मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

इंद्राई (Indrai) किल्ल्याची ऊंची :  4490
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: अजंठा सातमाळ
जिल्हा : नाशिक श्रेणी : मध्यम
नाशिक जिल्ह्यात सह्याद्रीची एक डोंगररांग सुरगणा पासून चालू होते आणि चांदवड पर्यंत येऊन संपते. पुढे तीच मनमाडच्या जवळ असणार्‍या अंकाइ किल्ल्यापर्यंत जाते. याच रांगेला अजंठा - सातमाळ रांग म्हणतात. चांदवड तालुक्यात ४ किल्ले येतात, राजधेर, कोळधेर, इंद्राई आणि चांदवड .
20 Photos available for this fort
Indrai
पहाण्याची ठिकाणे :
राजधेरवाडी किंवा वडबारे मार्गे गड चढतांना आपण कातळ भिंतीपाशी येऊन पोहोचतो. या कातळकड्यापाशी कातळात खोदलेल्या २ गुहा आहेत. यापैकी एका गुहेत पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. हि कातळभिंत कोरुन गडावर जाण्याचा मार्ग बनविलेला आहे. याची रचना एका बाजूने कापलेल्या नळी सारखी आहे. या मार्गावरून चालतांना आपल्या माथ्यावर कातळभिंतीचे छत असते. या मार्गाने ५० पायर्‍या चढून गेल्यावर वाट काटकोनात वळते. येथे कातळ फोडून खिंडी सारखी रचना केलेली आहे. या मार्गाने अंदाजे १०० पायर्‍या चढून गेल्यावर प्रवेशद्वाराच्या अलिकडेच डाव्या बाजूच्या कातळात कोरलेला फारसीतील शिलालेख पाहायला मिळतो. गडाच्या प्रवेशद्वाराचे अवशेष केवळ आजमितिस शिल्लक आहेत. प्रवेशद्वारातून गडावर प्रवेश केरुन पुन्हा थोडी चढाइ केल्यावर समोरच्या बाजूस व उजवीकडे कातळात खोदलेल्या गुहा दिसतात. याच ठिकाणी तीन वाटा फूटतात. प्रथम उजवीकडची वाट पकडावी थोड्याच अंतरावर कातळात खोदलेल्या गुहांची रांग दिसते. येथून समोर राजधेर व डावीकडे कोळधेर किल्ला दिसतो. दूरवर धोडप, इखारा, कांचना, रवळ्या-जावळ्या इत्यादी किल्ले दिसतात. या सर्व गोष्टी पाहून परत मागे फिरावे. नंतर वर जाणारी वाट पकडावी. थोडे अंतर चढून बुजलेले पाण्याचे टाक आणि वास्तुचे अवषेश पाहायला मिळतात. येथून सरळ वर चढत जाणारी वाट गडाच्या सर्वोच्च टोकावर जाते. तर वास्तुच्या बाजुने खाली उतरणारी वाट पकडून गेल्यास कातळात खोदलेले महादेवाचे मंदिर लागते. मंदिरासमोर दगडात बांधून काढलेला तलाव आहे. मंदिराच्या बाजूला कातळात खोदलेली अरुंद गुहा आहे. मंदिरावरुन पुढे जाणार्‍या वाटनेही गडाच्या सर्वोच्च टोकावर जाता येते .महादेवाचे दर्शन घेऊन परत मागे फिरावे आणि आता डावीकडची वाट पकडावी. थोडे पुढे गेल्यावर कातळात खोदलेल्या १८ ते २० गुहांची रांग दिसते.या गुहांमध्ये कोण्त्याही प्रकारचे कोरीवकाम आढळत नाही. यापैंकी काही गुहा राहण्यासाठी योग्य आहेत. गुहेंच्या रांगेच्या शेवटी बारमाही पिण्याच्या पाण्याचे टाके आहे. येथून समोर २ शिखरे असलेला डोंगर दिसतो, त्याला दोन रोडग्यांचा डोंगर असे म्हणतात. या डोंगराच्या मागे नाशिक - धुळे महामार्ग आणि त्याच्या मागे चांदवड किल्ला दिसतो. पिण्याच्या पाण्याच्या टाक्याच्या बाजूला एक सुकलेले टाक आहे.पिण्याच्या पाण्याचे टाके व गुहंमधील कातळावर पायर्‍या खोदलेल्या आहेत. या पायर्‍या चढून डाव्या बाजूने गेल्यास आपण महादेवाच्या मंदिरा समोरील तळ्याजवळ पोहोचतो.
