वल्लभगड (हरगापूरचा किल्ला)
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Vallabhgad(Hargapur)
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
Fort
Fort
प्रस्तावना
कोल्हापूर - बेळगाव महामार्गावर संकेश्वर नंतर ३ किमी वर ‘वल्लभगड’ नावाचा एक फाटा आहे. या फाट्यावरून वल्लभगडाचे (हरगापूरगडाचे) दर्शन होते. महामार्गापासून डावीकडे वळल्यावर आपण थेट वल्लभगड गावातच पोहोचतो. गावातून पंधरा मिनिटांत गडावर जाता येते.
कसे पोहोचावे
कोल्हापूर - बेळगाव महामार्गावर संकेश्वरच्या अलीकडे ३ कि.मी वर ‘वल्लभगड’ नावाचा एक फाटा आहे. फाट्यावरून वल्लभगडाचे दर्शन होते. महामार्गा पासून डावीकडे वळल्यावर या फाट्यावरून दोन रस्ते फ़ुटतात. यापैकी कोणत्याही रस्त्याने गेल्यास हरगापूर (वल्लभगड) गावला वळसा घालूनच वल्लभगडावर जावे लागते. गावातून पंधरा मिनिटांत वल्लभगडावर जाता येते.
महत्त्वाची ठिकाणे
किल्ल्याच्या तटबंदीच्या बाहेर बुरुजाच्या बाजूला गावदेवी मरगुबाईचे मंदिर आहे. या मंदिरा पर्यंत पक्का रस्ता आहे. जीप सारखे वहान या मंदिरा पर्यंत येऊ शकते. मंदिराच्या मागून पायवाटेने चालत गेल्यावर आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. प्रवेशव्दार गोमुखी बांधणीचे आहे. दोन भव्य बुरुजांच्या आड प्रवेशव्दार लपवलेले आहे. मुख्य प्रवेशद्वाराची कमान उत्तम स्थितीत आहे. प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच मारुतीचे मंदिर आहे. मंदिराच्या मागे विहिरीत उतरणारी पायर्यांची भव्य वाट कोरुन काढलेली आहे. पायर्या उतरुन आत गेल्यावर दगडात कोरलेल्या कमानीतून आपला बोगद्यात प्रवेश होतो. पुढे थोड्या पायर्या उतरल्यावर वरुन प्रकाश येण्यासाठी झरोका ठेवला आहे तिथपर्यंत पोहोचतो. पुढे पहिली विहिर आहे. ही विहीर एका बोगद्याने दुसर्या मोठ्या विहिरीशी जोडलेली आहे. या दोन्ही विहीरी आणि भव्यता आणि खोली पाहाण्यासाठी आपल्याला पुन्हा पायर्या चढून वर यावे लागते. विहिरी पाहून पुढे चालायला सुरुवात केल्यावर डाव्या बाजूला मुख्य तटबंदीपासून सुटा असलेला बुरुज पाहायला मिळतो. हा बुरुज पूर्णपणे झाडीत झाकला गेला होता. वल्लभगडाचे संवर्धन करणार्या शिलेदारांनी त्याला मोकळा श्वास दिला. त्यामुळे आज हा बुरुज आपल्याला पाहायला मिळतो. अशा प्रकारचे दोन बुरुज या किल्ल्यावर आहेत. दुसरा बुरुज किल्ल्याच्या पूर्व टोकावर आहे. किल्ल्याच्या आतील आणि बाहेरील भागावर नजर ठेवण्यासाठी या सुट्या बुरुजांचा उपयोग होतो. फ़ांजीवरुन पुढे गेल्यावर तटबंदीतले दोन संडास पाहायला मिळतात. गडाच्या उत्तर टोकावर सुटा बुरुज आहे. तो पाहून माघारी फ़िरुन पूर्वेकडच्या तटबंदीच्या बाजुने पुढे गेल्यावर पेशवेकालिन शंकराचे मंदिर आहे. या मंदिराच्या जवळ तटबंदीतून खाली उतरणारी पायवाट आहे. या वाटेने खाली उतरल्यावर सिध्देश्वराची मोठी गुहा आहे. तिच्यात सिध्देश्वराचा मुखवटा आणि पादुका आहेत. गुहा पाहून परत गडावर येऊन पुढे गेल्यावर एक पाण्याचे टाके आहे. ते पूर्णपणे मातीने बुजलेले होते. त्यातील माती काढून ते पूर्णपणे मोकळे केलेले आहे.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्यावर रहाण्याची सोय नाही.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय आपण स्वत: करावी.
पाणी उपलब्धता
गडावर पाणी नाही.
जवळील गावे
"Vallabhgad,Hargapur (Karnatak)"
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा