मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

परांडा (Paranda) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : धाराशिव श्रेणी : सोपी
मराठवाड्याच्या भूमीत काही भरभक्कम किल्ले आजही उभे आहेत. त्यापैकी उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात असलेला परांडा किल्ला हा एक अप्रतीम भुईकोट आहे. हा प्राचीन किल्ला आजही चांगल्या अवस्थेत उभा आहे. यावर असणार्‍या विवीध तोफा हे या किल्ल्याचे वैशिष्ट्य आहे. परांडा या तालुक्याच्या गावात हा किल्ला असल्यामुळे फारसे श्रम न करता हा सुंदर किल्ला पाहाता येतो.
62 Photos available for this fort
Paranda
Paranda
Paranda
पहाण्याची ठिकाणे :
परांडा बस स्थानका समोरील घरांच्या गर्दीतून वाट काढत आपण परांडा किल्ल्यापाशी पोहोचतो. या किल्ल्याला सर्व बाजूंनी दगडांनी बाण्धलेला खंदक आहे. या खंदकावर सध्या तयार केलेल्या पक्क्या पूलावरून आपण किल्ल्याच्या प्रवेशव्दारापाशी पोहोचतो. पूर्वीच्या काळी खंदकावर पूल होता, वेळप्रसंगी तो काढून ठेवता येईल अशी सोय केलेली होती. भूईकोट किल्ला असल्याने किल्ल्याला दुहेरी तटबंदी आहे. तटबंदीत बुरुजांची माळ ओवलेली आहे. गडाचे पहिले उत्तराभिमुख प्रवेशव्दार खूप भव्य आहे. प्रवेशव्दाराच्या वर सज्जे असून त्यात जंग्या आहेत. प्रवेशव्दाराच्या उजव्या बाजूला तटबंदीच्या भिंतीत तीन हंस कोरलेली शिल्पपट्टी आणि त्याखाली दोन व्याल पाहायला मिळतात. किल्ल्यात फ़िरतांनाही तटबंदीत अनेक ठिकाणी देवळांचे दगड, वीरगळ वापरलेले पाहायल मिळतात. किल्ल्याच्या प्रवशेव्दाराला नविन लाकडी दारे बसवलेली आहेत. पहिल्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर अंधारा कमानदार बोळ लागतो तो पार करुन उजवीकडे वळल्यावर दुसरे दक्षिणाभिमुख प्रवेशव्दार लागते. यातून आत शिरल्यावर आपण चारही बाजूंनी तटा बुरुजांनी वेढलेल्या जागेत येतो. बुरुजांमधून छोट्या छोट्या तोफा आपल्यावर नजर रोखून बसविलेल्या दिसतात. या भागाला "रणमंडळ" म्हणतात. किल्ल्याचा पहिला दरवाजा भेदून शत्रू इथे पर्यंत पोहोचला तर तो चारही बाजूंनी माराच्या टप्प्यात येतो. रणमंडळात पहिल्या व दुसर्‍या प्रवेशव्दाराच्यावर फ़ांजीवर जाण्यासाठी पायर्‍या केलेल्या आहेत. वर चढून गेल्यावर दरवाजाच्या वरच्या बाजूस डाव्या बाजूला तटबंदीत वीरगळचे अवशेष दिसतात. ते पाहून खाली उतरून पुढे गेल्यास उजवीककडे किल्ल्याचा तिसरा पूर्वाभिमुख दरवाजा आहे. यातून आत शिरल्यावर समोरच एक मोठा बुरुज आडवा येतो. बुरुजाला वळसा घालून किल्ल्याच्या दुहेरी तटबंदी मधील वाटेवर जाता येते. डावीकडे वळल्यावर तटबंदीच्या आडोशाला पहारेकर्‍यांसाठी देवड्या बांधलेल्या दिसतात. येथे डाव्या बाजूच्या भिंतीवर देवळातली कोरीव शिल्प पाहायला मिळतात. देवड्र्‍यांच्या समोरच्या तटबंदीच्या बेचक्यातून वाट पुढे जाते ती थेट महादेवाच्या मंदिरापाशी घेऊन जाते. परंतू मंदिराकडे न जाता बुरुजापासून उजवीकडे गेलेल्या वाटेने गेल्यावर किल्ल्याचा चौथा भव्य उत्तराभिमुख दरवाजा आहे.

चौथ्या प्रवेशव्दाराची उंची जवळजवळ ४० फुट आहे आणि बाजूला असणार्‍या बुरुजांची उंची तर जवळजवळ ६० फुट आहे. दरवाजावर एक फ़ारसी शिलालेख आहे. दरवाज्याच्या समोर एक ५० फुट खोल अशी विहीर आहे. कमानीच्या समोरच एक महाकाय बुरुज आहे. त्यावर जवळजवळ २० फुट लांबीची तोफ आहे. चौथ्या प्रवेशव्दारातून आत शिरल्यावर उजवीकडे पाचवा पश्चिमाभिमुख दरवाजा आहे. त्यातून बाहेर पडल्यावर समोरच एक मोठी मशिद आहे. खरे पाहाता ही मशिद म्हणजे पूर्वीचे माणकेश्वर मंदिर होते. मशिदीत जाण्यासाठी उत्तरेकडे आणि दक्षिणेकडे छोटे दरवाजे आहेत. मशिदी मध्ये असणारे ३६ दगडी खांब , खिडक्या यांचे कोरीवकाम व रचना इत्यादी गोष्टी ते मंदिर असल्याची साक्ष देतात. या मशिदीच्या आवारात वजू करण्यासाठी तलाव आहे. मशिदीवर जाण्यासाठी पायर्‍यांची व्यवस्था केलेली आहे. वर चढून गेल्यावर आजूबाजूचा परिसर दिसतो. मशिदीवर ४ छोटे मिनार आहेत.

मशिद पाहून समोर दिसणार्‍या पायर्‍यांनी वर चढायला सुरुवात केली की आपण चौथ्या दरवाजाच्या बाजूला असलेल्या बुरुजावर पोहोचतो. येथे एक पंचधातूची अप्रतिम तोफ़ आहे. या २० फुटी लांबीच्या तोफ़ेच नाव ‘मलिक ए मैदान’ असे आहे. तोफ़ेवर फ़ारसी भाषेतील पाच लेख कोरलेले आहेत. त्यातील एक लेख तोफ़ेच्या तोंडावर कोरलेला आहे. तोफ़ेच्या मागच्या बाजूला पाकळ्यांसारखा आकार दिलेला आहे. तोफ़ेवर दोन छोट्या सिंहाच्या मुर्ती आहेत. त्यातील एक सिंह कापून चोरुन नेण्य़ात आलेला आहे. तोफ़ असलेल्या बुरुजाच्या बाजूला नगारखाना आहे. हा नगारखाना बरोबर चौथ्या दरवाजाच्या वर आहे.

तोफ़ पाहून फ़ांजीवरुन चालायला सुरुवात करावी. प्रवेशव्दाराच्या बुरुजापासून तिसर्‍या बुरुजावर मोठी तोफ़ आहे. चौथ्या आणि पाचव्या बुरुजाच्या मध्ये किल्ल्याच्या आतील आणि बाहेरील तटबंदीच्या मध्ये असलेले शंकराचे मंदिर दिसते. ( ते पाहाण्यासाठी तिसर्‍या प्रवेशव्दारा पुढील देवड्यांजवळून मार्ग आहे.) पुढे चालत गेल्यावर सहाव्या आणि सातव्या बुरुजांमध्ये कमान असलेली छोटी हवा महालाची इमारत आहे. हवा महालातून गच्चीवर जाण्यासाठी पायर्‍या आहेत, तशाच खाली उतरण्यासाठी पण पायर्‍या आहेत. या पायर्‍यांनी आपण किल्ल्याच्या दक्षिण प्रवेशव्द्रारापाशी पोहोचतो. दरवाजा प्रवेशव्द्राराजवळ देवड्या आहेत.

प्रवेशव्दाराच्या बुरुजापासून नवव्या बुरुजावर पंचधातूची मगरमुख असलेली मोठी तोफ़ आहे. बुरुजावरुन फ़ांजीवर उतरल्यावर किल्ल्याच्या आतल्या बाजूला एक आयताकृती विहिर आहे, सध्या ती कोरडी आहे. पुढच्या बुरुजावर एक बांगडी तोफ़ आहे. त्यापुढील बुरुजावर घुमट आणि चार मिनार असलेली मशिदीची छोटेखानी इमारत आहे. या इमारती समोर किल्ल्याच्या आतल्या बाजूला दारू कोठार आहे. दारु कोठार पाहून पुढच्या बुरुजावर पोर्तुगिज बनावटीची इसवीसन १७१७ कोरलेली पंचधातूची तोफ़ आहे. पुढच्या बुरुजावर बांगडी तोफ़ आहे. या तोफ़ेला दोन्ही बाजूला कड्या आहेत. या बुरुजा खाली एक खोली आहे. पुढे गेल्यावर दोन बुरुजांवर छोट्या बांगडी तोफ़ा आहेत. त्यातील एका बुरुजावर कमळ पुष्प आहे. पुढे गेल्यावर आपण मुख्य प्रवेशव्दारा जवळील बुरुजापाशी पोहोचतो. या बुरुजावर जाण्यासाठी एक कमान असलेले छोटेखानी दार आहे. बुरुजावर मोठी बांगडी तोफ़ आहे. तोफ़ पाहून फ़ांजीवर येऊन जीन्याने खाली उतरल्यावर सिमेंट मध्ये बांधलेली पायवाट आहे. या वाटेने थोडे अंतर चाकून गेक्यावर उजव्या बाजूला कमान असलेले प्रवेशव्दार दिसते. त्यातून आत गेल्यावर आपण गणपती मंदिराच्या प्राकारात पोहोचतो. मंदिरात गरुडावर बसलेल्या विष्णूची मुर्ती आहे. त्याच्या पायाशी लक्ष्मी बसलेली आहे. मंदिराच्या बाहेर काही वीरगळ आहेत. मंदिरासमोर एक समाधी असून त्याला लागून भैरवाची मुर्ती आणि वीरगळ आहे. मंदिराच्या खांबांच्या खुणा येथे पाहायला मिळतात. मंदिराला असलेल्या प्रवेशव्दारातून बाहेर पडल्यावर उजव्या बाजूला एक मोठी बाराकोनी (बारव) विहिर आहे. विहिरीत उतरण्यासाठी पायर्‍या आहेत. विहिरीत अनेक कोनाडे आणि कमानी असलेला महाल आहे. उन्हाळ्याच्या दिवसात थंडावा मिळण्यासाठी अशा प्रकारचे महाल बांधले जात. विहिरीच्या समोर एक लाल वीटांनी बांधलेली इमारत आहे. त्या इमारतीच्या मागे हमामखाना आहे. हमामखान्यात अनेक सुंदर मुर्ती ठेवलेल्या आहेत. त्यात एकमुखी लिंग, ४ फ़ुट उंचीची गणपतीची मुर्ती, पाच फ़ण्याच्या नागदेवतेची मुर्ती,पार्श्वनाथाची ३ फ़ुटी मुर्ती, गध्देगळ, फ़ारसी शिलालेख आणि वीरगळ पाहायला मिळतात.

हमामखाना पाहून बाहेर पडल्यावर समोरच एक इमारत आहे. त्यात बांगडी तोफ़ांचे काही तुकडे आणि पंचधातूची तोफ़ ठेवलेली आहे. त्याच्या मागे असणार्‍या खोलीत असंख्य तोफगोळे पडलेले दिसतात. ही इमारत पाहून प्रवेशव्दारापाशी आल्यावर उजव्या बाजूला वळून किल्ल्याच्या दोन तटबंदींमध्ये असलेल्या पायवाटेने शंकर मंदिराकडे चालत जातांना प्रथम एका पीराचे थडगे लागते. पुढे चालत गेल्यावर उजव्या बाजूच्या किल्ल्याच्या तटबंदीत चोर दरवाजा पाहायला मिळतो. या दरवाजाच्या समोर बाहेरच्या (खंदका कडच्या) तटबंदीला लागून एक भूमीगत खोली आहे. अशा एकूण तीन खोल्या या तटबंदी जवळ आहेत त्यांचे नक्की प्रयोजन कळत नाही. पुढे गेल्यावर दुसरी भुमिगत खोली पाहायला मिळते. पुढे शंकर मंदिर आहे. या मंदिरा जवळ तिसरी भूमिगत खोली आहे. मंदिर पाहून आल्या वाटेने प्रवेशव्दाराजवळ आल्यावर आपली गड फ़ेरी पूर्ण होते.

