रोहीडा

गिरीदुर्ग पुणे महाबळेश्वर
🏔️
अवघडीनुसार स्तर
मध्यम
📏
समुद्रसपाटीपासून उंची
3660
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
बाजारवाडी मार्गे �
🌤️
सर्वोत्तम काळ
N/A

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Rohida

Rohida

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

Fort

Fort

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

सह्याद्रीच्या डोंगररांगेत भोर ते महाबळेश्वर असा एक सुरेख डोंगरमार्ग आहे. या डोंगररांगेत तीन ते चार किल्ले आहेत. यापैकी रोहीड खोर्‍यात वसलेला किल्ला म्हणजेच ‘किल्ले रोहीडा’. रोहीड खोरे हे नीरा नदीच्या खोर्‍यात वसलेले आहे. या खोर्‍यात ४२ गावे होती. त्यापैकी ४१ गावे सध्याच्या पुणे जिल्ह्याच्या भोर तालुक्यात मोडतात. रोहीडा किल्ला हे रोहीड खोर्‍याचे प्रमुख ठिकाण होते. पुणे,सातारा जिल्ह्यातील सहकारी साखर कारखाने, सहकारी दूधयोजना यामुळे येथील परिसरातील बहुतेक सर्व गावापर्यंत बस, वीज आदी सुविधा पोहोचल्या आहेत. त्यामुळे येथील जीवन सुखी झालेले आहे. रोहीडा किल्ला भोरच्या दक्षिणेस सुमारे ६ मैलांवर आहे. रोहीडा किल्ल्याला ‘विचित्रगड‘ किंवा ‘बिनीचा किल्ला‘ असे देखील संबोधले जाते.


Rohida Fort

ऐतिहासिक पार्श्वभूमी

या किल्ल्याची निर्मिती ही यादवकालीन आहे. या किल्ल्यावरील तीसर्‍या दरवाजावर असणार्‍या शिलालेखावरून मुहम्मद आदिलशहाने ह्या गडाची दुरुस्ती केली असे अनुमान निघते. या शिलालेखावरून मे १६५६ नंतर हा किल्ला शिवाजी महाराजांनी बांदल देशमुखांकडून घेतला असे समजते. किल्ला घेण्यासाठी राजांना बांदल देशमुखांशी हातघाईची लढाई करावी लागली. यात कृष्णाजी बांदल मारला गेला. बाजीप्रभू देशपांडे बांदलाचे मुख्य कारभारी होते. लढाईनंतर बाजीप्रभू देशपांडे व इतर सहकार्‍यांना स्वराज्यात सामील करून घेतले गेले. इ.स. १६६६ च्या पुरंदरच्या तहानुसार हा किल्ला मोघलांच्या स्वाधीन केला गेला. २४ जून १६७० रोजी शिवरायांनी किल्ला परत घेतला. कान्होजी यांच्याकडे भोरची पूर्ण तर रोहीडा किल्ल्याची निम्मी देशमुखी व जमिनीचे काही तुकडे इनाम होते. रोहीड्याचे गडकरी त्यांचेकडून ३० होन घेत होते. शिवाजी महाराजांच्या अधिकार्‍यांनी शिवाजी महाराजांकडे विचारणा केली की ३० च होन का, शिवाजी महाराजांनी निर्णय दिला की, जेधे आपले चाकर असल्यामुळे पूर्वापार चालत आलेले द्रव्यच घ्यावे. पुढे किल्ला मोघलांनी जिंकला, मात्र भोरच्या पंत सचिवांनी औरंगजेबाशी झुंजून किल्ला स्वराज्यात पुन्हा दाखल केला. संस्थाने विलीन होईपर्यंत राजगड, तोरणा, तुंग आणि तिकोना किल्ल्याप्रमाणे हा ही किल्ला भोरकरांकडे होता.

कसे पोहोचावे

१) बाजारवाडी मार्गे :-
भोरच्या दक्षिणेस ८ - १० किमी अंतरावर बाजारवाडी नावाचे गाव आहे. बाजारवाडीपर्यंत जाण्यासाठी एसटी सेवा उपलब्ध आहे. बाजारवाडीच्या शाळे मागून ठळक पायवाटेने आपण पाऊण ते एक तासात गडाच्या पहिल्या दरवाजापाशी पोहोचतो.


२) अंबवडे मार्गे :-
भोर ते अंबवडे अशी एसटी सेवा उपलब्ध आहे. पूणे - भोर - पानवळ - अंबवडे अशी बससेवा देखील उपलब्ध आहे. या गाडीने अंबवडे गावी उतरून गावाच्या पूर्वेकडील दांडावरून गड चढण्यास सुरुवात करावी. ही वाट लांबची आणि निसरडी आहे. या वाटेने गड गाठण्यास सुमारे अडीच तास लागतात. शक्यतो गडावर जाताना बाजारवाडी मार्गे जावे आणि उतरताना नाझरे किंवा अंबवडे मार्गे उतरावे. म्हणजे रायरेश्वराकडे जाण्यास सोपे जाते.

