धामणगाव गढी
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Dhamangaon Gadhi
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
अमरावती चिखलदरा रस्त्यावर चिखलदर्याच्या पायथ्याशी धामणगाव गढी नावाचे गाव आहे. गावात असलेल्या मातीच्या गढीवरुन हे नाव पडलेले आहे. या गावातून गाविलगड किल्ला दिसतो. गाविलगड किल्ल्यावर असलेल्या कालभैरव तोफ़ेचा निशाणा या गढीवर आहे असे सांगितले जाते. चिखलदरा आणि गाविलगडला जातांना ही गढी पाहाता येईल.
महत्त्वाची ठिकाणे
गावाच्या पश्चिमेला ही पांढर्या मातीत बांधलेली गढी असून त्याला एकूण सात बुरुज आहेत. तटबंदी ३० फ़ूट उंच आणि १० फ़ूट रुंद आहे. तटबंदीत जंग्या आहेत. गढी भोवती खंदक आहे. गढी मध्ये एक विहिर होती. गढीची सद्यस्थिती फ़ारच खराब आहे. गढीचे अवशेष कसेबसे तग धरुन उभे आहेत.
कसे पोहोचावे
अमरावती चिखलदरा रस्त्यावर अमरावती पासून ६० किलोमीटर अंतरावर धामणगाव गढी गाव आहे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
राहाण्याची सोय परतवाडा मध्ये आहे.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय परतवाडा मध्ये आहे.
पाणी उपलब्धता
पाण्याची सोय परतवाडा मध्ये आहे.
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
जवळील गावे
धामणगाव गढी
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.