मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

राजकोट (Rajkot) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : समुद्र किनाऱ्यावरील किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : सिंधुदुर्ग श्रेणी : सोपी
छत्रपती शिवाजी महाराजांनी सिंधुदूर्ग किल्ला बांधल्यावर त्याचे रक्षण करण्यासाठी पद्मगड, राजकोट, सर्जेकोट हे किल्ले बांधले. मालवणच्या किनार्‍यावर उत्तरेकडे खडकाळ व काहीसा उंच भाग आहे. या मोकळ्या जागी राजकोटचा किल्ला बांधण्यात आला. राजकोट किल्ल्यामुळे सिंधुदूर्ग किल्ल्याचे जमिनीवरील हल्ल्यापासून संरक्षण करणे तसेच नैसर्गिक उंचवट्यामुळे सिंधुदूर्गाच्या उत्तरेकडील समुद्रावर लक्ष ठेवणे सहज शक्य झाले.
16 Photos available for this fort
Rajkot
इतिहास :
राजकोट किल्ल्याची उभारणी शिवाजी महाराजांनी इ.स १६६४ ते १६६७ च्या दरम्यान केली. सन १७६६ मध्ये इंग्रज व करवीरकर यांच्यात झालेल्या तहानुसार राजकोट किल्ल्यात इंग्रजांनी वखारीसाठी व मोठ्या जहाजांना उभे रहाण्यासाठी परवानगी मागितली होती. १८६२ मध्ये किल्ल्यात काही इमारतींचे अवशेष, तुटलेली तटबंदी व एक तोफ असल्याचा उल्लेख आहे.
पहाण्याची ठिकाणे :
समुद्रामध्ये घुसलेल्या एका खडकावर राजकोट किल्ला बांधलेले होता. तीन बाजूंनी पाणी (समुद्र) व एका बाजूला जमिन असलेल्या ह्या किल्ल्यावर एक बुरुज व तटबंदीचे अवशेष सोडल्यास मुळ किल्ल्याचे कोणतेही अवशेष नाहीत. इसवीसन ०४ डिसेंबर २०२३ रोजी नौदल दिनाचे औचित्य साधून या किल्ल्यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. त्या भोवती नव्याने किल्ल्यासारखे बांधकाम केलेले आहे. त्यात मुख्य प्रवेशव्दार, बुरुज आणि तटबंदी बांधण्यात आलेली आहे. प्रवेशव्दारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर उजव्या हाताला महापुरुषाचे मंदीर व त्यासमोर बनवलेले तुळशी वृंदावन आहे. पुढे एका उंच चौथर्‍यावर छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसवण्यात आला आहे. चौथर्‍याच्या तीन बाजूला माहिती फ़लक लावलेले आहेत. त्यावर शिवकालिन बोटी, शिवमुद्रा आणि सागरी किल्ले यांची माहिती दिलेली आहे. पुतळ्याच्या मागे समुद्राकडे असलेला दर्या दरवाजा आहे. या दर्या दरवाजातून बाहेर पडल्यावर आपण राजकोट किल्ल्याच्या उरलेल्या भागात फ़िरु शकतो. राजकोट किल्ल्यावरुन सिंधुदूर्ग किल्ला व आजुबाजुचा परिसर दिसतो.

राजकोट परिसरात पाहाण्यासारखी इतर ठिकाणे :-

मौनी महाराज मंदिर: शिवाजी महाराजांनी उभारलेले जांभ्या दगडातील मौनी महाराजांचे मंदिर मेढा राजकोट या भागात आहे.

गणेश मंदिर: मालवणहून राजकोट किल्ल्यावर जाताना वाटेत सुवर्ण(सोन्याच्या) गणेशाचे मंदिर आहे.

