मुळाक्षरानुसार डोंगररांगेनुसार जिल्ह्यानुसार प्रकारानुसार श्रेणीनुसार

डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera)) किल्ल्याची ऊंची :  2610
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग डोंगररांग: डोंगररांग नाही
जिल्हा : नाशिक श्रेणी : सोपी
नाशिक जिल्ह्यातील सिन्नर ही यादवांची पहिली राजधानी होती. सिन्नर जवळ असलेल्या डुबेरा गावातील एका टेकडीवर डुबेरा किल्ला आहे. सिन्नर या एकेकाळच्या राजधानीच्या जवळ असलेल्या या किल्ल्याचा उपयोग राजधानीकडे येणार्‍या मार्गावर लक्ष ठेवण्यासाठी झाला असावा. डुबेरा किल्ल्यावरुन एका बाजूला सिन्नर व दुसर्‍या बाजूला आड, पट्टा आणि औंधा (अवंधा) पर्यंतचा प्रदेश दिसतो.

डुबेरा हे पहिल्या बाजीराव पेशव्यांचे आजोळ होते. बाजीरावांचा जन्म डुबेरा गावातील बर्वे वाड्यात झाला. आज वाड्याची अवस्था बिकट असली तरी आपल्याला गावातील वाडा पाहाता येतो.

खाजगी वहानाने डुबेरा, आड, पट्टा, अवंधा आणि बितनगड हे चार किल्ले दोन दिवसात व्यवस्थित पाहाता येतात.
11 Photos available for this fort
Dubergad(Dubera)
पहाण्याची ठिकाणे :
किल्ल्याच्या पायथ्याशी जनार्दनस्वामींचा आश्रम आणि नागेश्वर मंदिर आहे. या आश्रमापर्यंत डांबरी रस्ता अहे. खाजगी वहानाने थेट आश्रमापर्यंत जाता येते. डुबेरा गावातून आश्रमापर्यंत चालत जाण्यास अर्धा तास लागतो. आश्रमापासून गडावर जाण्यासाठी पायर्‍या आहेत. या मार्गाने गडावर पोहोचण्यास २० मिनिटे लागतात. पायर्‍या संपल्यावर उजव्या बाजूला कातळात खोदलेली पाण्याची दोन मोठी टाकी दिसतात. गडावर सप्तशृंगी मातेचे मंदिर आहे. देवीचे दर्शन घेऊन पायर्‍यांच्या दिशेने चालत जाऊन गडाच्या विरुध्द बाजूच्या पठारावर गेल्यावर एक मोठा कोरडा तलाव दिसतो. किल्ल्याचे पठार मोठे आहे पण त्यावर इतर काही अवशेष नाहीत.

गडावरुन सिन्नर पर्यंतचा प्रदेश, म्हाळुंगी नदीचे खोरे, पट्टा आणि औंधा (अवंधा) पर्यंतचा प्रदेश दिसतो.
पोहोचण्याच्या वाटा :
सिन्नर हे डुबेरा किल्ल्या जवळचे मोठे शहर आहे. सिन्नरहून दर तासाला डुबेरा गावात जाण्यासाठी एसटी बसेसची सोय आहे. याशिवाय खाजगी जीप (वडाप) सिन्नर ते डुबेरा आणि सिन्नर ते ठाणगाव धावतात.

मुंबई नाशिक महामार्गाने घोटी पर्यंत येऊन पुढे घोटी सिन्नर रस्त्याने हरसुल गावापर्यंत यावे. हरसूल गावातून डुबेरा गावाला जाणारा रस्ता आहे. मुंबई ते डुबेरा अंतर १८० किमी आहे.
राहाण्याची सोय :
किल्ल्या खालील आश्रमात राहाण्याची सोय होऊ शकते.
जेवणाची सोय :
जेवणाची सोय सिन्नरला आहे.
पाण्याची सोय :
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही.
जाण्यासाठी लागणारा वेळ :
पायथ्यापासून २० मिनिटे, डुबेरा गावातून किल्ल्यावर जाण्यास १ तास लागतो.
जाण्यासाठी उत्तम कालावधी :
जुन ते फ़ेब्रुवारी
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: D
 दांडा किल्ला (Danda Fort)  दार्‍या घाट (Darya Ghat)  दासगावचा किल्ला (Dasgaon Fort)  दातेगड (Dategad)
 दौलतमंगळ (Daulatmangal)  देहेरगड (भोरगड) (Dehergad (Bhorgad))  डेरमाळ (Dermal)  देवगडचा किल्ला (Devgad Fort)
 देवगिरी (दौलताबाद) (Devgiri (Daulatabad))  ढाक बहिरी (Dhak-Bahiri)  धाकोबा (Dhakoba)  धामणगाव गढी (Dhamangaon Gadhi)
 धारावी किल्ला (Dharavi Fort)  धर्मापूरी (Dharmapuri)  धारूर (Dharur)  धोडप (Dhodap)
 धोत्रीचा किल्ला (गढी) (Dhotri Fort (Gadhi))  द्रोणागिरी (Dronagiri)  डुबेरगड(डुबेरा) (Dubergad(Dubera))  दुंधा किल्ला (Dundha)
 दुर्ग (Durg)  दुर्गाडी किल्ला (Durgadi Fort)  डच वखार (वेंगुर्ला कोट) (Dutch Warehouse( Vengurla Fort))