रायगड
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Jagdishwar Mandir
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
Fort
Fort
प्रस्तावना
महाडच्या उत्तरेस २५ कि.मी. वर असलेला रायगड किल्ला हा चहुबाजूंनी डोंगररांगांनी वेढलेला आहे. याच्या उत्तरेला आणि पूर्वेला काळ नदीचे खोरे पसरलेले आहे, तर पश्चिमेला गांधारी नदी वाहाते. याच्या पूर्वेला लिंगाणा, आग्नेयेला राजगड, तोरणा; दक्षिणेकडे मकरंदगड, प्रतापगड, वासोटा, उत्तरेला कोकणदिवा असा मुलूख दिसतो. रायगडाचा माथा राजधानी बनवण्यास सोयीचा व प्रशस्त आहे. शत्रूला अवघड वाटणार्या प्रदेशातले ते अधिक अवघड ठिकाण आहे. सागरी दळणवळणासही हे ठिकाण जवळ आहे म्हणून महारांजांनी राजधानीसाठी या गडाची निवड केली.
महाराष्ट्रात राहाणार्या प्रत्येक माणसाची एकदा तरी रायगड किल्ला पाहाण्याची इच्छा असते. आता रोप वे मुळे रायगड किल्ला लहानांपासून थोरांपर्यंत सर्वांच्या आवाक्यात आलेला आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
रायगडाचे प्राचीन नाव ’रायरी’ हे होते. युरोपचे लोक त्यास ’पूर्वेकडील जिब्राल्टर’ असे म्हणत असत. जिब्राल्टरचे ठाणे जितके अजिंक्य, तितकाच रायगड अजिंक्य, दुर्गम होता. पाचशे वर्षांपूर्वी जेव्हा त्यास गडाचे स्वरूप नव्हते व तो नुसता एक डोंगर होता, तेव्हा त्यास ’रासिवटा’ व ’तणस’ अशी दोन नावे होती. त्याचा आकार उंची व सभोवतालच्या दर्या यावरून त्यास ’नंदादीप’ असेही नाव होते. निजामशाहीत रायगडाचा उपयोग कैदी ठेवण्यापुरता केला जात असे.
१५ जानेवारी १६५६ रोजी शिवाजी महाराजांनी जय्यत तयारीनीशी जावळीवर हल्ला करुन मोर्यांचा धुव्वा उडवला. मोर्यांचा प्रमुख यशवंतराव मोरे जावळीहून पळून रायगडावर जाऊन राहिला; तर प्रतापराव मोरे विजापूरास पळाला. महाराजांनी ६ एप्रिल १६५६ रोजी रायरीस म्हणजेच रायगडास वेढा घातला व मे महिन्यात रायरी महाराजांच्या ताब्यात आला. कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद खजिना घेऊन विजापूरकडे निघाल्याची बातमी महाराजांना समजली त्यांनी तो खजिना लुटून रायगडावर आणला व त्या खजिन्याचा उपयोग गडाच्या बांधकामासाठी केला.
महाराजांच्या पहिल्या रायगड भेटीचे वर्णन करतांना सभासद बखर म्हणते,
’राजा खासा जाऊन पाहता गड बहुत चखोटा चौतर्फा गडाचे कडे तासिल्याप्रमाणे दिड गांव उंच. पर्जन्यकाळी कडियावर गवत उगवत नाही आणि धोंडा तासीव एकच आहे. दौलताबाद पृथ्वीवर चखोट गड खरा, परंतु तो उंचीने थोडका. दौलताबादचे दशगुणी गड उंच असे देखोन बहुत संतुष्ट झाले आणि बोलिले, तक्तास जागा हाच गड करावा.’
याच दुर्गदुर्गेश्वराला १५ विविध नावांनी संबोधिले गेले आहे
१) रायगड , २) रायरी, ३) इस्लामगड,
४) नंदादीप, ५) जंबुद्विप, ६) तणस,
७) राशिवटा, ८) बदेनूर, ९) रायगिरी,
१०) राजगिरी, ११)भिवगड, १२) रेड्डी,
१३) शिवलंका, १४) राहीर, १५) पूर्वेकडील जिब्राल्टर
शिवराज्याभिषेक हा रायगडाने अनुभवलेला सर्वश्रेष्ठ प्रसंग होय. महाराजांचा राज्याभिषेक म्हणजे, महाराष्ट्राच्याच नव्हे तर भारताच्या इतिहासातील एक लक्षणीय घटना होती.
गडावरील राजसभेत दिनांक ६ जून १६७४, ज्येष्ठ शुद्ध १३ शके १५९६, शनिवार या दिवशी राज्याभिषेक संपन्न झाला. दिनांक २४ सप्टेंबर १६७४, ललिता पंचमी शु. ५ आनंद संवत्सर शके १५९६ या दिवशी तांत्रिक पद्धतीने राजांनी स्वत
:ला आणखी एक राज्याभिषेक करून घेतला. या मागचा खरा हेतू हा जास्तीत जास्त लोकांना समाधान वाटावे हा होता. हा राज्याभिषेक निश्चलपुरी गोसावी याच्या हस्ते पार पडला.
कवी भूषण रायगडाचे वर्णन करतो की, ’शिवाजीने सर्व किल्ल्यांचा आधार व विलासस्थान अशा रायगड किल्ल्यास आपले वसतीस्थान केले. हा किल्ला एवढा प्रचंड आणि विशाल आहे की, त्यात तीनही लोकींचे वैभव साठवले आहे. गडावर विहिरी, सरोवरे, कूप विराजत आहेत. सर्व यवनांना जिंकून रायगडावर राजा शिवाजीने राजधानी केली आणि लोकांचे इच्छित पुरवून जगतात श्रेष्ठ यश संपादन केले.’
इ.स. १६७५ फेब्रुवारी ४, शके १५९६ आनंद संवत्सर माघ व ५ गुरुवार या दिवशी संभाजी राजांची मुंज रायगडावर झाली.शके १६०१ सिद्धार्थी संवत्सर फाल्गुन व २, १६८० मार्च ७ या दिवशी राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी राजाराम महाराजांचे लग्न प्रतापराव गुजर यांच्या मुलीशी झाले.
रायगडाने अनुभवलेला अत्यंत दु
:खद प्रसंग म्हणजे महाराजांचे निधन. शके १६०२ रुद्रनाम संवत्सरे चैत्र शुद्ध पौर्णिमा, हनुमान जयंती, दि ३ एप्रिल १६८० या दिवशी महाराजांचे निधन झाले. सभासद बखर म्हणते, ’ते दिवशी पृथ्वीकंप जाहला अष्टदिशा दिग्दाह होऊन गेल्या श्रीशंभुमहादेवी तळ्याचे उदक रक्तांबर जाले.’
पुढे शके १६०२ रौद्र संवत्सर माघ शु ७, इ.स १६८१, १६ फेब्रुवारी या दिवशी रायगडावर संभाजी महारांजाचे विधिपूर्वक राज्यारोहण झाले.
इ.स. १६८४ च्या सप्टेंबरमध्ये औरंगजेबाने रायगडच्या मोहिमेस सुरुवात केली. शहाबुद्दीन खान यास चाळीस हजार सैन्यासह बादशाहने रायगडाच्या पायथ्याशी धाडले. १५ जानेवारी १६८५ च्या सुमारास शहाबुद्दीने गडाच्या पायथ्याशी असलेल्या एका गावाला आग लावली व लुटालूट चालू केली पण प्रत्यक्ष रायगडावर हल्ला न करता तो १६८५ च्या मार्चमध्ये परतला.
औरंगजेबाने आपला वजीर आसदखान याचा मुलगा इतिकादखान उर्फ झुल्फिकारखान यास सैन्य देऊन रायगड घेण्यास पाठवले. शके १६१० विभव संवत्सर फाल्गुन शु ३, १२ फेब्रुवारी १६८९ रोजी राजाराम महाराजांची कारकीर्द सुरू झाली आणि २५ मार्च १६८९ रोजी खानाने गडास वेढा घातला. दि. ५ एप्रिल १६८९ रोजी राजाराम महाराज रायगडावरून निसटून प्रतापगडावर गेले. पुढे जवळजवळ आठ महिने वेढा चालू होता. पण दि ३ नोव्हेंबर १६८९ रोजी सुर्याजी पिसाळ या किल्लेदाराच्या फितुरीमुळे किल्ला मोगलांना मिळाला. वाईची देशमुखी देण्याचे आमिष दाखवून खानाने त्यास फितुर केले.
झुल्फिकारखान हा बादशाहने इतिकादखानला दिलेला किताब आहे. पुढे रायगडचे नामांतर ’इस्लामगड’ असे झाले. ५ जून १७३३ या दिवशी शाहूमहाराजांच्या कारकिर्दीत रायगड पुन्हा मराठ्यांनी घेतला.
कसे पोहोचावे
१) मुंबई - गोवा मार्गावरील महाड बस स्थानकामधून :-
मुंबई - गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानका बाहेरून जीपगाड्याही जातात. बसने आल्यावर चित् दरवाज्यापाशी, (जो आता अस्तित्वात नाही) जिथे पायर्या सुरू होतात. तेथे उतरून पायर्यांनी गडावर जाता येते. जवळजवळ १५०० पायर्या चढून गेल्यावर महादरवाजातून आपला गडात प्रवेश होतो.
२ नाना दरवाजाकडून :-
नाना दरवाजाकडूनही आपण गड चढू शकतो. पायर्यांकडून जो डांबरी रस्ता पुढे जातो त्या रस्त्याने थोडे पुढे गेल्यावर उजवीकडे एक पायवाट जाते त्या वाटेने गेल्यास नाना दरवाजाने आपण गड चढू शकतो.
३ रोप वे:-
आता गडावर जाण्यासाठी रोपवेची व्यवस्था झाल्याने पायथ्यापासून १० ते १५ मिनिटांत आपण गडावर पोहोचू शकतो.
महत्त्वाची ठिकाणे
रायगड किल्ल्यावर जाण्यासाठी ३ मार्ग आहेत. १) चित दरवाजा, २) नाणे दरवाजा , ३) रज्जू मार्ग (रोप वे). यापैकी चित दरवाजा हा मार्गे मोठ्या प्रमाणावर वापरला जातो.
१) खुबलढा बुरूज :-
चित दरवाजा मार्गे चढतांना, गड चढू लागले म्हणजे एक बुरुजाचे ठिकाण दिसते, तोच हा सुप्रसिद्ध खुबलढा बुरूज. बुरुजाशेजारी एक दरवाजा होता, त्यास ’चित्दरवाजा’ म्हणत. पण हा दरवाजा आता पूर्णपणे उध्वस्त झाला आहे.
२) वाळसुरे खिंड :- खुबलढा बुरूजाच्या पुढे वाळुसरे खिंड आहे.
३) नाना (नाणे) दरवाजा :-
या दरवाजास ’नाणे दरवाजा’ असेही म्हणत. या दरवाजाचा संबंध गैरसमजूतीने नाना फडणिसांशी लावला जातो. नाना दरवाजा याचाच अर्थ लहान दरवाजा आहे. इ.स. १६७४ च्या मे महिन्यात राज्याभिषेकाच्या निमित्ताने इंग्रजांचा वकील हेन्री ऑक्झेंडन याच दरवाजाने आला होता. या दरवाज्यास दोन कमानी आहेत. दरवाज्याच्या आतील बाजूस पहारेकर्यांसाठी दोन लहान खोल्या आहेत, त्यांस ’देवड्या’ म्हणतात. दरवाजास अडसर घालण्यासाठी खोबणी दिसतात.
४) मदारमोर्चा :-
चित्दरवाज्याने गेल्यावर नागमोडी वळणे घेत गेलेल्या रस्त्याने पुढे गेल्यावर एक सपाटी लागते. या मोकळ्या जागेत टोकाशी दोन पडक्या इमारती दिसतात. त्यापैकी एक पहारेकर्यांची जागा असून दुसरे धान्याचे कोठार आहे. येथे मदनशहा नावाच्या साधूचे थडगे आहे. तेथे दोन प्रचंड तोफ़ा आहेत. येथून पुढे गेल्यावर खडकात खोदलेल्या तीन गुहा दिसतात.
५) महादरवाजा :-
महादरवाजाच्या बाहेरील अंगास वर दोन्ही बाजूस दोन सुंदर कमळाकृती कोरल्या आहेत. दरवाज्यावर असणार्या या दोन कमळांचा अर्थ म्हणजे किल्ल्याच्या आत ’श्री आणि सरस्वती’ नांदत आहे. ’श्री आणि सरस्वती’ म्हणजेच ’विद्या व लक्ष्मी’ होय. महादरवाज्याला दोन भव्य बुरूज असून एक ७५ फूट तर दुसरा ६५ फूट उंच आहे. तटबंदीमध्ये जी उतरती भोके ठेवलेली असतात त्यास ’जंग्या’ म्हणतात. शत्रूवर मारा करण्यासाठी ही भोके ठेवलेली असतात. बुरुजांमधील दरवाजा हा वायव्य दिशेस तोंड करून उभा आहे. महादरवाज्यातून आत आल्यावर पहारेकर्यांच्या देवड्या दिसतात. तसेच संरक्षकांसाठी केलेल्या राहण्याच्या खोल्या दिसतात. महादरवाज्यापासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत तर डावीकडे हिरकणी टोकापर्यंत तटबंदी बांधलेली आहे. महादरवाजाच्या वरच्या बाजूला एक पाण्याचे टाक आहे. तिथे जाण्यासाठी सध्या वाट नाही.
६) चोरदिंडी :-
महादरवाजा पासून उजवीकडे टकमक टोकापर्यंत जी तटबंदी जाते, त्यावरून चालत गेल्यास जिथे ही तटबंदी संपते, त्याच्या थोडे अलीकडे बुरुजात ही चोरदिंडी (चोर दरवाजा) बांधलेली आहे. बुरुजाच्या आतून दरवाजापर्यंत येण्यासाठी पायर्या आहेत. या तटबंदीवर काही तोफ़ा आहेत.
७) हनुमान टाक(चांभार टाक) :- किल्ल्यावर आल्यावर डाव्या बाजूला हनुमानाचे शिल्प कोरलेले टाक पाहायला मिळते. य टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे, टाक्याच्या वरच्या बाजूला वास्तूंचे अवशेष आहेत.
८) हत्ती तलाव :-
हनुमान टाक्याच्या जवळ मोठा तलाव आहे त्या तलावाला हत्ती तलाव म्हणतात. तलावाच्या तळाला दरीच्या दिशेला एक दगड बसविलेला होता. उन्हाळ्याच्या शेवटी हा दगड काढून तलाव रिकामा करून साफ केला जात असे. आज हा दगड नसल्यामुळे तलावात पाणी साठत नाही.
९) गंगासागर तलाव:-
हत्ती तलावापासून जवळच रायगड जिल्हा परिषदेच्या धर्मशाळेच्या इमारती दिसतात. धर्मशाळेपासून दक्षिणेकडे अंदाजे ५० - ६० पावले चालत गेल्यास जो तलाव लागतो तो गंगासागर तलाव. महाराज्यांच्या राज्याभिषेकानंतर सप्तसागर व महानद्यांची आणलेली तीर्थे याच तलावात टाकली गेली म्हणूनच याचे गंगासागर असे नाव पडले. शिवकाळात शिबंदीसाठी याचे पाणी वापरण्यात येई.
१०) स्तंभ :-
गंगासागराच्या दक्षिणेस दोन उंच मनोरे दिसतात त्यासच स्तंभ म्हणतात. जगदीश्वराच्या शिलालेखामध्ये ज्या स्तंभांचा उल्लेख केला आहे, ते हेच असावेत. पूर्वीच्या काळी हे मनोरे पाच मजली होते असे म्हणतात. ते द्वादश कोनी असून बांधकामात नक्षीकाम आढळते.
११) पालखी दरवाजा :-
रायगडावरील मनोर्यांच्या (स्तंभांच्या) पश्चिमेस तटबंदीत ३१ पायर्या बांधलेल्या दिसतात. त्या चढून गेल्यावर जो दरवाजा लागतो तो पालखी दरवाजा. या दरवाज्यातून आपल्याला बालेकिल्ल्यात प्रवेश करता येतो.
१२) राजभवन :-
राणीवशाच्या समोर डाव्या हातास दासदासींच्या घरांचे अवशेष दिसतात. या अवशेषांच्या मागे दुसरी जी समांतर भिंत आ.हे त्या भिंतीच्या मध्यभागी जो दरवाजा आहे, तेथून बालेकिल्ल्याच्या अंतर्भागात प्रवेश केला की जो प्रशस्त चौथरा लागतो तेच हे महाराजांचे राजभवन. राजभवनाचा चौथारा ८६ फूट लांब व ३३ फूट रुंद आहे.
१३) रत्नशाळा :-
राजप्रासादा जवळील स्तंभांच्या पूर्वेकडे असलेल्या मोकळ्या जागेत एक तळघर आहे, तीच ही रत्नशाळा. हा खलबनखाना म्हणजेच गुप्त बोलणी करण्यासाठी केलेली खोली असावी असेही म्हणतात.
१४) राजसभा :-
महाराजांचा राज्याभिषेक जेथे झाला, तीच ही राजसभा. राजसभा २२० फूट लांब व १२४ फूट रुंद आहे. येथेच पूर्वेकडे तोंड केलेली सिंहासनाची जागा आहे. येथे बत्तीस मणांचे सोन्याचे सिंहासन होते. सभासद बखर म्हणते, ’तख्त सुवर्णाचे बत्तीस मणांचे सिद्ध करवले नवरत्ने अमोलिक जितकी कोशात होती, त्यामध्ये शोध करून मोठी मोलाची रत्ने जडाव केली. राजसभेला चारही बाजुंनी तटबंदी आणि सिंहासनाच्या समोर भव्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशव्दाराच्यावर असलेल्या कमानयुक्त जागेला नगारखाना म्हणतात. प्रवेशव्दाराच्या देवड्यांमधून याठिकाणी चढून जाण्यासाठी अरुंद आणि काटकोनात वळणार्या पायर्या आहेत. सध्या हा मार्ग पुरातत्व खात्याने बंद केलेला आहे.
१५) मेणा दरवाजा :-
पालखी दरवाज्याने वर प्रवेश केला की, चढ - उतार असलेला एक सरळ मार्ग आपल्याला मेणा दरवाजापर्यंत घेऊन जातो. उजव्या हातास जे सात अवशेष दिसतात, ते आहेत राण्यांचे महाल. राण्याच्या महालात असलेले शौचकुप पाहाण्यासारखे आहेत. मेणा दरवाज्यातून बालेकिल्ल्यावर प्रवेश करता येतो. सध्या रोप वे ने आल्यास आपला मेणा दरवाजातून किल्ल्यावर प्रवेश होतो.
१६)अष्टप्रधानांचे वाडे :-
मेणा दरवाजातून खाली उतरुन डाव्या बाजूला चालत गेल्यास वाड्यांचे चौथरे आणि अवशेष दिसतात त्यांना अष्टप्रधानांचे वाडे म्हणून ओळखले जाते.
१७) कुशावर्त तलाव:-
अष्ट्प्रधानांच्या वाड्यापासून उजवीकडे वळून खाली उतरल्यावर किंवा होळीचा माळ डाव्या हातास सोडून उजवीकडील वाट कुशावर्त तलावाकडे जाते. तलावाजवळ रामेश्वर महादेवाचे छोटेसे देऊळ दिसते. देवळासमोर नंदी दिसतो. मंदिरा समोर दोन समाध्या आहेत. तेथून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक तुळशी वृंदावन आहे. हीच वाट पुढे बारा टाक्यांकडे जाते.
१८) वाघदरवाजा :-
कुशावर्त तलावाजवळून घळीने उतरत वाघ दरवाजाकडे जाता येते. आज्ञापत्रात लिहिले आहे की, ’किल्ल्यास एक दरवाजा थोर आयब आहे, यांकरीता गड पाहून एक दोन - तीन दरवाजे, तशाच चोरदिंड्या करून ठेवाव्या. त्यामध्ये हमेशा राबत्यास पाहिजे तितक्या ठेवून वरकड दरवाजे व दिंड्या चिणून टाकाव्या.’
हे दूरदर्शीपणाचे धोरण ठेऊनच महाराजांनी महादरवाजाशिवाय हा दरवाजा बांधून घेतला. या दरवाज्याने वर येणे जवळजवळ अशक्यच असले तरी दोर लावून खाली उतरू शकतो. पुढे राजाराम महाराज व त्यांची मंडळी झुल्फिरखानाचा वेढा फोडून याच दरवाज्याने निसटली होती.
१९) शिर्काई देऊळ :-
होळीच्या माळावर असलेल्या महाराजांच्या पुतळ्याच्या डाव्या बाजूस जे छोटे देऊळ दिसते ते शिर्काईचे देऊळ शिर्काई ही गडावरील मुख्य देवता होय.
२०) अंबरखाना :-
शिर्काई देवीच्या देवळा समोर असलेल्या इमारतीला अंबरखाना (गजशाळा) म्हणतात.
२१) बाजारपेठ :-
राजसभेच्या महादारतून आपण डावीकडे उतरून आलो की, समोर जी मोकळी जागा दिसते तो ’होळीचा माळ’. तेथेच आता शिवछत्रपतींचा भव्य पुतळा बसवलेला आहे. पुतळ्यासमोर जे दोन रांगांमध्ये भव्य अवशेष दिसतात तीच शिवकाळातील बाजारपेठ होती असे म्हटले जाते. पेठेच्या दोन रांगात प्रत्येकी २२ दुकाने आहेत, मधून जवळजवळ चाळीस फूट रुंद रस्ता आहे. त्यातील एका वास्तूच्या बाहेर सर्पशिल्प कोरलेले आहे.
२२) ब्राम्हण तलाव :-
बाजारपेठेच्या पुढे जगदिश्वर मंदिराकडे जातांना उजव्या बाजूला (पूर्वेकडील उतारावर) ब्राह्मणवस्ती, ब्राह्मणतळे वगैरे अवशेष दिसतात. ब्राम्हण तलावाच्या समोरच्या बाजूला कोठाराचे अवशेष आहेत.
२३) कोळींब तलाव : -
बाजारपेठेच्या पुढे जगदिश्वर मंदिराकडे जातांना डाव्या बाजूला काही वास्तूंचे अवशेष दिसतात. त्यापुढे कोळींब तलाव आहे.
२४) टकमक टोक :-
बाजारपेठेच्या समोरील टेपावरून खाली उतरून टकमक टोकाकडे जाता येते. तेथेच एका दारूच्या कोठाराचे अवशेष दिसतात. जसजसे आपण टोकाकडे जातो तसतसा रस्ता निमुळता होत जातो. उजव्या हाताला सरळ तुटलेला २६०० फूट खोल कडा आहे. टोकावर वारा प्रचंड असतो व जागाही कमी असल्यामुळे गोंधळ न करता सावधानता बाळगावी.
२५) जगदीश्वर मंदिर :-
जे भव्य मंदिर दिसते तेच महादेवाचे म्हणजे जगदीश्वराचे मंदिर आहे. मंदिरासमोर नंदीची भव्य आणि सुबक मूर्ती आहे, पण सध्या ही मूर्ती भग्नावस्थेत आहे. मंदिरात प्रवेश केला की भव्य सभामंडप लागतो. मंडपाच्या मध्यभागी भव्य कासव आहे. गाभार्याच्या भिंतीस हनुमंताची भव्य मूर्ती दिसते. मंदिराच्या प्रवेशद्वाराच्या पायर्यांच्या खाली एक लहानसा शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे,
’सेवेचे ठायी तत्पर हिरोजी इंदुलकर’
या दरवाजाच्या उजव्या बाजूस भिंतीवर एक सुंदर शिलालेख दिसतो तो पुढीलप्रमाणे:
श्री गणपतये नम : ।
प्रासादो जगदीश्वरस्य जगतामानंददोनुज्ञया
श्रीमच्छत्रपते शिवस्यनृपते सिंहासने तिष्ठत :।
शाके षण्णवबाणभूमिगणनादानन्दसंवत्सरे
ज्योतीराजमुहूर्तकिर्तीमहिते शुक्लेशसापै तिथौ ।।१।।
वापीकूपडागराजिरुचिरं रम्यं वनं वीतिकौ
स्तभे कुंभिगृहे नरेन्द्रसदनैरभ्रंलिहे मीहिते ।
श्रीमद्रायगिरौ गिरामविषये हीराजिना निर्मितो
यावन्द्रदिवाकरौ विलसतस्तावत्समुज्जृंभते ।।२।।
याचा थोडक्यात अर्थ पुढीलप्रमाणे,
’सर्व जगाला आनंददायी असा हा जगदीश्वराचा प्रासाद श्रीमद्छत्रपती शिवाजी राजा यांच्या आज्ञेने शके १५९६ मध्ये आनंदनाम संवत्सर चालू असताना सुमुहुर्तावर निर्माण केला. या रायगडावर हिरोजी नावाच्या शिल्पकाराने विहिरी, तळी, बागा, रस्ते, स्तंभ, गजशाळा, राजगृहे आशांची उभारणी केली आहे, ती चंद्रसूर्य असेतोवर खुशाल नांदो.’
२६) महाराजांची समाधी :-
मंदिराच्या पूर्व दरवाजा पासून थोड्या अंतरावर जो अष्टकोनी चौथरा दिसतो तीच महाराजांची समाधी आहे असे सभासद बखर म्हणते,
’क्षत्रियकुलावतंस श्रीमन्महाराजाधिराज शिवाजी महाराज छत्रपती यांचा काल शके १६०२ चैत्र शुद्ध १५ या दिवशी रायगड येथे झाला. देहाचे सार्थक त्याणी बांधिलेला जगदीश्वराचा जो प्रासाद त्याच्या महाद्वाराच्या बाहेर दक्षणभागी केले, तेथे काळ्या दगडाच्या चिर्याचे जोते अष्टकोनी सुमारे छातीभर उंचीचे बांधिले असून वरून फरसबंदी केलेली आहे. फरसबंदीच्या खाली पोकळी आहे, तीत महाराजांचा अवशिष्टांश रक्षामिश्र मृत्तिकारुपाने सापडतो.’
दहनभूमी पलीकडे भग्न इमारतींच्या अवशेषांची एक रांग आहे, ते शिबंदीचे निवासस्थान असावे. त्याच्या पलीकडे सदर वस्तीपासून विलग असा एक घराचा चौथरा दिसतो. हे घर इ.स. १६७४ मध्ये इंग्रज वकील हेन्री ऑक्झेंडन यास राहावयास दिले होते.
२७) बारा टाकी आणि भवानी टोक :-
महाराजांच्या समाधीच्या पूर्वेकडे भवानी टोक आहे. भवानी टोकाकडे जातांना उजवीकडे तलाव आहे, तलावाच्या बाजूला उध्वस्त वास्तू आहेत. तेथून पुढे गेल्यावर दारूची कोठारे, बारा टाकी दिसतात. बारा टाकी पाहून भवानी टोकाकडे जातांना उत्तर दिशेला काळा हौद आणि काही उध्वस्त वास्तू दिसतात. पुढे भवानी टोकाजवळ एक तलाव आहे. भवानी टोकाजवळ एक गुहा आणि त्यामध्ये भवानी मातेचे मंदिर आहे.
२८) हिरकणी टोक :-
गंगासागराच्या उजवीकडे पश्चिमेस जी चिंचोळी वाट जाते, ती हिरकणी टोकाकडे जाते. हिरकणी टोकाशी संबंधित हिरकणी गवळणीची एक कथा सांगितली जाते. या बुरुजावर काही तोफाही ठेवलेल्या दिसतात. बुरुजावर उभे राहिले तर डाव्या हाताला गांधारीचे खोरे, उजव्या बाजूला काळ नदीचे खोरे दिसते. तसेच इथून पाचाड, खुबलढा बुरूज, मशीद मोर्चा ही ठिकाणे तोफेच्या मार्यात आहेत. त्यामुळे युद्धशास्त्राच्या तसेच दृष्टीने ही खूप महत्त्वाची आणि मोक्याची जागा आहे.
Jijamata’s Palace at Pachad
Shivaji Maharaj built this palace for Jijamata in Pachad in her later days, where she preferred to stay instead of high altitude forts. The remnants are intact and there is a memorial of Jijamata. The well where she used to take rest along a stone cut rest is called “Takyachi Vihir”.
Khubladha Buruj
This is a bastion which comes first when we start climbing towards the main entrance. Today very less remains of this bastion. This was named khubladha or “the most fought one” as it is front facing and was the first to take the blows from the enemy
Nana Darwaja
Nana Darwaja or “Nane” Darwaja is a relatively smaller entrance, and is another way to ascend to the top. The framework is can still be seen with the latches for the door and the vestibules for guards.
Madarmorcha (Mashidmorcha)
On the trail from Chitta Darwaja towards Mahadarwaja, we come across the tomb of a fakir called Madanshah. There are few remnants like resting place for guards and a granary here. There is an old canon here and there are 3 stone carved caves.
Maha Darwaja
This is an architectural masterpiece, and only few forts have such secured entrances. This entrance is typically a “Gomukhi” entrance protected by bastions Jai and Vijay, each one being about 70 ft high. The attacking enemy cannot directly march on the door and face the bastions first. The ramparts are built from here to Hirkani point on west and Takmak on east. There are two lotus figures carved on the door, which indicate prosperity and knowledge.
Chordindi
This is a secret entrance which is near the wall which connects Mahadarwaja to Takmak point.
Hatti Talao
As we enter Mahadarwaja, we come across this pond, which is said to be used for bathing elephants.
Gangasagar Talao
When we proceed towards the palaces, we come across the ZP rest houses. Beyond these is this pond which was named Gangasagar because the waters from seven rivers of India which were brought for the coronation ceremony of Shivaji Maharaj were poured into this pond. This is the main source of drinking water today on the fort.
Pillars
There are remnants of 2 pillars before entering the citadel complex of the fort as we proceed ahead of Gangasagar. These pillars were said to be almost 5 storey high and seem majestic from the remaining carvings. These are polygonal with 12 sides and are supposedly mentioned in the stone scripture in Jagdishwar temple complex.
Palkhi Darwaja
Palkhi Darwaja is the north entrance to the citadel after climbing 31 rock stairs. This was intended for men to enter the palace.
Queens Palace
There are six spacious houses on the western side of the citadel called Queens Palace.
Rajbhawan
In front of the Queen’s palace is the palace of Shivaji Maharaj, which is 86 feet long and 33 feet wide. It was said to be built of wooden structure, of which today only the base of pillars remains.
Ratnashala
On the northern side of Rajbhawan is a pillar, adjoining which is a room in the basement which is called “Ratnashala”. This seems to be used as a secret chamber.
Rajsabha
This is the court on the fort which is a huge building, around 220 ft long and 124 ft wide. The throne of Shivaji Maharaj is east facing, and today we can see a memorial there. The coronation ceremony occurred in this place and the majestic throne was meant to be made of 32 maunds of gold (1194 Kg of gold) and studded with diamonds.
Mena Darwaja
Mena Darwaja is the southern entry to the citadel.
Nagaarkhana
Nagaarkhana is the main entry to the court, and as its name suggests, the loft on this building was used to play huge drums or “Nagaare” during certain times in a day. This one is the tallest monument on the fort.
Shirkai Temple
Goddess Shirkai is the deity of the Shirke dynasty, and was worshipped equally by others. If we exit from Nagaarkhana and process towards “Holicha Maal”, we see this temple and further the gallant statue of Shivaji Maharaj.
Kushavarta Talao
Raigad being an important fort, we find multiple cisterns, ponds and lakes here. Kushavarta is one major cistern which lies near “Holicha Maal”, and there is a Shiva temple nearby.
Bajarpeth (Market)
Ahead of Holicha Maal, there is a well-designed complex of medieval shops (as the folklore tells us). This supposed marketplace might be trade centres as per expert historians, where only deals were done and was not a conventional market. These symmetrical structures have 22 rooms on one side and 21 on the other, separated by 40 ft road. Whether these are houses or commercial centres, is a matter of debate amongst experts. There is a snake carved on the outer wall of one of the structures.
Takmak Point
Takmak point is the northwest facing cliff of the fort, which is ahead of Bajarpeth when we go from Holicha Maal. This was supposed to be used as a cliff to punish prisoners by toppling them from the top. This being a narrow part and considering the wind here, one has to be careful at this point.
Jagdishwar Temple
A marked trail towards east takes us to Jagdishwar temple complex. There are remnants of houses and a dried up pond on the sides of the trail. Jagdishwar is a huge Shiva temple with a Nandi in the front. The outer court of the temple is about 128 ft wide and 160 ft long. Inside the temple there is a tortoise carved on the floor. While stepping inside, we can see some letters carved on the step. The meaning of these words is “Hiroji Italkar is at the service of [Shivaji Maharaj]”
On the outer wall of the temple on east side, there is a stone inscription which means – “This majestic building of Jagdishwar which brings happiness to all is built on the word of Shivaji Maharaj on the auspicious muhurtam in Hindu year of 1596. The architect by name Hiroji built all wells, ponds, gardens, roads, pillars, monuments and palaces. These will remain till the sun and moon are there in the skies”.
Shivaji Maharaj Samadhi (Memorial)
This Samadhi is built near the temple entrance on the east. Shivaji Maharaj passed away on the 15th day of first month and year 1602 of Hindu calendar (April 3rd 1680). As per Sabhasad Bakhar, this is built near the very Jagdishwar temple which he created. The memorial is octagonal and the porch is made from black stones. The base is hollow inside, where the ashes of Shivaji Maharaj are kept. There are remnants of a house beyond this in which it is said that Henry Oxendan had stayed.
Bhavani Point
Bhavani point is the eastern cliff of the fort, and we can see Lingana pinnacle on the north east, forts Torna-Rajgad on distant horizon and the Potlya hill on the south.
Wagh Darwaja
This is a tough exit from the fort, to enable escape in case the fort was captured, and a rope would be required to descend from here. This is the route from where Rajaram Maharaj escaped when Zulfikar Khan attacked the fort.
Hirkani Point
Hirkani point is the western point of the fort, and is named after a brave woman by name “Hirkani”. Folklore tells that the woman used to supply milk on the fort during the regime of Shivaji Maharaj. The doors to the fort would be opened at sunrise every day and would be closed at the sunset. Once she was late to return and the doors were closed. The love for her kid in the village compelled her to descend from the fort from the side of western cliff, and reached her home successfully. The story spread through, and Shivaji Maharaj recognized her efforts and bravery by felicitating here. He also strengthened this part so that no one can ascend from here again.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
रायगड किल्ल्यावर राह्ण्याची सोय नाही. पाचाड गावात राहाण्याची सोय आहे.
अन्न व्यवस्था
पायथ्याच्या पाचाड गावी श्री देशमुख यांचे उपहारगृह आहे. पाचाडचा फोन (०२१४५) २७४८४८, ९४२२६८९८९७,९६०४१६१७१८ . गडावरील काही गाईड त्यांच्या घरात जेवणाची सोय करतात.
पाणी उपलब्धता
गंगासागर तलावाचे पाणी आणि हनुमान टाक्यातले पाणी पिण्यासाठी वापरले जाते. २०१५ साली दोनीही पाणीसाठे खराब झालेले आढळले.
या परिसरातील इतर किल्ले रायगड
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा