मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

अग्वाडा (Aguada) किल्ल्याची ऊंची :  262
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : गोवा श्रेणी : सोपी
उत्तर गोव्यात कांदोळी समुद्र किनार्‍यापासुन (Candolim Beach) ४ किलोमीटर अंतरावर अग्वाडा किल्ला आहे. अग्वाडा किल्ल्याचे दोन भाग आहेत. वरील अग्वाडा किल्ला आणि खालील अग्वाडा किल्ला. अग्वाडा हा पोर्तुगीज शब्द आहे, त्याचा अर्थ "पाण्याचा स्त्रोत" असा आहे. या किल्ल्यावर असलेल्या पाण्याच्या टाकीतून व्यापारी जहाजांवर पाणी भरले जात असे. पोर्तुगिजनी एकोणीसाव्या शतकात या किल्ल्यावर तुरुंग बांधला. इसवीसन २०११ पर्यंत खालील अग्वाडा किल्ल्याचा उपयोग कारागृह म्हणुन केला जात होता. हा किल्ला गोवा पुरातत्व खात्याच्या अखत्यारित असल्याने सकाळी ८ ते संध्याकाळी ५:३० वाजे पर्यंत भेट देण्यासाठी खुला असतो. किल्ल्याला भेट देण्यासाठी शुल्क आकारले जाते
9 Photos available for this fort
Aguada
Aguada
Aguada
इतिहास :
अग्वाडा किल्ला मांडवी नदीच्या उत्तर काठावर आहे. १७ व्या शतकात डच व्य़ापारी आणि पोर्तुगीज व्य़ापारी यांच्यात भारतात व्य़ापार करण्यासाठी मोठी स्पर्धा निर्माण झाली, इसवी सन १६०४ मधे डच व्यापार्‍यांनी मांडवी नदीच्या मुखावर पोर्तुगीजांच्या जहाजांची नाकाबंदी केली. उत्तर तटावरील रिस मॅगोस किल्ल्यावरील आणि दक्षिण तटावरील गॅस्पर दिआस किल्ल्यावरील तोफ़ा ही नाकाबंदी मोडुन काढण्यासाठी अयशस्वी ठरल्या. ही नाकाबंदी मोडुन काढण्यासाठी पोर्तुगीजांनी मांडवी नदीच्या मुखावर अग्वाडा किल्ल्यांची निर्मिर्ती केली व झुवारी नदीच्या तोंडावर मार्मागोवा किल्ल्याची निर्मिती केली. या किल्ल्याची निर्मिती इसवी सन १६०६ मधे पोर्तुगीजांनी केली. हा किल्ला सैनिकी अभियांत्रिकीचा उत्कृष्ठ नमुना आहे.
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या तीन बाजूंना खंदक आहे. खंदकाच्या भिंती दगडांनी बांधून काढलेल्या आहेत .खंदकावर टाकलेल्या पूलावरुन पुर्वाभिमुख प्रवेशव्दाराने आपण किल्ल्यावर प्रवेश करतो. किल्ल्यात प्रवेश केल्यावर समोरच आपल्याला दिपस्तंभ दिसतो. नव्या दिपस्तंभाच्या जागी पुर्वी १९७६ पर्यंत जुना दिपस्तंभ होता. किल्ला ज्या डोंगरावर बांधला आहे त्याला अग्वाडा पॉईंट असे म्हणतात. किल्ल्यावरील बुरुज बाणाच्या आकाराचे आहेत. किल्ल्यावर एक तळघर आहे. त्या तळघरात एक पाण्याची मोठी ९० लाख लीटर्सची भुमिगत टाकी आहे. किल्ल्यावर अनेक नैसर्गिक जलस्त्रोत आहेत, त्यातील पाणी या टाकीत जमा करुन मोठ्या सफ़रींवर जाण्यापुर्वी जहाजे या किल्ल्यातून पाणी भरुन घेत असत. या तळघरात सध्या जाता येत नाही. डोंगराच्या उतरत्या सोंडेवर किल्ल्याची तटबंदी आणि बुरुज आहेत. किल्ल्याच्या फ़ांजीवरुन किल्ल्यावर फ़िरता येते.

किल्ल्याच्या परकोटाची तटबंदी समुद्रापर्यंत आहे. याच भागात तुरुंग असल्याने हा भाग बंद केलेला आहे. लोअर अग्वाडा म्हणजेच खालच्या अग्वाडाला जाणासाठी आपल्याला ३ किलोमीटरचा वळसा घालून ताज फ़ोर्ट अग्वाडा या पंचतारांकीत हॉटेल जवळील सिंक्वेरीयम बीच गाठावा लागतो. या ठिकाणी समुद्रात असलेला गोल बुरुज आणि किनार्‍यावर आसलेले २ त्रिकोणी बुरुज आणि तटबंदी पाहायला मिळते. या भागाला Sinquerim Fort असेही म्हणतात.
पोहोचण्याच्या वाटा :
गोव्यातील थिविम आणि पणजीहून म्हापसाला जाण्यासाठी बस आहेत. म्हापसाहून Candolim Beach पर्यंत बसेस मिळतात. कँडोलिम समुद्रकिनार्‍यापासून लोअर अग्वाडा (Sinquerim Fort) जवळच आहे. अप्पर अग्वादाला किल्ला येथून ३ किलोमीटर अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही
जेवणाची सोय :
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याच्या पाण्याची सोय नाही
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  आमनेर (Aamner)  अचला (Achala)  अचलपूरचा किल्ला (Achalpur Fort)
 अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)  अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजिंठा (Ajintha Fort)
 अजिंठा सराई (Ajintha Sarai)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अमरावतीचा किल्ला (Amravati Fort)  अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)
 अंतुर (Antoor)  अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)
 अशेरीगड (Asherigad)  औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)