डहाणू किल्ला

समुद्र किनाऱ्यावरील किल्ले पालघर डोंगररांग नाही
🏔️
अवघडीनुसार स्तर
सोपी
📏
समुद्रसपाटीपासून उंची
0
⏱️
ट्रेकसाठी लागणारा वेळ
N/A
🌤️
सर्वोत्तम काळ
वर्षभर

किल्ल्याची छायाचित्रे

किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा

मुख्य छायाचित्र
bastion, Dahanu Fort

bastion, Dahanu Fort

सर्व छायाचित्रे पहा

नकाशे व मार्ग

किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा

Fort

Fort

सर्व नकाशे पहा

प्रस्तावना

डहाणू खाडी जेथे समुद्राला मिळते तेथे खाडीच्या मुखावर डहाणू किल्ला आहे. सध्या किल्ल्याचा जो भाग उरला आहे त्यात तहसिलदार कार्यालय आहे.

कसे पोहोचावे

ट्रेनने जाण्यासाठी :-
डहाणू किल्ल्यास भेट देण्यासाठी आपणास प्रथम पश्चिम रेल्वे मार्गावरील डहाणू स्टेशन गाठावे लागते . त्यासाठी चर्चगेट - डहाणू लोकल अथवा विरारहून सुटणार्‍या शटलने डहाणू स्थानक गाठावे . डहाणू स्थानका जवळ स्थानकाच्या बाहेर तह शीलदार कार्यालया / डहाणू किल्ल्यासाठी शेअर रिक्षा मिळतात. या बस / रिक्षाने किल्ल्याच्या चौकात उतरावे.
रस्त्याने जाण्यासाठी :-
मुंबई - सुरत मार्गावर असलेल्या चारोटी नाका मार्गे अंतर १४४ किलोमीटर आहे.

महत्त्वाची ठिकाणे

डहाणू गावाकडून किल्ल्याकडे जातांना रस्त्यात उजव्या बाजूला हनुमानाचे पूरातन मंदिर आहे. मुळ किल्ला या मंदिरापासून होता असे मानले जाते. याठिकाणी किल्ल्याचे मुख्य प्रवेशव्दार होते आणि त्याठिकाणी प्रवेशव्दारा जवळ हनुमानाची स्थापना करण्यात आली होती. या किल्ल्याला १२ मीटर उंचीची तटबंदी, त्यावर लोखंडी व पंचधातूच्या तोफा असल्याचा उल्लेख ऐतिहासिक कागदपत्रात आहे. हनुमान मंदिरापासून किल्ल्याच्या सध्याच्या अवशेषांपर्यंत ( तहशिलदार कार्यालय) दाट वस्ती असल्याने किल्ल्याचे अवशेष त्याखाली दबलेले असावेत.

गडाच्या प्रवेशद्वाराच्या पायऱ्यांच्या दोन्ही बाजूस इतिहास काळातील दोन तोफा चौथऱ्यावर व्यवस्थित बसविण्यात आहेत. पायऱ्यांच्या मार्गाने गडप्रवेश करतो तेथे किल्ल्याचे प्रवेशव्दार होते. आज ते अस्तित्वात नाही. किल्ल्याच्या आत प्रवेश केल्यावर डाव्या बाजूला एक वाट तटावरून आपणास गडावरील ध्वजस्तंभ असणाऱ्या बुरुजावर घेऊन जाते. हा बुरूज पाहून आपण गडावरील सरकारी कार्यालयांच्या चौकात प्रवेश केल्यावर डाव्या बाजूने खाली उतरणारी वाट आपणास गडाच्या जुन्या प्रवेशद्वाराकडे जाते. या वाटेवर २ ठिकाणी शेंदुर लावलेले दगड आहेत. किल्ल्याचे हे प्रवेशद्वार आजही शाबूत आहे. प्रवेशव्दारच्या बाजूलाच देवडी मध्ये दोन शेंदुर लावलेले देवीचे तांदळे आहेत त्यांना चेडोबो म्हणुन ओळखलेले जाते. त्यांची पूजाअर्चा आजही केली जाते.

हे प्रवेशव्दार पाहून पुन्हा किल्ल्या मधिल चौकात येऊन तहशीलदार कार्यालयाच्या दोन इमारतीच्या मध्ये असलेल्या चिंचोळ्या बोळातून पलिकडे गेल्यावर आपण किल्ल्याच्या उत्तरेकडील तटबंदीवर पोहोचतो. या बाजूला तटबंदीच्या दोन्ही टोकाला दोन बुरुज आहेत. या बुरुजावरुन डहाणुची खाडी दिसते. किल्ल्याच्या पश्चिम व दक्षिण दिशेस असलेल्या खाडीमुळे या किल्ल्यास एक प्रकारचे नैसर्गिक संरक्षण लाभलेले आहे. किल्ल्याच्या चौथ्या बुरुजाकडे जाता येत नाही. त्यामुळे आलेल्या मार्गाने चौकात येऊन पायर्‍या उतरुन किल्ल्याच्या बाहेर येऊन बाहेरुन गडफ़ेरी मारताना किल्ल्याच्या मागच्या बाजूला १८५५ मध्ये बांधलेले कस्टमचे कार्यालय आहे. या कार्यालयाच्या बाहेर दोन तोफ़ा ठेवलेल्या आहेत. हे पाहून पुन्हा प्रवेशव्दारापाशी आल्यावर आपली गडफ़ेरी पूर्ण होते.

तारापूर किल्ला आणि डहाणू किल्ला एकाच दिवशी पाहाता येतात. त्यासाठी तारापूरचा किल्ला पाहून झाल्यावर पुन्हा तारापूर चौकात येऊन डहाणूसाठी बस पकडावी. बस न मिळाल्यास चिंचणी गावापर्यंत जाण्यासाठी ६ आसनी शेअर रिक्षा मिळतात. या रिक्षाने चिंचणी चौकात उतरावे. तेथून डहाणूला जाण्यासाठी बस आणि शेअर रिक्षा मिळतात. डहाणूचा किल्ला पाहून झाल्यावर रिक्षा पकडून डहाणू रेल्वे स्थानक गाठावे.

सुविधा व सोयी

🏠

निवास व्यवस्था

किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.

🍽️

अन्न व्यवस्था

किल्ल्यावर जेवणाची सोय नाही. गावात जेवणासाठी हॉटेल्स आहेत.

💧

पाणी उपलब्धता

किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.

स्थान नकाशे

सविस्तर नकाशे व ट्रेकिंग मार्ग पहा

सर्व नकाशे पहा

जवळील गावे

Dahanu

तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?

साहित्य योग्यरीत्या पॅक करा

आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा

लवकर सुरुवात करा

सकाळी लवकर ट्रेक सुरू करा

गटामध्ये ट्रेक करा

सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा