खुबलढा किल्ला (थळचा किल्ला)
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Khubladha Fort (Thal Fort)
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
उंदेरी या जलदुर्गावर करडी नजर ठेवून असलेला किल्ला थळ गावाच्या समुद्रकिनार्यावर होता. हा किल्ला म्हणजे थळचा किल्ला किंवा खुबलढा किल्ला होय. खांदेरी किल्ल्याच्या उभारणीच्यावेळी व उभारणी नंतरही या किल्ल्याने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली होती.
ऐतिहासिक पार्श्वभूमी
थळच्या किनार्यावर असणार्या नैसर्गिक उंचवट्यावर खुबलढा किल्ला उभा होता. इ.स १६५९ मध्ये शिवाजी महाराजांनी खांदेरी किल्ला बांधण्यास सुरुवात केल्यावर या किल्ल्याला महत्व आले. खांदेरी किल्ल्यातील सैनिक व मजूरांना रसद, बांधकामाची इतर सामुग्री पुरवण्याची जबाबदारी थळच्या किल्ल्यावर होती. तसेच इंग्रज व सिद्दी यांच्यापासून नवीन तयार होणार्या किल्ल्याचे जमिनीकडील बाजूकडून संरक्षण करण्याची जबाबदारी थळ किल्ल्यावर होती. इ.स १७४९ मध्ये सिद्दीने हा किल्ला जिंकला. पुढे १७५० मध्ये मानाजी आंग्रे याने हा किल्ला परत जिंकून घेतला. या युध्दात सिद्दीची २०० माणसे मारली गेली. पुढे - पुढे मराठ्यांना थळच्या किल्ल्याचे रक्षण करणे जिकरीचे झाले. त्यामुळे त्यांनी किल्ला मोडून त्यावरील तोफा कुलाबा किल्ल्यावर पाठवल्या.
महत्त्वाची ठिकाणे
थळ गावाच्या समुद्रकिनार्या वरील उंचवट्यावर हा किल्ला होता. आता किल्ल्याच्या भिंतीचे काही अवशेष आहेत. बाकी पहाण्यासारखे काही उरलेले नाही.
कसे पोहोचावे
अलिबागहून ५ कि.मी वरील थळ गावाच्या समुद्रकिनार्यावरील उंचवट्यावर हा किल्ला होता. आता किल्ल्याच्या भिंतीचे काही अवशेष आहेत. बाकी पहाण्यासारखे काही उरलेले नाही. खांदेरी - उंदेरी किल्ले पहाण्यासाठी थळला जावेच लागते, तेव्हा या इतिहासात लुप्त झालेल्या किल्ल्याची मोक्याची जागा पाहाता येते.
ट्रेकसाठी लागणारा वेळ
⏱️ N/A
सुविधा व सोयी
सर्वोत्तम काळ
🌤️ N/A
अतिरिक्त माहिती
१) खांदेरी, उंदेरी व खुबलढा किल्ल्याचे अवशेष एका दिवसात पाहाता येतात.
२) खांदेरी, उंदेरीची माहिती साईटवर दिलेली आहे. तसेच भरती ओहटीचे वेळापत्रक साईटवरील कुलाबा किल्ला व सर्जेकोट किल्ल्याच्या माहिती मध्ये दिलेले आहे.
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा
किल्ले स्वच्छ ठेवा
किल्ल्यांवर कचरा करू नका. किल्ल्यांची आणि निसर्गाची हानी करू नका.