मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

बेळगावचा किल्ला (Belgaum Fort) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : बेळगाव श्रेणी : सोपी
बेळगावचा भुईकोट किल्ला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, बस डेपोपासून हाकेच्या अंतरावर आहे. या किल्ल्याला उंच, मजबूत कलात्मक बुरुजांनी सुशोभित केलेली तटबंदी आहे. तटबंदीच्या बाहेर खोल खंदक असून तो नेहमी पाण्याने भरलेला असतो.
15 Photos available for this fort
Belgaum Fort
इतिहास :
बेळगावचे मूळ नाव वेणुग्राम. बेळगावचा मूळ किल्ला १३ व्या शतकात रट्‌ट राजवटीच्या काळात बांधला गेला. त्यानंतर बेळगाव शहरावर राज्य करणार्‍या अनेक राजवटी आल्या. त्यामध्ये विजयनगरचे सम्राट, अदिलशहा, मराठे व इंग्रज यांनी आपल्या कुवतीनुसार या किल्ल्याचा विस्तार व मजबुतीकरण केले. सध्या असलेली तटबंदी व खंदक बांधण्यामध्ये महत्वाचे योगदान विजापूरचा अदिलशहा याकुबअली खान याने दिलेले आहे.
स्वातंत्र्य चळवळीच्या काळात महात्मा गांधी यांना या किल्ल्यात कैदेत ठेवण्यात आले होते. ब्रिटीश काळात या किल्ल्याचा वापर लष्करी तळ म्हणून केला गेला. १८४४ मध्ये सामानगडाच्या गडकर्‍यांनी केलेले बंड मोडून काढण्यासाठी याच किल्ल्यातून ब्रिटीश लष्कर सामानगड किल्ल्यावर चालून गेले होते. स्वातंत्रोत्तर काळात भारतीय लष्कराच्या मराठा लाइट इनफंट्रीचा तळ येथे असतो.
पहाण्याची ठिकाणे :
बेळगाव शहराच्या मध्यभागे हा किल्ला आहे. किल्ला मिल्ट्रीच्या ताब्यात असल्याने उत्तम स्थितीत ठेवलेला आहे. किल्ल्याच्या बाहेरील बाजूस खंदक खोदलेला आहे. किल्ल्याच्या मुख्य प्रवेशद्वारातून आत गेल्यावर उजव्या बाजूला अंबाबाई व गणपतीचे प्राचीन मंदिर लागते. या ठिकाणी पहारेकर्‍यांसाठी अनेक देवडया आहेत. किल्ल्याच्या अंर्तभागात अदिलशहाच्या काळात बांधलेल्या अनेक इमारती आहेत. प्रवेशद्वारातून पुढे गेल्यावर डाव्या बाजूला असलेल्या इमारतीत सार्वजनिक बांधकाम खात्याच्या कचेर्‍या आहेत. तेथून पुढे गेल्यावर प्रवेशद्वारसदृश्य कमानीचे बांधकाम दिसते. यापुढील भागात मराठा लाइट इंन्फन्ट्रीचा कँप व लष्कराचे भरती केंद्र लागते. भरती केंद्राच्या बाजूला "कमल बसदी" नावाचे इसवीसन १२०४ मध्ये बांधलेले जैन मंदिर आहे. काळया ग्रॅनाइट दगडात बांधलेले हे मंदिर शिल्पकलेचा एक अजोड नमुना आहे. या मंदिरात नेमिनाथांची मुर्ती आहे. या मंदिरातील दगडी झुंबर पाहाण्यासारखे आहे. या झुंबरात कोरलेल्या कमळामुळे या मंदिराला कमल बसदी या नावाने ओलखले जाते. पुरातत्व विभागाने या मंदिराचा जिर्णोध्दार केलेला आहे. या मंदिराच्या बाजूला चालुक्य शैलीतील अनेक हिंदू मंदिरेही आहेत, परंतु या मंदिरातील मुर्ती गायब आहेत. किल्ल्यामध्ये अदिलशाही काळात बांधलेल्या साफा व जामिया या नावाच्या दोन मशीदी आहेत.

पोहोचण्याच्या वाटा :
बेळगावचा भुईकोट किल्ला शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी, बस डेपोपासून हाकेच्या अंतरावर आहे.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही.
पाण्याची सोय :
गडावर पिण्याच्या पाण्याची सोय आहे.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
वर्षभर
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: B
 बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))  बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बहुला (Bahula)
 बाळापूर किल्ला (Balapur Fort)  बल्लाळगड (Ballalgad)  बळवंतगड (Balwantgad)  बांदा किल्ला (Banda Fort)
 बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)  बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)
 बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)  भगवंतगड (Bhagwantgad)  भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))
 भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))  भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))  भामेर (Bhamer)  भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)
 भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))  भरतगड (Bharatgad)  भास्करगड (बसगड) (Bhaskargad)  भवानगड (Bhavangad)
 भवानीगड (Bhavanigad)  भिलाई (Bhilai Fort)  भीमाशंकर (Bhimashankar)  भिवागड (Bhivagad)
 भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))  भोरगिरी (Bhorgiri)  भोरवाडीचा किल्ला (Bhorwadi Fort)  भुदरगड (Bhudargad)
 भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  भूपतगड (Bhupatgad)  भूषणगड (Bhushangad)  बिरवाडी (Birwadi)
 बिष्टा (Bishta)  बितनगड (Bitangad)