पिलीवचा किल्ला
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Piliv Fort
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
पंढरपूर रस्त्यावर सोलापूर जिल्ह्यात पिलीव नावाचे एक गाव आहे. गावाच्या मागील टेकडीवर पिलीवचा किल्ला आहे. किल्ल्याचा एकंदरीत आकार पाहाता ही गढी असावी. किल्ला सुस्थितीत असून आतमध्ये वस्ती आहे.
![]() |
| Pilivcha Killa (Piliv Fort) |
कसे पोहोचावे
सातारा - पंढरपूर मार्गावर सातार्यापासून १०६ किमी व पंढरपूर पासून ४० किमी वर पिलीव गाव आहे. तर दहिवडी पासून पिलीव ४८ किमी वर आहे. पिलीव गावातील सुभाष चौकातून डाव्या हाताचा रस्ता एका टेकडीवर जातो. या टेकडीवरच पिलीवचा किल्ला आहे.
महत्त्वाची ठिकाणे
किल्ल्याच्या चारही टोकाला भव्य बुरुज आहेत. बुरुजांवर व तटबंदीवर जागोजागी जंग्या आहेत. किल्ल्याच्या प्रवेशद्वारातून आत प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूस पहारेकर्यांसाठी असणार्या देवड्या पाहायला मिळतात. प्रवेशद्वारासमोरच एक पडझड झालेली वास्तू आहे. या वास्तूच्या दरवाजातून आत शिरुन उजव्या हाताला गेल्यास बुरुजाखाली बनवलेली एक मोठी खोली पाहायला मिळते. या खोलीला दोन झरोके आहेत. बुरुजाखालील या खोलीत बसून टेहाळणी केली जात असावी. सध्या वटवाघळांची वस्ती या खोलीत आहे. हा बुरुज पाहून पुन्हा प्रवेशद्वारापर्यंत येऊन डाव्या हाताला थोडेसे चालत गेल्यावर तटबंदीवर जाणारा जीना लागतो. या जीन्याने फांजीवर आल्यावर बुरुजावर जाता येते. चारबाजूच्या चार भव्य बुरुजांवर जाण्यासाठी अरुंद दरवाजा आहे. या दरवाजातून पायर्या चढून बुरुजावर जाता येते. या बुरुजाचा घेर १२ मीटर आहे. बुरुजावरील ५ फुट उंचींच्या तटबंदीत जागोजागी जंग्या व तोफांसाठी झरोके केलेले आहेत. बुरुजाच्या दुसर्या बाजूला फांजीवर उतरण्यासाठी अरुंद दरवाजा व जीना आहे. मधल्या बुरुजावर एक छोटी ४ फुटी तोफ आहे. किल्ल्यात वस्ती असल्यामुळे बाकीचे जुने अवशेष आता नामशेष झाले असावेत.
सुविधा व सोयी
जवळील गावे
Piliv
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
