इंद्रगड
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Indragad, Main Entrance gate
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
गुजरात आणि दमणच्या सीमेवर इंद्रगड किल्ला आहे. दमणगंगा नदीव्दारे होणार्या व्यापारावर लक्ष ठेवण्ण्यासाठी या किल्ल्याची निर्मिती करण्यात आली होती.
महत्त्वाची ठिकाणे
गडाच्या डोंगरावर भरपूर झाडे असल्याने गड चढतांना उन्हाचा त्रास होत नाही. गडाच्या तटबंदीला लागून चेडू मातेचे मंदिर बांधलेले आहे. त्यात एक साधू राहातो. या गडाचे प्रवेशव्दार एका अर्धवर्तुळाकार भिंतीमागे लपवलेले आहे. प्रवेशव्दारावर थेट हल्ला करता येऊ नये यासाठी अशाप्रकारे भिंतीची रचना केलेली आहे. या भिंतीत जंग्या आहेत. किल्ल्याचे प्रवेशव्दार शाबूत आहे. पूर्वाभिमुख प्रवेशव्दारातून आपला किल्ल्यात प्रवेश होतो. प्रवेशव्दाराच्या आत पाहारेकर्यांसाठी देवड्या आहेत. किल्ल्याच्या आत अनेक इमारतींचे अवशेष आहेत. तटबंदीत आणि बुरुजा खाली खोल्या आहेत. एक पाण्याची टाकी आहे. किल्ल्याच्या उत्तरेला एक दरवाजा आहे. या प्रवेशव्दारासमोर सुध्दा संरक्षणासाठी भिंत बांधलेली आहे. किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज बर्यापैकी सुस्थितीत आहेत. त्यावरुन किल्ल्याला प्रदिक्षिणा मारता येते. किल्ल्यावरुन दरोथा आणि दमणगंगा या नद्यांची खोरी दिसतात. या परिसरातला हा सर्वात उंच डोंगर असल्याने खूप मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो.
कसे पोहोचावे
इंद्रगडच्या पायथ्याचे पाली करंबेली गावाचे ते वापी अंतर ११ किलोमीटर आहे. या गावात लक्ष्मी नारायणाचे मंदिर आहे. मंदिरा पासून एक कच्चा रस्ता इंद्रगडावर जातो. या रस्त्याने इंद्रगडावर जाण्यासाठी अर्धा तास लागतो. दमणहून इंद्रगडच्या पायथ्याचे पाली करंबेली गाव ६ किलोमीटर अंतरावर आहे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ पायथ्यापासून अर्धा तास लागतो.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही.
अन्न व्यवस्था
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही.
पाणी उपलब्धता
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही.
सर्वोत्तम काळ
🌤️ जुलै ते मार्च
जवळील गावे
पाली करंबेली
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.