मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort) | किल्ल्याची ऊंची :  190 | ||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: डोंगररांग नाही | ||
जिल्हा : मुंबई | श्रेणी : सोपी | ||
माहीम खाडीच्या पूर्वेकडील मुखावरील टेकडीवर इंग्रजांनी शीवचा किल्ला बांधला. इंग्रजांच्या ताब्यातील मुंबई बेट व पोर्तुगिजांच्या ताब्यातील साष्टी बेट यांच्या सीमेवर(शीवेवर) हा किल्ला १६७० मध्ये जेरॉल्ड ऑगियरने बांधला. इंग्रजांनी मुंबई बेटांच्या उत्तरेकडे काळा किल्ला, रिवा किल्ला व सायनचा किल्ला, हे नवीन किल्ले बांधून मजबूत संरक्षण फळी उभी केली. वसईच्या विजयानंतर पोर्तुगिजांकडून साष्टी बेट मराठ्यांच्या ताब्यात गेली. त्यावेळी ह्या किल्ल्यांना संरक्षणाच्या दृष्टीने अधिक महत्व आले.
|
|||
|
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
सायन किल्ल्याच्या पायथ्याशी जवाहरलाल नेहरु उद्यान आहे. जवळच भारतीय पुरातत्व विभागाचे कार्यालय आहे. तेथे झाडीत २ तोफा पडलेल्या आहेत. कार्यालयाच्या दारातूनच पायर्यांचा रस्ता किल्ल्याकडे जातो. शीवच्या किल्ल्याचे तटबुरुज, ब्रिटीश कार्यालयाचे अवशेष, दारुकोठाराची खोली व चौकोनी आकाराचा मोठा हौद असे अवशेष अजून तग धरुन आहेत. किल्ल्याच्या मध्यभागी असलेल्या बुरुजावरुन माहीमची खाडी व आजुबाजूच्या विस्तृत प्रदेशाचे दृश्य दिसते. ह्या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे टेहळणी साठी व माहीम खाडी मार्गे होणार्या जलवाहतुकीवर नजर ठेवण्यासाठी केला जात असे. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
मध्य रेल्वेच्या सायन स्थानकाच्या पूर्व बाजूस उतरुन डाव्या हाताच्या फूटपाथने ३ मिनिटे चालल्यावर पूर्वद्रुतगती महामार्ग येतो. हा महामार्ग ओलांडल्यावर दुतर्फा पुरातन वृक्ष उभे असलेला रस्ता लागतो. ह्या रस्त्याने २ मिनिटातच आपण किल्ल्याच्या पायथ्याशी पोहोचतो. |
प्रकार: Land Forts | अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort) | अजिंठा (Ajintha Fort) | अजिंठा सराई (Ajintha Sarai) | अकलूजचा किल्ला (Akluj Fort) |
अकोला किल्ला (असदगड) (Akola Fort (Asadgad Fort)) | अंमळनेर (Amalner) | अमरावतीचा किल्ला (Amravati Fort) | अनंतपूर किल्ला (Anantapura Fort) |
आवाडे कोट (Awade Kot) | बहादरपूर (Bahadarpur Fort) | बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort)) | बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad) |
बेलापूरचा किल्ला (Belapur Fort) | बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) | चाकणचा किल्ला (Chakan Fort) | डफळापूर गढी (Daflapur Fort) |
धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi) | दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort) | डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort)) | फर्दापूर सराई (Fardapur Sarai) |
गोंधनपूर किल्ला (Gondhanpur Fort) | हिराकोट (Hirakot) | इंदुरीचा किल्ला (गढी) (Induri Fort (Gadhi)) | जामगावचा किल्ला (Jamgaon Fort) |
काळाकिल्ला (Kala Killa) | कांबे कोट (Kambe Kot) | कंधार (Kandhar) | करमाळा (Karmala Fort) |
खर्डा (Kharda) | कोटकामते (Kotkamate) | माचणूर (Machnur) | माढा गढी/किल्ला (Madha Fort) |
मालेगावचा किल्ला (Malegaon Fort) | मांडवी कोट (Mandvi Kot) | मंगळवेढा (Mangalwedha) | मोहोळ गढी/किल्ला (Mohol Fort) |
नगरचा किल्ला (Nagar Fort) | नगरधन (Nagardhan) | नळदुर्ग (Naldurg) | नांदेडचा किल्ला (नंदगिरी किल्ला) (Nanded Fort (Nadgiri)) |
नांदरुखी कोट (Nandrukhi Kot) | नस्तनपूरची गढी (Nastanpur) | पाचाड कोट (Pachad Fort) | पळशीचा किल्ला (Palashi Fort) |
परांडा (Paranda) | पारोळा (Parola) | रसलपूरचा किल्ला (सराई) (Rasalpur Sarai (Fort)) | शिरगावचा किल्ला (Shirgaon) |
सिंदखेडराजा (Sindkhed Raja) | सोलापूरचा भुईकोट (Solapur Fort) | सुभानमंगळ (Subhan Mangal) | सुलतान गढी (Sulatan Gadhi) |
यावल (निंबाळकर किल्ला) (Yawal Fort (Nimbalkar Fort)) |