नांदोशी गढी
प्रस्तावना
सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील नांदोशी गावात एका गढीचे अवशेष आहेत. गावकरी या गढीला गोसाव्याची गढी म्हणून ओळखतात. ही गढी सातारा गादीने देवस्थानाला दान केली होती. नांदोशी पासून १० किलोमीटर अंतरावर साप नावाचे गाव आहे. त्या गावात सुस्थितीतील गढी पाहायला मिळते.
महत्त्वाची ठिकाणे
नांदोशी गावात असलेली ही गढी काळाशी आणि गावकर्यांशी झुंज देत आज कशी बशी उभी आहे. या गढीला ६ बुरुज होते त्यापैकी ३ बुरुज शाबुत आहेत. त्यापैकी एक बुरुज षटकोनी आकाराचा असून वीटांनी बांधलेला आहे. गढीला वीटांमध्ये बांधलेली दोन प्रवेशव्दारे होती. आज दोन्ही प्रवेशव्दारे नष्ट झालेली आहेत. गढी दोन भागात विभागलेली आहे. त्यातील बाहेरील भागाची तटबंदी ढासळलेली असून या भागातील प्रवेशव्दार आणि देवड्यांचे अवशेष पाहायला मिळतात. गढीच्या मागच्या बाजूला गेल्यावर दोन भव्य बुरुज आणि तटबंदी पाहायला मिळते. . गढीची तटबंदी साधारणपणे २० फ़ूटापर्यंत काळ्या दगडात बांधलेली आहे. त्यावरील भाग वीटांनी बांधलेला आहे. शत्रूवर मारा करण्यासाठी तटबंदीत जंग्या आणि झरोके ठेवलेले आहेत. याभागात असलेल्या उध्वस्त तटबंदीतून गढीत प्रवेश केल्यावर आपण थेट फ़ांजीवर पोहोचतो. गढीत काटेरी झाड झुडप इतक्या मोठ्याप्रमाणावर वाढलेली आहेत की ती चुकवत गढीतून फ़िरावे लागते. आत मध्ये एक दगडी ढोणी सोडल्यास कुठलेही अवशेष आढळले नाहीत. गावातील घरांसाठी गढीचा दगड आणि विटा वापरलेल्या दिसतात पण गढीची निगा राखण्यात गावकर्यांना स्वारस्य नाही. त्यामुळे काही वर्षातच गढी नामशेष होईल.
कसे पोहोचावे
सातारा ते रहिमतपूर हे अंतर २४ किलोमीटर आहे. रहिमतपूर गावापासून नांदोशी गाव १० किलोमीटर अंतरावर आहे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गढीत राहाण्याची सोय नाही. रहिमतपूर आणि सातारा येथे हॉटेल्स आहेत.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय रहिमतपूर येथे होऊ शकते.
पाणी उपलब्धता
गढीमध्ये पिण्यासाठी पाणी नाही. गावात पिण्याचे पाणी आहे.
सर्वोत्तम काळ
🌤️ वर्षभर
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.