रॉक गार्डन:- राजकोटच्या आसपास असलेल्या खडकाळ भागात रॉक गार्डन बनवण्यात आले आहे. येथील खडकावर आपटून फूटणार्‍या लाटा पहातांना वेळेचे भान राहत नाही. येथून समुद्रात होणारा सूर्यास्त अप्रतिम दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) सिंधुदुर्ग किल्ल्याकडे जाणार्‍या बोटी मालवण जेट्टीवरुन सुटतात. त्या जेट्टी पासून उत्तरेकडे किनार्‍याने चालत गेल्यास १५ मिनिटात राजकोट किल्ल्यावर जाता येते.
२) मालवण एस टी स्टँडवरुन सुटणार्‍या सर्व बसेस बाजारातून फिरुन जातात या बसेसनी वडाच्या पारावर उतरुन राजकोटला १० मिनीटात चालत जाता येते. सुवर्ण(सोन्याच्या) गणपती मंदिरापासून फुटणार्‍या डाव्या हाताचा रस्ता राजकोटला व उजव्या हाताचा रस्ता रॉक गार्डनला जातो.
राहाण्याची सोय :
गडावर नाही, मालवणात रहायची सोय आहे
जेवणाची सोय :
गडावर नाही, मालवणात जेवणाची सोय आहे
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
सूचना :
१) मालवणहून सकाळी निघून भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट हे किल्ले पाहून संध्याकाळी सिंधुदूर्ग व राजकोट हे किल्ले स्वत:च्या / खाजगी वहानाने (एस टी ने नव्हे) एका दिवसात पाहाता येतात.
२) भरतगड, भगवंतगड, सर्जेकोट,सिंधुदूर्ग या किल्ल्यांची माहीती साईटवर दिलेली आहे.
श्रेणी: Easy
 अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)  अग्वाडा (Aguada)  अजिंठा (Ajintha Fort)  अजिंठा सराई (Ajintha Sarai)
 अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  अंमळनेर (Amalner)  आंबोळगड (Ambolgad)  अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)
 अर्नाळा (Arnala)  औसा (Ausa)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बल्लाळगड (Ballalgad)  बांदा किल्ला (Banda Fort)
 बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)
 भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))  भरतगड (Bharatgad)  भवानगड (Bhavangad)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)
 चापोरा किल्ला (Chapora Fort)  कुलाबा किल्ला (Colaba)  दांडा किल्ला (Danda Fort)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)  धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)  धारावी किल्ला (Dharavi Fort)
 धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))
 दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))  फर्दापूर सराई (Fardapur Sarai)  फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)
 गाविलगड (Gavilgad)  गोवा किल्ला (Goa Fort)  हिराकोट (Hirakot)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))
 जयगड (Jaigad)  जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  काकती किल्ला (Kakati Fort)  काळाकिल्ला (Kala Killa)
 कंधार (Kandhar)  करमाळा (Karmala Fort)  केळवे किल्ला (Kelve Fort)  खर्डा (Kharda)
 खारेपाटण (Kharepatan fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोटकामते (Kotkamate)  लहुगड (Lahugad)
 लोंझा (Lonza)  माचणूर (Machnur)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))  माढा गढी/किल्ला (Madha Fort)
 महादेवगड (Mahadevgad)  माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))  मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)
 मंगळवेढा (Mangalwedha)  मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)  नगरचा किल्ला (Nagar Fort)
 नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)  नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))
 नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  नरनाळा (Narnala)  नस्तनपूरची गढी (Nastanpur)
 निवतीचा किल्ला (Nivati Fort)  पाचाड कोट (Pachad Fort)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)  पालचा किल्ला (Pal Fort)
 पळशीचा किल्ला (Palashi Fort)  पन्हाळगड (Panhalgad)  परांडा (Paranda)  पारडी किल्ला (Pardi Fort)
 पारोळा (Parola)  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)  पिंपळास कोट (Pimplas Kot)  प्रतापगड (Pratapgad)
 पूर्णगड (Purnagad)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))  राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))  राजकोट (Rajkot)
 रामदुर्ग (Ramdurg)  रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort))  रेवदंडा (Revdanda)  रिवा किल्ला (Riwa Fort)
 सामराजगड (Samrajgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))  सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)
 शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)  शिवथरघळ (Shivtharghal)  सिंधुदुर्ग (Sindhudurg)
 सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort))  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)
 सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))  सुभानमंगळ (Subhan Mangal)  सुधागड (Sudhagad)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)
 तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)  उदगीर (Udgir)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वसई (Vasai)
 विजयदुर्ग (Vijaydurg)  वरळीचा किल्ला (Worli Fort)  यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))
 यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort))