मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
बहादरपूर (Bahadarpur Fort) | किल्ल्याची ऊंची :  50 | ||
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
जिल्हा : जळगाव | श्रेणी : सोपी | ||
जळगाव जिल्ह्यातील पारोळा व अंमळनेर या शहरांच्या मध्ये बोरी नदीच्या काठावर बहादरपूर किल्ला उभा आहे. १५व्या शतकात बांधलेल्या या किल्ल्याचे अंदाजे ४० फूट उंच बुलंद व बलाढ्य बुरुज आजही काळाशी झुंज देत उभे आहेत. इतके बुलंद व सुंदर बुरुज फारच कमी ठिकाणी पाहायला मिळतात. पण स्थानिक लोकांच्या अनास्थेमुळे किल्ल्याची अवस्था दिवसेंदिवस फारच वाइट होत आहे. |
|||
|
|||
इतिहास : | |||
इ.स. १५९६ मध्ये बहादुरखान सूरी याने हा किल्ला बांधला. इ.स. १७५१ मध्ये नानासाहेब पेशवे व गायकवाड यांच्यात बहादरपूर येथे बोरी नदीच्या तीरावर लढाइ झाली. इ.स. १८१८ मध्ये इंग्रजांनी हा किल्ला पेशव्यांकडून जिंकून घेतला. |
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
गडाला बोरी नदीच्या बाजूने दोन भक्कम बुरुज व तटबंदी आहे. त्यातील एक बुरुज अंदाजे ४० फूट उंच आहे. नदीच्या पात्रापासून तटबंदीची उंची २० फुट आहे. दुसर्या बुरुजाचा तटबंदी पर्यंतचा भाग शाबुत आहे. या बुरुजाजवळ एक कबर आहे. किल्ल्यावरील फारशी/अरबीतील शिलालेख ग्रामपंचायतीत आहे. गडाचा गावाच्या बाजूला असलेला भाग अतिक्रमणामुळे उध्वस्त झालेला आहे. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
१) बहादरपूर, जळगाव जिल्ह्यातील पारोळा तालुक्यात येते. पारोळ्या पासून बहादूरपूर ८ किमी अंतरावर आहे. पारोळा अंमळनेर रस्त्यावर बहादरपूर फाटा आहे. २) धुळे - जळगाव रस्त्यावर मोंढाणे गावाजवळ बहादरपूरला जाणारा फाटा आहे. तेथून बहादरपूर १० किमी अंतरावर आहे. | |||
राहाण्याची सोय : | |||
गडावर राहण्याची सोय नाही. | |||
जेवणाची सोय : | |||
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी. | |||
पाण्याची सोय : | |||
गडावर पाण्याची सोय नाही. आपण स्वत:च करावी. | |||
सूचना : | |||
अंमळनेर (२० किमी) - पारोळा (८ किमी) - बहादरपूर हे किल्ले एका दिवसात पाहता येतात. |
प्रकार: Land Forts | अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) | अजिंठा (Ajintha Fort) | अजिंठा सराई (Ajintha Sarai) | अकलूजचा किल्ला (Akluj Fort) |
अंमळनेर (Amalner) | अमरावतीचा किल्ला (Amravati Fort) | अनंतपूर किल्ला (Anantapura Fort) | आवाडे कोट (Awade Kot) |
बहादरपूर (Bahadarpur Fort) | बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort)) | बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad) | बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) |
बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) | चाकणचा किल्ला (Chakan Fort) | डफळापूर गढी (Daflapur Fort) | धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi) |
दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) | डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort)) | फर्दापूर सराई (Fardapur Sarai) | हिराकोट (Hirakot) |
इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi)) | जामगावचा किल्ला (Jamgaon Fort) | काळाकिल्ला (Kala Killa) | कांबे कोट (Kambe Kot) |
कंधार (Kandhar) | करमाळा (Karmala Fort) | खर्डा (Kharda) | कोटकामते (Kotkamate) |
माचणूर (Machnur) | माढा गढी/किल्ला (Madha Fort) | मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) | मांडवी कोट (Mandvi Kot) |
मंगळवेढा (Mangalwedha) | मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) | नगरचा किल्ला (Nagar Fort) | नगरधन (Nagardhan) |
नळदुर्ग (Naldurg) | नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) | नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) | नस्तनपूरची गढी (Nastanpur) |
पाचाड कोट (Pachad Fort) | पळशीचा किल्ला (Palashi Fort) | परांडा (Paranda) | पारोळा (Parola) |
रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort)) | शिरगावचा किल्ला (Shirgaon) | सिंदखेडराजा (Sindkhed Raja) | सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort) |
सुभानमंगळ (Subhan Mangal) | सुलतान गढी (Sulatan Gadhi) | यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort)) |