किल्ला पूरातत्व खात्याच्या ताब्यात असल्याने सकाळी ९.३० ते संध्याकाळी ५.०० वाजेपर्यंतच पाहाता येतो.
पोहोचण्याच्या वाटा :
परांडा हे तालुक्याचे ठिकाण आहे. ते उस्मानाबाद आणि सोलापूर यांच्या हद्‌दीवर येते.
रेल्वेने :- १) मुंबई - सोलापूर मार्गावरील कुर्डूवाडी हे जवळचे स्टेशन आहे. कुर्डूवाडीहून परांडा २२ किमीवर आहे. कुर्डुवाडी ते परांडा अशी बससेवा दर अर्ध्यातासाला आहे.
२) मुंबई - लातूर मार्गावरील बार्शी हे जवळचे स्टेशन आहे. बार्शी - परांडा २७ किमी अंतर आहे.
रस्त्याने :- सोलापूरहून बार्शी मार्गे परांडाला यायला बर्‍याच एसटी बसेस आहेत. पूण्याहून भूमला जाणारी गाडी परांड्याला जाते. परांडा गावातच किल्ला आहे.
राहाण्याची सोय :
परांडा गावात राहाण्याची सोय आहे.
जेवणाची सोय :
परांडा गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यात पाणी नाही.
श्रेणी: Easy
 अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)  अग्वाडा (Aguada)  अजिंठा (Ajintha Fort)  अजिंठा सराई (Ajintha Sarai)
 अकलूजचा किल्ला (Akluj Fort)  अंमळनेर (Amalner)  आंबोळगड (Ambolgad)  अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)
 अर्नाळा (Arnala)  औसा (Ausa)  बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))
 बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बल्लाळगड (Ballalgad)  बांदा किल्ला (Banda Fort)
 बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)
 भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))  भरतगड (Bharatgad)  भवानगड (Bhavangad)  चाकणचा किल्ला (Chakan Fort)
 चापोरा किल्ला (Chapora Fort)  कुलाबा किल्ला (Colaba)  दांडा किल्ला (Danda Fort)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)  धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)  धारावी किल्ला (Dharavi Fort)
 धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))
 दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))  फर्दापूर सराई (Fardapur Sarai)  फत्तेगड / फतेदुर्ग (Fattegad)
 गाविलगड (Gavilgad)  गोवा किल्ला (Goa Fort)  हिराकोट (Hirakot)  इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi))
 जयगड (Jaigad)  जामगावचा किल्ला (Jamgaon Fort)  जंजिरा (Janjira)  काकती किल्ला (Kakati Fort)
 काळाकिल्ला (Kala Killa)  कंधार (Kandhar)  करमाळा (Karmala Fort)  केळवे किल्ला (Kelve Fort)
 खर्डा (Kharda)  खारेपाटण (Kharepatan fort)  खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort))  कोटकामते (Kotkamate)
 लहुगड (Lahugad)  लोंझा (Lonza)  माचणूर (Machnur)  मढचा किल्ला(वर्सोवा किल्ला) (Madh Fort (Varsova Fort))
 माढा गढी/किल्ला (Madha Fort)  महादेवगड (Mahadevgad)  माहीमचा किल्ला (Mahim Fort)  माहीम किल्ला (केळवेमाहीम) (Mahim Fort ( Kelve - Mahim))
 मालेगावचा किल्ला (Malegaon Fort)  मंगळवेढा (Mangalwedha)  मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort)  मोटी दमण किल्ला (Moti Daman Fort)
 नगरचा किल्ला (Nagar Fort)  नगरधन (Nagardhan)  नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नळदुर्ग (Naldurg)
 नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri))  नानी दमण किल्ला (सेंट जेरोम फ़ोर्ट) (Nani Daman Fort (St.Jerome Fort))  नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))  नरनाळा (Narnala)
 नस्तनपूरची गढी (Nastanpur)  निवतीचा किल्ला (Nivati Fort)  पाचाड कोट (Pachad Fort)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)
 पालचा किल्ला (Pal Fort)  पळशीचा किल्ला (Palashi Fort)  पालगड (Palgad)  पन्हाळगड (Panhalgad)
 परांडा (Paranda)  पारडी किल्ला (Pardi Fort)  पारोळा (Parola)  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)
 पिंपळास कोट (Pimplas Kot)  प्रतापगड (Pratapgad)  पूर्णगड (Purnagad)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))
 राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))  राजकोट (Rajkot)  रामदुर्ग (Ramdurg)  रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort))
 रेवदंडा (Revdanda)  रिवा किल्ला (Riwa Fort)  सामराजगड (Samrajgad)  सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug))
 सर्जेकोट (मालवण) (Sarjekot(Malvan))  साटवलीचा किल्ला (Satavali Fort)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिरगावचा किल्ला (Shirgaon)
 शिवथरघळ (Shivtharghal)  सिंधुदुर्ग (Sindhudurg)  सिंदखेडराजा (Sindkhed Raja)  सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)
 सिताबर्डी किल्ला (Sitabuldi fort(Sitabardi Fort))  सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort)  सोनगिरी (नाशिक) (Songir (Nashik))  सुभानमंगळ (Subhan Mangal)
 सुधागड (Sudhagad)  सुलतान गढी (Sulatan Gadhi)  तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)  उदगीर (Udgir)
 वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वसई (Vasai)  विजयदुर्ग (Vijaydurg)  वरळीचा किल्ला (Worli Fort)
 यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))  यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort))