मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi) किल्ल्याची ऊंची :  0
किल्ल्याचा प्रकार : भुई किल्ले डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : अमरावती श्रेणी : सोपी
अमरावती चिखलदरा रस्त्यावर चिखलदर्‍याच्या पायथ्याशी धामणगाव गढी नावाचे गाव आहे. गावात असलेल्या मातीच्या गढीवरुन हे नाव पडलेले आहे. या गावातून गाविलगड किल्ला दिसतो. गाविलगड किल्ल्यावर असलेल्या कालभैरव तोफ़ेचा निशाणा या गढीवर आहे असे सांगितले जाते. चिखलदरा आणि गाविलगडला जातांना ही गढी पाहाता येईल.
7 Photos available for this fort
Dhamangaon Gadhi
पहाण्याची ठिकाणे :
गावाच्या पश्चिमेला ही पांढर्‍या मातीत बांधलेली गढी असून त्याला एकूण सात बुरुज आहेत. तटबंदी ३० फ़ूट उंच आणि १० फ़ूट रुंद आहे. तटबंदीत जंग्या आहेत. गढी भोवती खंदक आहे. गढी मध्ये एक विहिर होती. गढीची सद्यस्थिती फ़ारच खराब आहे. गढीचे अवशेष कसेबसे तग धरुन उभे आहेत.
पोहोचण्याच्या वाटा :
अमरावती चिखलदरा रस्त्यावर अमरावती पासून ६० किलोमीटर अंतरावर धामणगाव गढी गाव आहे.
राहाण्याची सोय :
राहाण्याची सोय परतवाडा मध्ये आहे.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय परतवाडा मध्ये आहे.
पाण्याची सोय :
पाण्याची सोय परतवाडा मध्ये आहे.
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: D
 दांडा किल्ला (Danda Fort)  दार्‍या घाट (Darya Ghat)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  दातेगड (Dategad)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  धाकोबा (Dhakoba)  धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)
 धारावी किल्ला (Dharavi Fort)  धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोडप (Dhodap)
 धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)
 दुर्ग (Durg)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))