पोहोचण्याच्या वाटा :
१) राजधेरवाडी मार्गे :-
चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी आणि राजधेरवाडीत उतरावे. वडबारे गावाच्या पुढे राजधेरवाडी आहे. राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. राजधेरवाडी गावामागे इंद्राई किल्ला आहे. गावातून एक कच्चा रस्ता इंद्राई किल्ल्याच्या डोंगराकडे जातो. वाटेत एक ओढा ओलांडावा लागतो. मळलेल्या पायवाटेने सुमारे अर्धा तास चढाइ केल्यावर एक पठार लागते. येथून कातळ भिंतीच्या डाव्या टोकापर्यंत पोहोचण्यास सुमारे १ तास लागतो. किल्ल्याच्या कातळकड्यापाशी वडबारे गावातून येणारी वाट येऊन मिळते. कातळकड्यापाशी पोहोचल्यावर त्याला वळसा घालून राजधेरवाडी गावाच्या विरुध्द दिशेला गेल्यावर, कातळात खोदलेल्या पायर्‍यांची वाट आपल्याला गडावर घेऊन झाते. या वाटेने किल्ला गाठण्यास २ ते ३ तास लागतात.

२) वडबारे मार्गे :-
चांदवडहून राजधेरवाडी कडे जाणारी बस पकडावी. चांदवड पासून ६ किंमी अंतरावर असणार्‍या वडबारे गावात उतरावे. वडबारे गावातून किल्ल्यावर जाण्यासाठी एक ठळक पायवाट आहे. या वाटेने किल्ल्यावर जातांना एक झाप लागतो. ही वाट किल्ल्याच्या कातळकड्यापाशी राजधेरवाडीतून येणार्‍या वाटेला येऊन मिळते. गावातून किल्ल्यावर पोहचण्यास ३ तास लागतात.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्यासाठी गुहा आहेत, तसेच महादेव मंदिरात ५ जणांची राहण्याची सोय होते.
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नसल्याने ती आपण स्वत:च करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर बारामही पिण्याचे पाण्याचे टाके आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वडबारे गावातून ३ तास लागतात. राजधेरवाडी गावातून २ ते ३ तास लागतात.
सूचना :
१) राजधेरवाडी हे राजधेर व इंद्राई किल्ल्यांच्या पायथ्याचे गाव आहे. त्यामुळे येथे २ दिवस मुक्काम करून दोनही किल्ले पाहाता येतात. तसेच तिसर्‍या दिवशी राजधेर ते कोळधेर हा ट्रेक करता येतो. त्यासाठी गावातून वाटाड्या घेणे आवश्यक आहे. राजधेर - कोळधेर - राजधेरवाडी हा ट्रेक करण्यास साधारणतः १० ते १२ तास लागतात.
२) राजधेर किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे.
प्रकार: Hill forts
 आड (Aad)  अचला (Achala)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)
 अजमेरा (Ajmera)  आजोबागड (Ajoba)  अलंग (Alang)  अंजनेरी (Anjaneri)
 अंकाई(अणकाई) (Ankai)  अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)
 बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बल्लाळगड (Ballalgad)  बळवंतगड (Balwantgad)  बांदा किल्ला (Banda Fort)
 बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)  भगवंतगड (Bhagwantgad)  भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))
 भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))  भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))  भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))  भामेर (Bhamer)
 भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)  भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))  भरतगड (Bharatgad)  भास्करगड (बसगड) (Bhaskargad)
 भवानगड (Bhavangad)  भवानीगड (Bhavanigad)  भिलाई (Bhilai Fort)  भीमाशंकर (Bhimashankar)
 भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  भोरगिरी (Bhorgiri)  भुदरगड (Bhudargad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))
 भूपतगड (Bhupatgad)  भूषणगड (Bhushangad)  बिरवाडी (Birwadi)  बिष्टा (Bishta)
 बितनगड (Bitangad)  चांभारगड (Chambhargad)  चंदन वंदन (Chandan-vandan)  चंदेरी (Chanderi)
 चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat)  चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad))  चौल्हेर (Chaulher)  चावंड (Chavand)
 दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  दातेगड (Dategad)  दौलतमंगळ (Daulatmangal)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))
 डेरमाळ (Dermal)  देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  ढाकचा बहिरी (Dhak-Bahiri)  धाकोबा (Dhakoba)
 धारावी किल्ला (Dharavi Fort)  धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोडप (Dhodap)
 धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)
 दुर्ग (Durg)  गडगडा (घरगड) (Gadgada (Ghargad))  गगनगड (Gagangad)  किल्ले गाळणा (Galna)
 गंभीरगड (Gambhirgad)  गंधर्वगड (Gandharvgad)  गाविलगड (Gavilgad)  घनगड (Ghangad)
 घारापुरी (Gharapuri)  घोडबंदरचा किल्ला (Ghodbunder Fort)  घोसाळगड (Ghosalgad)  घोटवडा किल्ला (गोतारा किल्ला) (Ghotawada Fort (Gotara))
 गोपाळगड (Gopalgad)  गोरखगड (Gorakhgad)  गोरखगड(मनमाड) (Gorakhgad(Manmad))  गोवळकोट (Gowalkot)
 गुणवंतगड (Gunawantgad)  हडसर (Hadsar)  हनुमंतगड (Hanumantgad)  हनुमंतगड (निमगिरी) (Hanumantgad(Nimgiri))
 हरगड (Hargad)  हरिहर (Harihar)  हरिश्चंद्रगड (Harishchandragad)  हातगड (Hatgad)
 हटकेश्वर ते लेण्याद्री (Hatkeshwar to Lenyadri)  होन्नुर किल्ला (Honnur Fort)  इंद्रगड (Indragad)  इंद्राई (Indrai)
 ईरशाळ (Irshalgad)  जंगली जयगड (Jangli Jaigad)  जंजाळा (वैशागड) (Janjala (Vaishagad))  जंजिरा (Janjira)
 जवळ्या (Jawlya)  जीवधन (Jivdhan)  कैलासगड (Kailasgad)  काकती किल्ला (Kakati Fort)
 कलाडगड (Kaladgad)  कलानिधीगड (कलानंदीगड) (kalanidhigad (kalanandigad))  काळदुर्ग (Kaldurg)  कळसूबाई (Kalsubai)
 कल्याणगड (नांदगिरी) (Kalyangad(Nandgiri))  कमळगड (Kamalgad)  कामणदुर्ग (Kamandurg)  कांचन (Kanchan)
 कण्हेरगड (Kanhergad)  कन्हेरगड(चाळीसगाव) (Kanhergad(Chalisgaon))  कंक्राळा (Kankrala)  कर्‍हा (Karha)
 कर्नाळा (Karnala)  कात्रा (Katra)  कावनई (Kavnai)  केंजळगड (Kenjalgad)
 खारेपाटण (Kharepatan fort)  कोहोजगड (Kohoj)  कोकणदिवा (Kokandiva)  कोळदुर्ग (Koldurg)
 कोळकेवाडी दूर्ग (Kolkewadi)  कोंढवी (Kondhavi)  कोरीगड (कोराईगड) (Korigad)  कोर्लई (Korlai)
 कुलंग (Kulang)  कुंजरगड (कोंबडगड) (Kunjargad(Kombadgad))  कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad)  लहुगड (Lahugad)
 लळिंग (Laling)  लिंगाणा (Lingana)  लोहगड (Lohgad)  लोंझा (Lonza)
 मदनगड (Madangad)  महादेवगड (Mahadevgad)  महिमानगड (Mahimangad)  महिमतगड (Mahimatgad)
 महिपालगड (Mahipalgad)  महिपतगड (Mahipatgad)  माहुली (Mahuli)  माहूर (Mahurgad)
 मलंगगड (Malanggad)  मल्हारगड (सोनोरी) (Malhargad)  मंडणगड (Mandangad)  मानगड (Mangad)
 मंगळगड (Mangalgad)  मांगी - तुंगी (Mangi-Tungi)  माणिकदूर्ग (Manikdurg)  माणिकगड (Manikgad)
 मणिकपूंज (Manikpunj)  मांजरसुभा (Manjarsubha Fort)  मनोहर-मनसंतोष गड (Manohar-Mansantoshgad)  मार्कंड्या (Markandeya)
 मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir))  मोहनदर (शिडका) किल्ला (Mohandar(Shidaka))  मोहनगड (Mohangad)  मोरागड (Moragad)
 मोरधन (Mordhan)  मोरगिरी (Morgiri)  मृगगड (Mrugagad)  मुल्हेर (Mulher)
 नागलाबंदर किल्ला (Nagla bunder Fort)  नाणेघाट (Naneghat)  नारायणगड (Narayangad)  नारायणगड (आंबोली) (Narayangad(Amboli))
 नरनाळा (Narnala)  न्हावीगड (Nhavigad)  निमगिरी (Nimgiri)  निवतीचा किल्ला (Nivati Fort)
 पाबरगड (Pabargad)  पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort)  पदरगड (Padargad)  पालगड (Palgad)
 पांडवगड (Pandavgad)  पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg)  पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort)  पन्हाळगड (Panhalgad)
 पारडी किल्ला (Pardi Fort)  पारगड (Pargad)  पारनेरा किल्ला (Parnera Fort)  पर्वतगड (Parvatgad)
 पाटेश्वर (Pateshwar)  पट्टागड (Patta)  पेब (विकटगड) (Peb)  पेडका (Pedka)
 पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad))  पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad))  पिलीवचा किल्ला (Piliv Fort)  पिंपळा (Pimpla)
 पिंपळास कोट (Pimplas Kot)  पिसोळ किल्ला (Pisol)  प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley)  प्रबळगड (Prabalgad)
 प्रचितगड (Prachitgad)  प्रतापगड (Pratapgad)  प्रेमगिरी (Premgiri)  पुरंदर (Purandar)
 रायगड (Raigad)  रायकोट (Raikot)  रायरेश्वर (Raireshwar)  ऱाजापूरची वखार (Rajapur Fort (British warehouse))
 राजदेहेर (ढेरी) (Rajdeher)  राजधेर (Rajdher)  राजगड (Rajgad)  राजहंसगड (येळ्ळूरचा किल्ला) (Rajhansgad (Yellur Fort))
 राजमाची (Rajmachi)  रामदरणे (Ramdarne)  रामदुर्ग (Ramdurg)  रामगड (Ramgad)
 रामसेज (Ramshej)  रामटेक (Ramtek)  रांगणा (Rangana)  रांजणगिरी (Ranjangiri)
 रसाळगड (Rasalgad)  रतनगड (Ratangad)  रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg))  रत्नदुर्ग ( भगवतीचा किल्ला ) (Ratnadurg)
 रवळ्या (Rawlya)  रिवा किल्ला (Riwa Fort)  रोहीडा (Rohida)  रोहिलगड (Rohilgad)
 सडा किल्ला (Sada Fort)  सदाशिवगड (Sadashivgad)  सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad)  सज्जनगड (Sajjangad)
 साल्हेर (Salher)  सालोटा (Salota)  सामानगड (Samangad)  सामराजगड (Samrajgad)
 सांदण व्हॅली व करोली घाट (Sandan Valley - Karoli Ghat)  सांकशीचा किल्ला (Sankshi)  संतोषगड (Santoshgad)  सप्तश्रुंगी (Saptashrungi)
 सरसगड (Sarasgad)  सेगवा किल्ला (Segawa)  शिवडीचा किल्ला (Sewri Fort)  शिवगड (Shivgad)
 शिवनेरी (Shivneri)  शिवथरघळ (Shivtharghal)  सिध्दगड ( मालवण ) (Siddhagad (Malvan))  सिंहगड (Sinhagad)
 सायनचा किल्ला(शीव किल्ला) (Sion Fort)  सोंडाई (Sondai)  सोनगड (Songad)  सोनगिर (धुळे) (Songir (Dhule))
 सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat))  सुधागड (Sudhagad)  सुमारगड (Sumargad)  सुरगड (Surgad)
 सुतोंडा (नायगावचा किल्ला) (Sutonda(Naigaon Fort))  ताहुली (Tahuli)  तैलबैला (Tailbaila)  टकमक गड (Takmak)
 तळगड (Talgad)  तांदुळवाडी (Tandulwadi)  टंकाई (टणकाई) (Tankai)  तेरेखोलचा किल्ला (Terekhol Fort)
 थाळनेर (Thalner)  तिकोना (Tikona)  तोरणा (Torna)  त्रिंबकगड (ब्रम्हगिरी) (Trimbakgad)
 त्रिंगलवाडी (Tringalwadi)  तुंग (Tung)  उदगीर (Udgeer)  उंबरखिंड (Umberkhind)
 वैराटगड (Vairatgad)  वज्रगड(वसई) (Vajragad (Vasai))  वल्लभगड (हरगापूरचा किल्ला) (Vallabhgad(Hargapur))  वर्धनगड (Vardhangad)
 वारुगड (Varugad)  वसंतगड (Vasantgad)  वासोटा (Vasota)  वेताळगड (Vetalgad)
 वेताळवाडी गड (Vetalwadi gad)  विलासगड (Vilasgad (Mallikarjun))  विसापूर (Visapur)  विशाळगड (Vishalgad)
 यशवंतगड (रेडीचा किल्ला) (Yashawantgad (Redi Fort))  यशवंतगड(नाटे) (Yashwantgad(Nate))