मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

चांभारगड (Chambhargad) किल्ल्याची ऊंची :  1200
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: रायगड
जिल्हा : रायगड श्रेणी : मध्यम
रायगडाच्या आजूबाजूला असणार्‍या डोंगर रांगावर अनेक किल्ले आहेत. यांत प्रामुख्याने लिंगाणा, सोनगड व चांभारगड यांचा समावेश होतो. यांचा उपयोग केवळ घाटमथ्यावर नजर ठेवण्यासाठी व टेहेळणीसाठी होत असावा. चांभारगड हा महाडपासून हाकेच्या अंतरावर असलेला हा किल्ला महाड या पूरातन व्यापारी बाजारपेठेवर लक्ष ठेवण्यासाठी बांधला असावा. चांभारगड किल्ल्याचे दुसरे नाव महेंद्रगड आहे.
8 Photos available for this fort
Chambhargad
पहाण्याची ठिकाणे :
गडमाथा म्हणजे एक छोटेसे पठारच आहे. पठारावर थोडे फार घरांचे अवशेष आहेत तर पठाराच्या खालच्या डोंगराच्या पट्टीवर पाण्याची ३ टाकी आहेत. या टाक्यांच्या बांधणीवरुन हा गड पुरातन असावा असा अंदाज बांधता येतो. याखेरीज गडावर पाहण्याजोगे काहीच नाही. अर्ध्या तासात संपूर्ण गडफेरी पूर्ण होते.
पोहोचण्याच्या वाटा :
गडावर जाण्यासाठी महाड गाठावे. महाड- पोलादपूर हायवे ओलांडून पायथ्याच्या चांभारखिंड गावात पोहोचावे. महाड एसटी स्थानकापासून येथे जाण्यास २० मिनिटे लागतात. या खिंडीतून पाऊण तासाच्या चालीनंतर आपण माथ्याच्या कातळकड्यापाशी / खिंडीत पोहोचतो. कातळकडा डावीकडे ठेवून थोडे पुढे जावे. नंतर वर जाणारी वाट पकडून १५ मिनितांत गडमाथा गाठता येतो.
राहाण्याची सोय :
किल्ल्यावर राहण्याची सोय नाही.
जेवणाची सोय :
गडावर जेवणाची व्यवस्था नाही., आपण स्वत: करावी.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्यायोग्य पाणी आहे.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
चाभारखिंड गावातून एक तास लागतो.
सूचना :
चांभारगड पाहून झाल्यावर,गंधारपाले लेणी पाहाता येतात.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: A
 आड (Aad)  अचला (Achala)  अग्वाडा (Aguada)  अहिवंत (Ahivant)
 अजिंक्यतारा (Ajinkyatara)  अजमेरा (Ajmera)  आजोबा (आजा पर्वत) (Ajoba)  अकलूजचा किल्ला (Akluj Fort)
 अलंग (Alang)  अंमळनेर (Amalner)  अंबागड (Ambagad)  आंबोळगड (Ambolgad)
 अणघई (Anghai)  अंजनेरी (Anjaneri)  अंकाई(अणकाई) (Ankai)  अंतुर (Antoor)
 अर्जूनगड (Arjungad)  अर्नाळा (Arnala)  आसावा (Asawa)  अशेरीगड (Asherigad)
 औंढा (अवंध) (Aundha)  औसा (Ausa)  अवचितगड (Avchitgad)