मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad)) किल्ल्याची ऊंची :  825
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: कर्जत
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
मुंबई - पुण्याहून एका दिवसात करता येण्यासारखा एकदम सोपा किल्ला म्हणजे भिवगड उर्फ भिमगड कर्जत जवळील वदप व गौर कामत गावामागे छोट्याश्या टेकडीवर हा किल्ला आहे. ‘‘ढाक’’ ला जाण्याचा मार्ग वदप गावातून आहे. या मार्गावर भिवगडच्या खिंडीत पोहचल्यावर उजव्या बाजूची वाट ‘‘ढाक’’ला जाते, तर डाव्या बाजूची वाट भिवगडावर जाते.
भिवगड फारच छोटा किल्ला असल्यामुळे ‘‘ढाक’’ला जाता जाताही वाट वाकडी करुन पाहाता येतो. ज्यांना फक्त भिवगडच पाहायचा आहे त्यांनी पावसाळ्यात जावे; म्हणजे छोटेखानी किल्ला पाहून वदप गावामागे असलेला धबधबाही पाहता येईल.Bhivgad
12 Photos available for this fort
Bhivgad(Bhimgad)
पहाण्याची ठिकाणे :
गौरकामत गावातून किल्यावर चढाइ करताना कातळात खोदलेल्या पायर्‍या लागतात, त्या किल्ल्याचे प्राचिनत्व सिध्द करतात. या पायर्‍यांनी वर आल्यावर एक खोदीव गुहा लागते. गडाची तटबंदी, बुरुज, प्रवेशद्वार अस्तित्वात नाहीत. गडावर दोन पाण्याची कातळात खोदलेली टाकं आहेत. त्यातील पाणी पिण्यायोग्य आहे. परंतु ते जानेवारी फेब्रुवारी पर्यंतच उपलब्ध असते.गडावर एका भिंतीचेही काही अवशेष आहेत. गड पहाण्यासाठी ३० मिनिटे लागतात.
पोहोचण्याच्या वाटा :
कर्जतहून ५ कि.मीवर वदप गाव आहे. वदपच्या पुढे १ कि.मीवर गौरकामत गाव आहे. या दोन गावांच्या मध्ये भिवगड आहे. वदप गावातून गौरकामत गावाकडे जाताना धबधब्याच्या फाट सोडल्यावर पुढे उजव्या हाताला एक कच्चा रस्ता भिवगडकडे जातो. कच्चा रस्ता संपल्यावर इलेक्ट्रीच्या खांबाच्या बाजूने जाणार्‍या पायवाटेने भिवगड डावीकडे ठेवत १५ मिनिटे चढल्यावर आपण भिवगडच्या खिंडीत येतो. येथे दोन वाटा फुटतात उजव्या बाजूची वाट ‘ढाक’ कडे तर डाव्या बाजूची वाट भिवगडवर जाते. खिंडीतुन १० मिनिटात गडावर जाता येते. गौर कामत गावातूनही एक वाट भिवगडवर जाते. डोंगराच्या सोंडेवरुन भिवगडवर जाता येते.
राहाण्याची सोय :
गडावर रहाण्याची सोय नाही, पण वदप गावात रहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची सोय नाही, पण वदप गावात जेवणाची सोय आहे.
पाण्याची सोय :
गडावरील टाक्यात जानेवारी फेब्रुवारीपर्यंत पाणी असते.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
वदप गावातून ३० मिनिटे लागतात.
सूचना :
कर्जतला उतरल्यावर मुंबईच्या दिशेला असलेल्या फाटकातून ,कर्जत पूर्वेला (फलाट क्रमांक ४ च्या बाजूला) बाहेर पडल्यावर ३ आसनी रिक्षा वदप पर्यंत जाण्यासाठी मिळतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: B
 बहादरपूर (Bahadarpur Fort)  बहादूरगड (पेडगावचा किल्ला) (Bahadurgad (Pedgaon Fort))  बहादूरवाडी गड (Bahadurwadi gad)  बाळापूर किल्ला (Balapur Fort)
 बल्लाळगड (Ballalgad)  बळवंतगड (Balwantgad)  बांदा किल्ला (Banda Fort)  बांद्रयाचा किल्ला (Bandra Fort)
 बाणकोट (Bankot)  बारवाई (Barvai)  बेलापूरचा किल्ला (Belapur Fort)  बेळगावचा किल्ला (Belgaum Fort)
 भगवंतगड (Bhagwantgad)  भैरवगड (सातारा) (Bhairavgad (Satara))  भैरवगड(कोथळे) (Bhairavgad(kothale))  भैरवगड (मोरोशी) (Bhairavgad(Moroshi))
 भैरवगड(शिरपुंजे) (Bhairavgad(Shirpunje))  भामेर (Bhamer)  भंडारदुर्ग/भांडारदुर्ग (Bhandardurg)  भांगसी गड (भांगसाई गड) (Bhangsigad(Bhangsi mata gad))
 भरतगड (Bharatgad)  भास्करगड (बसगड) (Bhaskargad)  भवानगड (Bhavangad)  भवानीगड (Bhavanigad)
 भिलाई (Bhilai Fort)  भीमाशंकर (Bhimashankar)  भिवागड (Bhivagad)  भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad))
 भोरगिरी (Bhorgiri)  भुदरगड (Bhudargad)  भूपाळगड (बाणूर गड) (Bhupalgad (Banurgad))  भूपतगड (Bhupatgad)
 भूषणगड (Bhushangad)  बिरवाडी (Birwadi)  बिष्टा (Bishta)  बितनगड (Bitangad)