तुंगी (कर्जत)

गिरीदुर्ग रायगड भीमाशंकर
🏔️
अवघडीनुसार स्तर
मध्यम
📏
समुद्रसपाटीपासून उंची
1100
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
डोंगरपाडा ते तुंगी
🌤️
सर्वोत्तम काळ
वर्षभर जाता येते. (पावसाळ्यात विषेश काळजी घ्यावी.)

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
Tungi (Karjat)

Tungi (Karjat)

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

Fort

Fort

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

कोकणातून (खांडस गावातून) भिमाशंकरला जाणार्‍या गणपती (गणेश) घाटावर तसेच पेठ (कोथळीगड) वरुन जाणार्‍या व्यापारी मार्गांवर लक्ष ठेवण्यासाठी भिमाशंकर डोंगररांगेत पदरगड आणि तुंगी हे दोन टेहळणीचे किल्ले होते.

कसे पोहोचावे

कर्जतहून २ मार्गांनी तुंगी किल्ल्यावर जाता येते. कर्जत रेल्वे स्टेशन जवळून खांडस, आणि डोंगरपाडा गावांसाठी एस. टी. आणि सहा आसनी टॅक्सी मिळतात.

१) डोंगरपाडा :- तुंगी गडावर जाण्याचा सोपा मार्ग डोंगरपाडा गावातून आहे. कर्जतहून खांडसकडे जातांना कशेळे गावाच्या पुढे ८ किलोमीटरवर आणी खांडसच्या अलिकडे ७ किलोमीटरवर डोंगरपाडा गावात जाणारा फ़ाटा आहे. पाड्याहून तुंगी गावा पर्यंत कच्चा रस्ता बनवलेला आहे. पण तो जागोजागी ढासळल्यामुळे कुठलेली वाहान या रस्त्यावरुन जात नाही. या रस्त्याने खडा चढ चढून १ तासात तुंगी गावात आपण पोहोचतो. तुंगी गावात तुंगी मातेचे मंदिर आहे. त्या मंदिरा मागून एक वाट तुंगी माथ्या कडे जाते. या वाटेने थोडे चढल्यावर दोन फ़ाटे फ़ुटतात. त्यापैकी डाव्या बाजूच्या वाटेने गडमाथ्यावर जाण्यास १५ ते २० मिनिटे लागतात.

२) खांडस:- खांडस हे भिमाशंकरच्या पायथ्याचे गाव, गावतून गणेश घाटातून भिमाशंकरला जाता येते. तसेच तुंगी किल्ल्यावर जाता येते. खांडस ते तुंगी गाव- १.५ तास. तुंगी गाव ते गडमाथ्यावर जाण्यास १५ ते २० मिनिटे लागतात.

महत्त्वाची ठिकाणे

तुंगी किल्ल्याच्या माचीवर तुंगी गाव वसलेले आहे. गावात तुंगी मातेचे मंदिर आहे. त्यात तुंगी मातेची मुर्ती आहे. मुर्ती जवळ एक वाघ देवाची मुर्ती आणि २ सर्प शिळा आहेत. मंदिराच्या समोरच्या बाजूला समाध्या पाहायला मिळतात. गावातील स्मशाना जवळ कातळात कोरलेल्या पाय‍र्‍या आहेत. तुंगी किल्ला हा टेहळणीचा किल्ला होता. किल्ल्याचा गडमाथा अतिशय छोटा आहे. त्यामुळे गडमाथ्यावर एक पाण्याचे टाक पाहायला मिळते. टाक्याकडे जातांना एका दगडात चौकोनी खळगे कोरुन काढलेले दिसतात. टेहळणीसाठी बसणार्‍या. सैनिकांसाठी निवारा उभारण्यासाठी हे चौकोनी खळगे बनवलेले असावेत.

तुंगी गावात येऊन रस्त्याने १० मिनिटे उतरल्यावर एक पायवाट खिंडीकडे जाते. या खिंडीतून एक वाट खाली उतरते. वाटेत कातळात कोरलेल्या पायर्‍या आहेत. पुढे कड्याच्या बाजूला एक पाण्याचे टाके आहे, पण वाट मोडल्यामुळे टाक्या जवळ जाता येत नाही. गावातून वाटाड्या घेतला तरच या टाक्य़ाकडे जाणारी वाट मिळू शकते.

गड माथ्यावरुन चिल्हार नदी, कोथळीगड (पेठचा किल्ला) पदरगड, आणि भीमाशंकर डोंगररांग दिसते.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

तुंगी गावातील मंदिरात आणि शाळेत ५ जणांची राहाण्याची सोय होऊ शकते.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी नाही.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा