मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

भगवंतगड (Bhagwantgad) किल्ल्याची ऊंची :  250
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: मालवण, सिंधुदुर्ग
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
मालवण तालुक्यातील कालावल खाडीच्या अल्याड - पल्याड दोन गड उभे आहेत, ते म्हणजे भगवंतगड आणि भरतगड. दिड एकरवर पसरलेला भगवंतगड गर्द झाडीने आच्छादलेला आहे. मालवणजवळ असलेली ही दुर्गजोडी आणि आजुबाजुला पसरलेले कोकणी निसर्ग सौंदर्य आवर्जून पहाण्यासारखे आहे.
11 Photos available for this fort
Bhagwantgad
इतिहास :
सावंतवाडीकर सावंत व कोल्हापूरकर छत्रपती यांच्यात वरचेवर लढाया होत असत. १७०१मध्ये सावंतांनी कालावल खाडीच्या दक्षिण काठावरील मसुरे गावात भरतगड किल्ला बांधला. त्याला शह देण्यासाठी पंतप्रतिनिधींनी कालावल खाडीच्या उत्तर काठावरील बांदीवडे गावा नजिकच्या टेकडीवर भगवंतगड किल्ला बांधला. पुढे हा किल्ला सावंतवाडीकरांच्या ताब्यात गेला. १७४८ साली तुळाजी आंग्रे यांनी भगवंतगडावर हल्ला केला, परंतु किल्लेदाराने तो दिडवर्ष चिकाटीने लढवला. २९ मार्च १८१८ रोजी कॅप्टन ग्रे आणि पिअरसन यांच्या नेतृत्वाखालील ४ थ्या रायफलने किल्ल्यावर हल्ला करुन जिंकला.
पहाण्याची ठिकाणे :
भगवंतगडावर जाण्यासाठी कावा मसुरे गावातून होडी मिळते. माणशी ५ रुपयात होडीने खाडीच्या पलिकडील भगवंतगड गावात उतरल्यावर डाव्या हाताच्या रस्त्याने ५ मिनीटे चालल्यावर आपण शाळेजवळ पोहचतो. शाळेच्या मागून मळलेली वाट १० मिनीटात गडावर घेऊन जातो. गडाचे प्रवेशद्वार अस्तित्वात नाही. त्याच्या बाजूचे बुरुज व तटबंदी ढासळलेली आहे. गडावरील एकमेव शाबूत वास्तू म्हणजे सिध्देश्वराचे मंदिर. चिरेबंदी बांधणीच्या या मंदिरात ओबडधोबड दगड आहे. या अमूर्त दगडालाच ‘‘सिध्देश्वर‘‘ म्हणतात. मंदीराच्या बाजुला ४ फूटी चिरेबंदी तुळशीवृंदावन आहे. गडावर लोकांचा वावर नसल्यामुळे दाट झाडी माजलेली आहे. त्यामुळे गडावरील अवशेष पाहाता येत नाहीत. तटबंदीचे तुरळक अवशेष आणि काही जोती गडभर पसरलेली आहेत. गडावरुन कालावल खाडी व भरतगडाचे विहंगम दृश्य दिसते. मालवणहून भरतगड/भरवंतगडला जाताना रस्त्यात आंगणेवाडी, आचर्‍याचे रामेश्वर ही मंदिरे पाहता येतात.
पोहोचण्याच्या वाटा :

भरतगड व भगवंतगड हे दोन्ही छोटे किल्ले एकत्र पहाणे सोयिस्कर पडते. मालवणहून कालावल खाडीच्या अलिकडे असलेल्या भरतगडावर जाण्यासाठी मसूरे गावात उतरावे लागते. भरतगड पाहून झाल्यावर, भगवंतगड पहाण्यासाठी मसुरे गावातील मुख्य चौकातून १ किमी अंतरावर कावावाडी किंवा कावामसुरे नावाची वाडी लागते. तेथे खाडीपलिकडील भगवंतगड गावात जाण्यासाठी होडी मिळते. भगवंतगड गावात उतरल्यावर डाव्या हाताच्या रस्त्याने ५ मिनीटे चालल्यावर आपण शाळेजवळ पोहचतो. तेथून मळलेली वाट गडावर जाते.

मालवणहून एसटी किंवा रिक्षाने थेट भगवंतगड गावात जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही , पण मालवणमध्ये राहण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, जेवणाची सोय मसूरे गावात व मालवणमध्ये होऊ शकते.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
सूचना :
१) मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने
नव्हे) एका दिवसात पाहाता येतात.
२) भरतगड,सर्जेकोट किल्ला, सिंधुदूर्ग व राजकोट या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
 बसचे वेळापत्रक

Depot Village From Depot From Village km
Malvan   Bhagwantgad   07:15, 08:15, 09:15, 15:30.   08:30, 09:30, 11:30, 17:30.   18

श्रेणी: Easy
 अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)  अग्वाडा (Aguada)  अजिंठा (Ajintha Fort)  अजिंठा सराई (Ajintha Sarai)
 अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  अंमळनेर (Amalner)  आंबोळगड (Ambolgad)  अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)
 अर्नाळा (Arnala)  औसा (Ausa)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बल्लाळगड (Ballalgad)  बांदा किल्ला (Banda Fort)
 बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)
 भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))  भरतगड (Bharatgad)  भवानगड (Bhavangad)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)
 चापोरा किल्ला (Chapora Fort)  कुलाबा किल्ला (Colaba)  दांडा किल्ला (Danda Fort)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)  धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)  धारावी किल्ला (Dharavi Fort)
 धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))
 दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))  फर्दापूर सराई (Fardapur Sarai)  फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)
 गाविलगड (Gavilgad)  गोवा किल्ला (Goa Fort)  हिराकोट (Hirakot)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))
 जयगड (Jaigad)  जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  काकती किल्ला (Kakati Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)
 कंधार (Kandhar)  करमाळा (Karmala Fort)  केळवे किल्ला (Kelve Fort)  खर्डा (Kharda)
 खारेपाटण (Kharepatan fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोटकामते (Kotkamate)  लहुगड (Lahugad)
 लोंझा (Lonza)  माचणूर (Machnur)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माढा गढी/किल्ला (Madha Fort)
 महादेवगड (Mahadevgad)  माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)
 मंगळवेढा (Mangalwedha)  मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  नगरचा किल्ला (Nagar Fort)
 नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)  नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))
 नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  नरनाळा (Narnala)  नस्तनपूरची गढी (Nastanpur)
 निवतीचा किल्ला (Nivati Fort)  पाचाड कोट (Pachad Fort)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)  पालचा किल्ला (Pal Fort)
 पळशीचा किल्ला (Palashi Fort)  पन्हाळगड (Panhalgad)  परांडा (Paranda)  पारडी किल्ला (Pardi Fort)
 पारोळा (Parola)  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)  पिंपळास कोट (Pimplas Kot)  प्रतापगड (Pratapgad)
 पूर्णगड (Purnagad)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))  राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))  राजकोट (Rajkot)
 रामदुर्ग (Ramdurg)  रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort))  रेवदंडा (Revdanda)  रिवा किल्ला (Riwa Fort)
 सामराजगड (Samrajgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)
 शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)  शिवथरघळ (Shivtharghal)  सिंधुदुर्ग (Sindhudurg)
 सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort))  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)
 सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुधागड (Sudhagad)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)
 तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)  उदगीर (Udgir)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वसई (Vasai)
 विजयदुर्ग (Vijaydurg)  वरळीचा किल्ला (Worli Fort)  यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))
 यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort))