अमरावतीचा किल्ला
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Amravati Fort
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
अमरावतीचे पुरातन नाव औदुंबरावती होते, ते प्राकृतमध्ये उंबरावती होते. शिवाय हिला प्राचीन काळी इंद्रपुरी म्हणून ओळखले जायचे. या गावातील ऐतिहासिक अवशेष सध्या गावाच्या दाट वस्तीत विखुरलेले आहेत.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
जुनी अमरावती येथील भगवान आदिनाथ ऋषभनाथ यांच्या संगमवरी मूर्तीच्या पायथ्याशी असलेल्या शिलालेखावर अमरावती या नावाचा पहिल्यांदा उल्लेख आढळतो. या मूर्ती इ.स. १०९७ मधील आहेत.
अमरावतीचा किल्ला साधारणपणे २०० वर्षापूर्वी बांधला गेला. अमरावती ही बाजारपेठ होती. पेंढारी व दरोडेखोरांकडून वारंवार होणार्या हल्ल्यापासून संरक्षण करण्यासाठी अमरावतीचा किल्ला इसवीसन १८०५ ते १८२१ मध्ये बांधला गेला.
महत्त्वाची ठिकाणे
अमरावती गावात असलेल्या दाट लोकवस्तीत त्याचे दरवाजे आहेत. या दरवाजातून सध्या रस्ते काढलेले आहेत. यात जवाहर गेट आणि अंबा गेट हे दोन मुख्य दरवाजे आहेत. जवाहर दरवाजाचे मुळ नाव भूसारी दरवाजा असे होते. स्वातंत्र्या नंतर या प्रवेशव्द्राराचे नामकरण जवाहर गेट करण्यात आले. प्रवेशव्दारांचे लाकडी दरवाजे त्यावरील खिळे आजही शाबूत आहेत. याशिवाय खोलापूरी प्रवेशव्दार पाहाता येते . त्याच्या बाजूचे बुरुज मात्र आज अस्तित्वात नाहीत .प्रवेशव्दाराच्या आत देवड्या होत्या, त्यातील काही देवड्यांमध्ये सध्या दुकान आहेत. तटबंदी किल्ल्याला चार छोटे दरवाजे होते . त्याला इथे खिडकी म्हणतात. पटेल खिडकी (मदिना गेट) , छत्रपुरी खिडकी (भोलेश्वर व्दार), माता खिडकी , खुणारी खिडकी अशा चार खिडक्या या किल्ल्याला होत्या . त्यापैकी सध्या पटेल खिडकी (मदिना गेट) , छत्रपुरी खिडकी (भोलेश्वर व्दार) अस्तिस्त्वात आहेत. किल्ल्याची तटबंदी ३.५ किलोमीटर होती ती आता जागोजागी पाहाता येते . किल्ल्याला २१ बुरुज होते. त्यातील काही बुरुज सुस्थितीत असून तेही पाहाता येतात. इतवारा ते गांधी चौक या भागातील तटबंदी आणि बुरुज व्यवस्थित आहेत.
कसे पोहोचावे
अमरावती हे महत्वाचे शहर रेल्वे स्थानक असून रस्त्याने सर्व शहरांशी जोडलेले आहे.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
राहाण्याची सोय अमरावती मध्ये आहे.
अन्न व्यवस्था
जेवणाची सोय अमरावती मध्ये आहे.
पाणी उपलब्धता
पाण्याची सोय अमरावतीमध्ये आहे.
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
जवळील गावे
अमरावती
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.