पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला)
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Panhaledurg
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
छत्रपती शिवाजी महाराजांनी रायगड किल्ल्याची स्वराज्याची राजधानी म्हणून निवड केल्यावर, युध्दशास्त्राच्या दृष्टीने तो बळकट करण्यासाठी रायगडाच्या चोहोबाजूंनी किल्ल्र्यांची साखळी तयार केली. मानगड, पन्हाळघर, सोनगड, चांभारगड, लिंगाणा या उपदुर्गांची निर्मिती केली आणि काही जुने गड मजबुत केले. या किल्ल्र्यांच्या साखळीमुळे स्वराज्यावर चालून येणार्या शत्रुला राजधानीवर हल्ला करणे सहजसाध्य नव्हते.
पन्हाळघरचा आटोपशीर आकार पाहाता, त्यावर फारशी शिबंदी नसावी. या किल्ल्याचा उपयोग मुख्यत्वे रायगडाला जाण्याच्या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी / टेहाळणीसाठी केला गेला असावा.
पुण्याचे इतिहास संशोधक सचिन जोशी यांनी केलेल्या संशोधनामुळे हा गड प्रकाशात आला.
![]() |
| Panhaledurg |
महत्त्वाची ठिकाणे
गडाचे बुरुज, प्रवेशद्वार अस्तित्वात नाही आहेत. तटबंदीचे काही अवशेष दिसतात. गडावर पाण्याची एकूण ४ टाकी पहायला मिळतात. गड पहाण्यासाठी साधारणपणे अर्धा तास लागतो.
कसे पोहोचावे
मुंबई - गोवा महामार्गावर माणगाव व महाडच्या मध्ये माणगावपासून ८ किमी वर लोणेरे गाव आहे. लोणेरे गावातून पन्हाळघर हे पन्हाळघरच्या पायथ्याचे गाव ५ किमी वर आहे. पन्हाळघर गावातील बौध्दवाडीच्या मागे पन्हाळघर किल्ला आहे. बौध्दवाडीतून डोंगराच्या सोंडेवरुन साधारण अर्ध्या तासात किल्ल्यावर जाता येते.
१)मानगड; पन्हाळघरला जाण्याचा स्वस्त पर्याय म्हणजे कोकण रेल्वे दिवा(०६:००) मडगाव पॅसेंजर १०:०० वाजता माणगावला पोहोचते. मानगड पाहून झाल्यावर लोणेरे गावाजवळील पन्हाळघर पाहून मडगाव दिवा पॅसेंजर (१७:०० वाजता) गोरेगाव स्थानकात पकडून परत येता येते.
२)स्वत:च्या वाहनाने रात्री प्रवास करुन पहाटे माणगावला पोहचल्यास मानगड, कुर्डूगड, पन्हाळघर एकाच दिवशी पाहाता येतात, पण त्यासाठी वेळेचे काटेकोर नियोजन करावे लागते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ पायथ्याच्या पन्हाळघर बौध्दवाडीतून अर्धा तास लागतो.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
गडाखालील पन्हाळघर गावातील शाळेत रहाण्याची सोय होऊ शकते.
अन्न व्यवस्था
गडावर जेवणाची सोय नाही, लोणेरे आणि माणगाव येथे जेवणाची सोय आहे.
पाणी उपलब्धता
गडावर पिण्याचे पाणी आहे.
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
अतिरिक्त माहिती
१) कुर्डूगड आणि मानगड या किल्ल्र्यांची माहीती साईटवर दिलेली आहे.
जवळील गावे
पन्हाळघर
या परिसरातील इतर किल्ले रायगड
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.
