याची मोक्याची जागा पाहाता येते.
कसे पोहोचावे
ठाणे - बोरीवली रस्त्यावर नागलाबंदर थांब्यावर उतरुन नागलाबंदर गावात चालत जाण्यास १० मिनीटे लागतात. नागलाबंदर गावात खाडी शेजारी असलेल्या छोट्या टेकडीवर नागलाबंदर किल्ल्याचे काही अवशेष काळाशी झुंजत उभे आहेत.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
अतिरिक्त माहिती
नागला बंदर किल्ला परिसर ही खाजगी मालमत्ता असल्याने पूर्व परवानगी शिवाय किल्ला परिसरात जाता येत नाही.
जवळील गावे
नागलाबंदर
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.