पाचाड कोट
किल्ल्याची छायाचित्रे
किल्ल्याची विविध छायाचित्रे पहा
Pachad Fort
नकाशे व मार्ग
किल्ल्यापर्यंत पोहोचण्यासाठी सविस्तर नकाशे आणि ट्रेकिंग मार्ग पहा
सध्या कोणतेही नकाशे उपलब्ध नाहीत
सर्व नकाशांचा संग्रह पहाप्रस्तावना
छत्रपती शिवाजी महाराजांनी ऱायगड किल्ल्याच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावात कोटाची निर्मिती केली . जिजामातांना रायगडावरील हवा मानवत नसल्याने त्यांचे वास्तव्य पाचाड कोटात होते. आजही पाचाड गावात या कोटाचे अवशेष पाहायला मिळतात . पाचाड कोट आणि जिजामाता स्मारक ही पाचाड मध्ये असलेली दोन महत्वाची ठिकाण रायगड किल्ल्याबरोबर आवर्जून पाहावीत अशी आहेत .
कसे पोहोचावे
१) मुंबई - गोवा मार्गावरील महाड बस स्थानकामधून :-
मुंबई - गोवा मार्गावरील महाड या बस स्थानकामधून रायगडासाठी बसेस सुटतात. तसेच बस स्थानका बाहेरून जीपगाड्याही जातात. या गाड्यांनी पाचाडला उतरुन १० मिनिटात चालत पाचाड कोटापर्यंत जाता येते.
महत्त्वाची ठिकाणे
पाचाड कोटाच्या प्रवेशव्दाराच्या बाजूला दोन भव्य बुरुज आहेत . प्रवेशद्वारातून किल्ल्यात प्रवेश केल्यावर दोन्ही बाजूला पहारेकऱ्यांसाठी असलेल्या देवड्या आहेत . किल्ल्यात अनेक घरांची जोती आहेत . त्यात सदरेचे जोते आणि त्याच्या मागच्या बाजूला असलेले जिजामातेच्या वाड्याचे जोते आकाराने मोठे आहे . काही जोत्यांमधून तळघरात उतरणारा जीना पाहायला मिळतो.
कोटात दोन विहीरी असून त्यातील एका विहीऱीत उतरण्यासाठी प्रवेशद्वार आहे. त्यावरील दगड तक्क्याच्या किंवा लोढाच्या आकाराचा आहे म्हणून या विहिरीला तक्क्याची विहिर किंवा लोडबाव म्हणतात . या विहिरीत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत. या विहीरीच्या मागच्या बाजूला अजून एक विहीर असून त्यालाही प्रवेशद्वार आणि आत उतरण्यासाठी पायऱ्या आहेत . दोन्ही विहीरीमध्ये आजही पाणी आहे . कोटात दोन दगडी ढोणी आहेत . कोट चौकोनी आकाराचा असून त्याला १६ बुरुज आहेत . फांजीवर जाण्यासाठी तटबंदीत पायऱ्या आहेत . तटबंदीत शौचकुप आहेत.
सुविधा व सोयी
निवास व्यवस्था
पाचाड गावात राहाण्याची सोय आहे.
अन्न व्यवस्था
पाचाड गावात जेवणाची सोय आहे.
पाणी उपलब्धता
पाचाड कोटात पिण्यायोग्य पाणी आहे.
जवळील गावे
Pachad
या परिसरातील इतर किल्ले डोंगररांग नाही
तुमचा ट्रेक नियोजित करत आहात का?
साहित्य योग्यरीत्या पॅक करा
आवश्यक साहित्य, पाणी व प्राथमिक उपचार पेटी सोबत ठेवा
लवकर सुरुवात करा
सकाळी लवकर ट्रेक सुरू करा
गटामध्ये ट्रेक करा
सुरक्षिततेसाठी नेहमी सहकाऱ्यांसोबत ट्रेक करा