३) रोहीडा ते रायरेश्वर वाटा :-
१) भोर - कारी बसने कारी गावात उतरावे. तिथून लोहदरा मार्गे २ तासांत रायरेश्वर पठाराकडे पोहोचतो व पठारावरील वस्ती पर्यंत जाण्यास दीड तास लागतो.
२) वडतुंबी मार्गे दुपारची (२.४५) भोर - टिटेघर गाडी आंबवण्यास येते, तिने वडतुंबी फाट्यावर उतरावे. तिथून १५ मिनिटांत वडतुंबी गाव गाठणे. येथून साधारणत… २ तासात गणेशदरा मार्गे रायरेश्वर पठारावर पोहोचता येते.
३) भोर - कोर्ले गाडीने कोर्ले गावात उतरावे. रात्री उशीर झाल्यास गावात मुक्काम करून पहाटे गायदरा मार्गाने ३ तासात रायरेश्वर पठारावरील देवळात जाता येते.
४) भोर - दाबेकेघर बसने दाबेकेघरला उतरावे व तिथून धानवली पर्यंत चालत जावे. पुढे वाघदरामार्गे ३ तासात रायरेश्वर गाठता येते.

महत्त्वाची ठिकाणे

रोहीडा किल्ल्याच्या पहिल्या दरवाज्याच्या चौकटीवर गणेशपट्टी आणि वर मिहराब आहे. पुढे १५ ते २० पायर्‍या पार केल्यावर दुसरा दरवाजा लागतो येथून आत गेल्यावर समोरच पाण्याचे भुयारी टाके आहे याचे पाणी बाराही महिने पुरते येथून ५७ पायर्‍या चढून गेल्यावर तिसरा दरवाजा लागतो. हा दरवाजा अतिशय भक्कम आहे. यावर बर्‍याच प्रमाणात कोरीव काम आढळते. दोनही बाजूंस हत्तीचे शिर कोरण्यात आले आहे. तसेच डाव्या बाजूला मराठी व उजव्या बाजूला फारसी शिलालेख आहे. आजुबाजूच्या तटबंदीची पडझड झाली आहे.
येथून आत शिरल्यावर समोरच २ वास्तू दिसतात. एक गडावरील सदर असावी, तर दुसरे किल्लेदाराचे निवासस्थान असावे. डाव्या बाजूला थोडे अंतर चालून गेल्यावर ‘रोहिडमल्ल‘ उर्फ ‘भैराबाचे मंदिर‘ लागते. देवळात गणपती, भैरव व भैरवी यांच्या मूर्ती आहेत. मंदिरासमोर लहानसे टाके, दीपमाळ व चौकोनी थडगी आहेत. देवळा समोर तलाव आहे. तलावापासुन खाली बुरुजाच्या दिशेने उतरतांना बुरुजा जवळ सदरेचे अवशेष दिसतात. पुढे गेल्यावर एक पुष्कर्णी आहे. पुष्कर्णी पासून पुढे गेल्यावर एक बुरुज लागतो. या बुरुजा जवळ असलेल्या तटबंदीत चोर दरवाजा आहे. चोर दरवाजापासून पुढे दिसणार्‍या बुरुजापर्यंत चालत जातांना डाव्या बाजूला उध्वस्त वास्तूंचे अवशेष आहेत. पुढे किल्ल्याच्या उत्तर टोकावरचा फ़त्ते बुरुज आहे. फ़त्ते बुरुज पाहून सरळ चालत गेल्यावर पाण्याच्या टाक्यांची सलग रांग आहे. येथेच एक भूमिगत पाण्याचे टाके आहे. पाण्याच्या टाक्यांच्या पुढे चुन्याचा घाणा आहे. तेथून किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते. संपूर्ण गड फिरण्यास साधारणत: दीड तास लागतो. किल्ल्या असलेल्या बुरुजांना नावे दिलेली आहेत. आग्नेयेस शिरवले बुरूज, पश्चिमेस पाटणे बुरूज व दामगुडे बुरूज, उत्तरेस वाघजाईचा बुरूज व पूर्वेस फत्ते बुरूज व सदरेचा बुरूज असे एकूण ६ बुरूज आहेत. गडाची तटबंदी व बुरुजांचे बांधकाम अजूनही मजबूत आहे.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

रोहीडमल्लच्या मंदिरात ५ ते ७ जणांची राहण्याची सोय होते. पावसाळ्यात मात्र मंदिरात राहता येत नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

जेवणाची सोय आपण स्व:त…च करावी.

💧

पाणी उपलब्धता

गडावर पिण्याचे पाणी बारमाही उपलब्ध आहे.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

जवळील गावे

Bajarwadi

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा