मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
अवचितगड (Avchitgad) | किल्ल्याची ऊंची :  950 | ||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: रोहा | ||||
जिल्हा : रायगड | श्रेणी : मध्यम | ||||
दक्षिण कोकणात कुंडलिका नदीच्या तीरावर रोहा गावाच्या आजुबाजूला पसरलेल्या डोंगररांगांमध्ये गर्द रानाने वेढलेला अवचितगड पाहणे हा एक सुरम्य अनुभव ठरतो. रोह्यापासून ५ किमी वर असलेल्या पिंगळसई गावापासून गडाची उंची ३०० मी भरते. घनदाट झाडांमुळे गडावर जाण्याचा मार्ग सुखद झाला आहे. सर्व बाजूंनी तटांनी आणि बुरुजांनी वेढलेला हा किल्ला कुंडलिका नदीच्या (खाडीच्या) संरक्षणाच्या दृष्टीने महत्त्वाचा होता. |
|||||
|
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
मेढा गावातून येणारी वाट बुरुजाखालून पूर्व दिशेच्या प्रवेशव्दारातून गडावर जाते. या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे .पूर्वाभिमुख प्रवेशव्दाराच्या जवळ एका दगडावर शरभाचे शिल्प कोरलेले आहे. गडाच्या दक्षिण बुरुजाकडील दरवाजा ढासळलेल्या अवस्थेत आहे. तिथेच एक इ.स.१७९६ मध्ये कोरलेला शिलालेख आहे. गडावर व्दादशकोनी पाण्याने भरलेला तलाव आहे. या तलावाजवळ महादेवाचे मंदिर आहे. या तलावाच्या पश्चिमेला खालच्या बाजूस ७ टाक्याचा एक समूह आहे. या टाक्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. या टाक्यांजवळच पिंगळाई देवीचे/ महिषासुरमर्दिनीचे छोटेसे मंदिर आणि एक दिपमाळ आहे. टाक्यांच्या भिंतीवर एक घुमटी व वीराचे दगडावर कोरलेले शिल्प आहे, ते बाजी पासलकरांचे शिल्प आहे असे मानले जाते. बालेकिल्ल्याच्या टोकाला टेहळ्णी बुरुज आहे.बुरुजावर चढण्यासाठी पायर्या आहेत. बुरुजावरुन नागोठणे खिंड, बिरवाडी किल्ला, कुंडलिका नदीचे खोरे इत्यादी परिसर न्याहाळता येतो. गडाच्या उत्तरेकडील टोकावर एक बुरुज आहे. याशिवाय गडावर तोफा, वाड्यांचे चौथरे, सदर इत्यादी गोष्टी पाहाता येतात. पावसाळ्यानंतरचे येथील निसर्गसौंदर्य पाहण्यासारखे असते. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
१) मेढा मार्गे :- मुंबई - रोहा मार्गावर रोह्याच्या अगोदर ७.५ किमी अंतरावर असलेल्या मेढा या गावी उतरावे. गावातून विठोबा मंदिराच्या मागूनच गडावर जाण्यासाठी वाट आहे. या वाटेने आपण एका तासात गडावर पोहोचतो. वाट दाट झाडांमधून जात असल्याने वाट चुकण्याची शक्यता आहे. या वाटेने आपण पडक्या बुरुजावरून गडावर पोहोचतो. बुरुजावरून डाव्या बाजूला कुंडलिका नदीच्या खोर्यातील मेढा व पिंगळसई ही गावे दिसतात. २ पिंगळसई मार्गे :- अवचितगडावर जाण्यासाठी मुंबईकरांनी अथवा पुणेकरांनी प्रथम रोह्याला यावे. येथून दीड तासाची पायी रपेट केल्यावर गडाच्या पायथ्याशी असलेल्या पिंगळसई गावात आपण पोहोचतो. हे अंतर साधारणपणे ५ किमी आहे. येथून गडावर जाणारी वाट सरळ आणि मळलेली असल्याने तासाभरात गडावर पोहोचता येते. या वाटेवर एक युध्दशिल्प(वीरगळ) आहे. ३ पडम मार्गे :- गडावर जाण्याचा तिसरा मार्ग पडम गावातून येतो. रोहा मार्गे पिंगळसई गावाला येतांना, रोहा-नागोठणे मार्गावर एक बंद पडलेला कागद कारखाना आहे. या कारखान्याच्या मागून जाणारी वाट गडाच्या दक्षिण प्रवेशद्वरापाशी घेवून जाते. या वाटेने गडावर जाण्यास दोन तास पुरतात. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
गडावर राहण्याची सोय नाही. | |||||
जेवणाची सोय : | |||||
गडावर जेवणाची सोय नाही. आपण स्वत:च करावी. | |||||
पाण्याची सोय : | |||||
गडावर बारमही पिण्याच्या पाण्याचे तळे आहे. | |||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||
पिंगळसई मार्गे १ तास, तर पडम मार्गे २ तास लागतात. | |||||
सूचना : | |||||
१) रोहा परिसरात ४ किल्ले येतात. नीट नियोजन केल्यास, स्वत:च्या वहानाने , तळागड, ,घोसाळगड, बिरवाडी व अवचितगड हे किल्ले व कुडाची लेणी व्यवस्थित पाहून होतात. २) घोसाळगड, बिरवाडी व तळागड या किल्ल्यांची माहिती साईटवर दिलेली आहे. |
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A | आड (Aad) | अचला (Achala) | अग्वाडा (Aguada) | अहिवंत (Ahivant) |
अजिंक्यतारा (Ajinkyatara) | अजमेरा (Ajmera) | आजोबा (आजा पर्वत) (Ajoba) | अकलूजचा किल्ला (Akluj Fort) |
अलंग (Alang) | अंमळनेर (Amalner) | अंबागड (Ambagad) | आंबोळगड (Ambolgad) |
अणघई (Anghai) | अंजनेरी (Anjaneri) | अंकाई(अणकाई) (Ankai) | अंतुर (Antoor) |
अर्जूनगड (Arjungad) | अर्नाळा (Arnala) | आसावा (Asawa) | अशेरीगड (Asherigad) |
औंढा (अवंध) (Aundha) | औसा (Ausa) | अवचितगड (Avchitgad) |