नस्तनपूरची गढी
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
नाशिक चाळीसगाव रस्त्यावर नस्तनपूर गावात "खोजाचा किल्ला" या नावाने ओळखली जाणारी नस्तनपूरची गढी आहे. नस्तनपूर गाव सध्या शनी मंदिरासाठी प्रसिध्द आहे. या मंदिराजवळ महामर्गाला लागून गढी आहे.
कसे पोहोचावे
नाशिक - चांदवड - नांदगाव मार्गे नस्तनपूरची गढी १२८ किलोमीटरवर आहे. नस्तनपूरची गढी पासून जवळचे रेल्वे स्टेशन नांदगाव १५ किलोमीटर अंतरावर आहे. तर चाळीसगाव २८ किलोमीटर अंतरावर आहे.
महत्त्वाची ठिकाणे
नाशिक चाळीसगाव रस्त्यावरुन गढीकडे जातांना एका झाडाखाली "रावणानुग्रह" मुर्ती आणि तोफ़गोळे पडलेले आहेत. गढीच्या प्रवेशव्दारावर थेट मारा करता येऊ नये यासाठी त्याच्या समोर भिंत बांधलेली आहे. भिंतीच्या बाजूने पुढे गेल्यावर उत्तराभिमुख प्रवेशव्दारातून आपला गढीत प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य बुरुज आहेत. बुरुज दगडांनी बांधलेले असून वरचा भाग वीटांनी बांधलेला आहे, त्यात जागोजागी जंग्या काढलेल्या आहेत . गढीत पायर्या असलेली गोल विहिर आहे , या विहिरीच्या बाजूच्या बुरुजात हवा महाल बांधलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गारवा मिळण्यासाठी अशाप्रकारे पाण्या जवळ खोल्या बांधलेल्या असतात. याशिवाय गढीत चौकोनी विहिर असून त्यालगत हमाम खान्याचे अवशेष आहेत. त्यामागे कमानी असलेली वास्तू आहे . गढीत पाण्याचे तीन हौद पाहायला मिळतात. गढील एकूण ११ बुरुज असून तटबंदी कोसळलेली आहे. गढीत काही वास्तूंचे चौथरेही पाहायला मिळतात. गढीच्या बाहेरच्या बाजूला तटबंदीत गणपती मंदिर आहे.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडावर राहाण्याची सोय नाही
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय नाशिक - चाळिसगाव महामार्गावर आहे.
पाणी उपलब्धता
गडावर पाण्याची सोय नाही
जवळील गावे
Nastanpur
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा