मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

गगनगड (Gagangad) किल्ल्याची ऊंची :  2500
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: तळ कोकण
जिल्हा : कोल्हापूर श्रेणी : मध्यम
महाराष्ट्राचे ‘‘चेरापूंजी’’ म्हणून ओळखल्या जाणार्‍या गगनबावडा गावात गगनगड उभा आहे. दक्षिण कोकणातील बंदरांमध्ये उतरलेला माल कोकणातील कुडाळ, कणकवली, गगनबावडा घाट मार्गे देशावर जात असे. या घाटावर लक्ष ठेवण्यासाठी १२ व्या शतकात हा किल्ला बांधण्यात आला. नाथपंथीय गैबीनाथांचे हे मुळ स्थान, १९ व्या शतकात गगनगिरी महाराजांच्या वास्तव्यामुळे प्रकाश झोतात आले. गगनगिरी महाराजांच्या मठामुळे आजही गडावर लोकांचा राबता आहे.


Gagangad
22 Photos available for this fort
Gagangad
इतिहास :
गगनगड उभारणीचे श्रेय शिलाहार शाखेतील अखेरचा राजा दुसरा भोज याच्याकडे जाते. राजा भोज याने इ.स ११७५ ते १२०९ पर्यंत राज्य केले पन्हाळा ही त्यांची राजधानी होती. कोल्हापूर परीसरात त्याने १५ किल्ले बांधले. सिंधण यादवने १२०९ मध्ये शिलाहार राजा भोज याचा पराभव केल्यावर गगनगड त्यांच्या ताब्यात गेला. इ.स १३१० मध्ये देवगिरीचा पाडाव झाल्यावर गड दिल्लीच्या अधिपत्याखाली आला. बहामनी राज्याच्या फाळणीनंतर गगनगड आदिलशहाच्या ताब्यात आला. इ.स १६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी हा किल्ला घेतला.
पहाण्याची ठिकाणे :
गगनगड सह्याद्री पठाराच्या टोकावर असल्यामुळे त्याच्या पश्चिमेकडे कोकणात उतरणार्‍या खोल दर्‍या दिसतात. गडाच्या अर्ध्यां उंचीपर्यंत गाडी रस्ता झालेला आहे. गाडीतळापासून गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. पायर्‍यांच्या सुरुवातीला म्हसोबाचे मंदिर आहे. त्यात रेडयाची प्रतिमा आहे. पायर्‍या चढून वर गेल्यावर डाव्या हाताला समोरच दगडातील एक प्रशस्त नैसर्गिक गुहा आहे. गगनगिरी महाराजांचे या गडावर वास्तव्य होते, त्यांनी याच गुहेत तपसाधना केली होती. त्यामुळे या गुहेत त्यांचे मंदिर बनवण्यात आले आहे. गुहेच्या बाहेर कातळात कोरलेली भव्य हनुमंताची प्रतिमा आहे. त्याच्या बाजूला राम, लक्ष्मण, सीता व शंकराची प्रतिमा आहे. गुहेसमोर मठाची कचेरी व भोजन कक्ष आहे. गुहेपासून पायर्‍यांच्या मार्गाने वर चढत गेल्यावर भक्तनिवास व नवग्रह मंदिर आहे. मंदिराजवळील बुरुजावर २ तोफा आहेत. भक्तनिवासापासून वर चढत गेल्यावर आपण मोकळ्या पठारावर प्रवेश करतो. पठारावर डाव्या बाजूस संगमरवरी देऊळ(ध्यानमंदिर) आहे. उजव्याबाजूस शंकराचे पूरातन मंदीर आहे. या मंदीरासमोर उभे राहीले की किल्ल्याच्या सर्वोच्च स्थानावर (बालेकिल्ल्यावर) मशिदीसारखी इमारत दिसते. ती आहे गैबी पिराची कबर किंवा गैबीनाथाची समाधी.गगनगडाच्या बालेकिल्ल्यावर जाण्यासाठी शंकर मंदिराजवळून खोदीव पायर्‍यांचा मार्ग आहे. या मार्गाने आपण १० मिनीटात समाधी पाशी पोहोचतो. तेथून जवळच विठ्ठलाई देवीचे मंदिर व पाण्याची विहिर आहे. या शिवाय बालेकिल्ल्याच्या खालच्या बाजूस जुन्या घरांचे चौथरे व तटबंदीचे अवशेष दिसतात.
पोहोचण्याच्या वाटा :
गगनबावडा गाव कोल्हापूरहून ५५ कि.मी वर आहे. कोल्हापूरहून येथे येण्यासाठी नियमीत बससेवा आहे. याशिवाय कोकणातील वैभववाडी, कणकवली येथून गगनबावडा ५० किमी अंतरावर आहे. कोकणातून कोल्हापूरला जाणार्‍या बसेस गगनबावडा स्थानकात थांबतात. तिथून २ कि.मी ची पक्की सडक गगनगडापर्यंत जाते. गगनगडाच्या जवळजवळ अर्ध्या उंचीपर्यंत गाडीने जाता येते. गाडी तळापासून पायर्‍यांनी गडावर जाण्यास १० मिनीटे लागतात.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय भक्त निवासात होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय (प्रसादाचे जेवण) आहे.
पाण्याची सोय :
गडावर पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
गगनबावडा एस.टी स्थानकातून गडावर चालत जाण्यास ३० मिनीटे लागतात.
सूचना :
गगनगडाचे दरवाजे रात्री ०९:०० ते सकाळी ०५:०० बंद असतात.
श्रेणी: Medium
 आड (Aad)  अचला (Achala)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)
 अजमेरा (Ajmera)  आजोबागड (Ajoba)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)
 अवचितगड (Avchitgad)  बळवंतगड (Balwantgad)  बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)
 भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))  भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))  भामेर (Bhamer)
 भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)  भास्करगड (बसगड) (Bhaskargad)  भवानीगड (Bhavanigad)  भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))
 भोरगिरी (Bhorgiri)  भुदरगड (Bhudargad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  भूपतगड (Bhupatgad)
 भूषणगड (Bhushangad)  बिरवाडी (Birwadi)  बिष्टा (Bishta)  बितनगड (Bitangad)
 चांभारगड (Chambhargad)  चंदन वंदन (Chandan-vandan)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  चौल्हेर (Chaulher)
 चावंड (Chavand)  दातेगड (Dategad)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  धाकोबा (Dhakoba)  धोडप (Dhodap)  द्रोणागिरी (Dronagiri)
 दुंधा किल्ला (Dundha)  दुर्ग (Durg)  गगनगड (Gagangad)  किल्ले गाळणा (Galna)
 गंभीरगड (Gambhirgad)  गंधर्वगड (Gandharvgad)  घनगड (Ghangad)  घारापुरी (Gharapuri)
 घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोसाळगड (Ghosalgad)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))  गोपाळगड (Gopalgad)
 गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  गोवळकोट (Gowalkot)  गुणवंतगड (Gunawantgad)  हडसर (Hadsar)
 हनुमंतगड (Hanumantgad)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))  हरगड (Hargad)  हरिहर (Harihar)
 हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  हातगड (Hatgad)  हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)  होन्नुर किल्ला (Honnur Fort)
 इंद्रगड (Indragad)  इंद्राई (Indrai)  ईरशाळ (Irshalgad)  जंगली जयगड (Jangli Jaigad)
 जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad))  जंजिरा (Janjira)  जवळ्या (Jawlya)  जीवधन (Jivdhan)
 कैलासगड (Kailasgad)  कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad))  काळदुर्ग (Kaldurg)  कळसूबाई (Kalsubai)
 कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))  कमळगड (Kamalgad)  कामणदुर्ग (Kamandurg)  कनकदुर्ग (Kanakdurg)
 कांचन (Kanchan)  कण्हेरगड (Kanhergad)  कंक्राळा (Kankrala)  कर्‍हा (Karha)
 कर्नाळा (Karnala)  कात्रा (Katra)  कावनई (Kavnai)  केंजळगड (Kenjalgad)
 खांदेरी (Khanderi)  कोहोजगड (Kohoj)  कोकणदिवा (Kokandiva)  कोळदुर्ग (Koldurg)
 कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  कोंढवी (Kondhavi)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  कोर्लई (Korlai)
 कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)  लळिंग (Laling)  लोहगड (Lohgad)
 महिमानगड (Mahimangad)  महिमतगड (Mahimatgad)  महिपालगड (Mahipalgad)  महिपतगड (Mahipatgad)
 माहुली (Mahuli)  माहूर (Mahurgad)  मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)  मंडणगड (Mandangad)
 मानगड (Mangad)  मंगळगड (Mangalgad)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  माणिकदूर्ग (Manikdurg)
 माणिकगड (Manikgad)  मणिकपूंज (Manikpunj)  मांजरसुभा (Manjarsubha Fort)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)
 मार्कंड्या (Markandeya)  मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))  मोहनगड (Mohangad)  मोरागड (Moragad)
 मोरधन (Mordhan)  मृगगड (Mrugagad)  मुडागड (Mudagad)  मुल्हेर (Mulher)
 नाणेघाट (Naneghat)  नारायणगड (Narayangad)  निमगिरी (Nimgiri)  पाबरगड (Pabargad)
 पद्‌मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa))  पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan))  पालगड (Palgad)  पांडवगड (Pandavgad)
 पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)  पारगड (Pargad)  पारनेरा किल्ला (Parnera Fort)
 पर्वतगड (Parvatgad)  पाटेश्वर (Pateshwar)  पट्टागड (Patta)  पेब (विकटगड) (Peb)
 पेडका (Pedka)  पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad))  पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))  पिंपळा (Pimpla)
 पिसोळ किल्ला (Pisol)  प्रबळगड (Prabalgad)  प्रेमगिरी (Premgiri)  पुरंदर (Purandar)
 रायगड (Raigad)  रायकोट (Raikot)  रायरेश्वर (Raireshwar)  राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)
 राजधेर (Rajdher)  राजगड (Rajgad)  राजमाची (Rajmachi)  रामदरणे (Ramdarne)
 रामगड (Ramgad)  रामसेज (Ramshej)  रामटेक (Ramtek)  रांगणा (Rangana)
 रांजणगिरी (Ranjangiri)  रसाळगड (Rasalgad)  रतनगड (Ratangad)  रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))
 रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)  रोहीडा (Rohida)  रोहिलगड (Rohilgad)  सडा किल्ला (Sada Fort)
 सदाशिवगड (Sadashivgad)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सज्जनगड (Sajjangad)  साल्हेर (Salher)
 सालोटा (Salota)  सामानगड (Samangad)  संतोषगड (Santoshgad)  सप्तश्रुंगी (Saptashrungi)
 सरसगड (Sarasgad)  सेगवा किल्ला (Segawa)  शिवगड (Shivgad)  शिवनेरी (Shivneri)
 सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))  सिंहगड (Sinhagad)  सोंडाई (Sondai)  सोनगड (Songad)
 सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))  सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))  सुमारगड (Sumargad)  सुरगड (Surgad)
 सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))  सूवर्णदूर्ग (Suvarnadurg)  ताहुली (Tahuli)  टकमक गड (Takmak)
 तळगड (Talgad)  तांदुळवाडी (Tandulwadi)  टंकाई (टणकाई) (Tankai)  थाळनेर (Thalner)
 तिकोना (Tikona)  तोरणा (Torna)  त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad)  त्रिंगलवाडी (Tringalwadi)
 तुंग (Tung)  उंबरखिंड (Umberkhind)  उंदेरी (Underi)  वैराटगड (Vairatgad)
 वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वर्धनगड (Vardhangad)  वारुगड (Varugad)  वसंतगड (Vasantgad)
 वासोटा (Vasota)  वेताळगड (Vetalgad)  वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विलासगड (Vilasgad (Mallikarjun))
 विसापूर (Visapur)  विशाळगड (Vishalgad)