मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
नस्तनपूरची गढी (Nastanpur) | किल्ल्याची ऊंची :  0 | ||
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
जिल्हा : नाशिक | श्रेणी : सोपी | ||
नाशिक चाळीसगाव रस्त्यावर नस्तनपूर गावात "खोजाचा किल्ला" या नावाने ओळखली जाणारी नस्तनपूरची गढी आहे. नस्तनपूर गाव सध्या शनी मंदिरासाठी प्रसिध्द आहे. या मंदिराजवळ महामर्गाला लागून गढी आहे. |
|||
|
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
नाशिक चाळीसगाव रस्त्यावरुन गढीकडे जातांना एका झाडाखाली "रावणानुग्रह" मुर्ती आणि तोफ़गोळे पडलेले आहेत. गढीच्या प्रवेशव्दारावर थेट मारा करता येऊ नये यासाठी त्याच्या समोर भिंत बांधलेली आहे. भिंतीच्या बाजूने पुढे गेल्यावर उत्तराभिमुख प्रवेशव्दारातून आपला गढीत प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य बुरुज आहेत. बुरुज दगडांनी बांधलेले असून वरचा भाग वीटांनी बांधलेला आहे, त्यात जागोजागी जंग्या काढलेल्या आहेत . गढीत पायर्या असलेली गोल विहिर आहे , या विहिरीच्या बाजूच्या बुरुजात हवा महाल बांधलेला आहे. उन्हाळ्याच्या दिवसात गारवा मिळण्यासाठी अशाप्रकारे पाण्या जवळ खोल्या बांधलेल्या असतात. याशिवाय गढीत चौकोनी विहिर असून त्यालगत हमाम खान्याचे अवशेष आहेत. त्यामागे कमानी असलेली वास्तू आहे . गढीत पाण्याचे तीन हौद पाहायला मिळतात. गढील एकूण ११ बुरुज असून तटबंदी कोसळलेली आहे. गढीत काही वास्तूंचे चौथरेही पाहायला मिळतात. गढीच्या बाहेरच्या बाजूला तटबंदीत गणपती मंदिर आहे. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
नाशिक - चांदवड - नांदगाव मार्गे नस्तनपूरची गढी १२८ किलोमीटरवर आहे. नस्तनपूरची गढी पासून जवळचे रेल्वे स्टेशन नांदगाव १५ किलोमीटर अंतरावर आहे. तर चाळीसगाव २८ किलोमीटर अंतरावर आहे. | |||
राहाण्याची सोय : | |||
गडावर राहाण्याची सोय नाही | |||
जेवणाची सोय : | |||
जेवणाची सोय नाशिक - चाळिसगाव महामार्गावर आहे. | |||
पाण्याची सोय : | |||
गडावर पाण्याची सोय नाही | |||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||
वर्षभर |
प्रकार: Land Forts | अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) | अजिंठा (Ajintha Fort) | अजिंठा सराई (Ajintha Sarai) | अकलूजचा किल्ला (Akluj Fort) |
अंमळनेर (Amalner) | अमरावतीचा किल्ला (Amravati Fort) | अनंतपूर किल्ला (Anantapura Fort) | आवाडे कोट (Awade Kot) |
बहादरपूर (Bahadarpur Fort) | बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort)) | बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad) | बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) |
बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) | चाकणचा किल्ला (Chakan Fort) | डफळापूर गढी (Daflapur Fort) | धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi) |
दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) | डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort)) | फर्दापूर सराई (Fardapur Sarai) | हिराकोट (Hirakot) |
इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi)) | जामगावचा किल्ला (Jamgaon Fort) | काळाकिल्ला (Kala Killa) | कांबे कोट (Kambe Kot) |
कंधार (Kandhar) | करमाळा (Karmala Fort) | खर्डा (Kharda) | कोटकामते (Kotkamate) |
माचणूर (Machnur) | माढा गढी/किल्ला (Madha Fort) | मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) | मांडवी कोट (Mandvi Kot) |
मंगळवेढा (Mangalwedha) | मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) | नगरचा किल्ला (Nagar Fort) | नगरधन (Nagardhan) |
नळदुर्ग (Naldurg) | नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) | नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) | नस्तनपूरची गढी (Nastanpur) |
पाचाड कोट (Pachad Fort) | पळशीचा किल्ला (Palashi Fort) | परांडा (Paranda) | पारोळा (Parola) |
रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort)) | शिरगावचा किल्ला (Shirgaon) | सिंदखेडराजा (Sindkhed Raja) | सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort) |
सुभानमंगळ (Subhan Mangal) | सुलतान गढी (Sulatan Gadhi) | यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort)) |