मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
ढाक बहिरी (Dhak-Bahiri) | किल्ल्याची ऊंची :  2700 | ||||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: कर्जत | ||||
जिल्हा : रायगड | श्रेणी : कठीण | ||||
लोणावळ्याच्या उत्तरेला दहा मैलांवर असलेल्या राजमाची किल्ल्यावर वर्षभर दुर्गप्रेमी जात असतात. मात्र याच राजमाचीजवळ निबीड अरण्यात असलेल्या बुलंद आणि बेलाग अशा ढाकच्या किल्ल्याला फ़ार कमी जण भेट देतात. त्यातही बहिरीच्या गुहेपर्यंत जाणार्यांचे प्रमाण जास्त आहे. पण ढाकच्या किल्ल्यावर फ़ार थोडे जण जातात. ढाकच्या किल्ल्याच्या बाजूस असणार्या सुळक्याला ‘कळकरायचा सुळका’ असे म्हणतात.किल्याचे स्थान व रचना पाहाता याचा ऊपयोग टेहळणीसाठी केला जात असावा. आजकाल बरेच जण अर्धवट माहितीच्या आधारे किंवा साहस करण्याच्या ऊद्देशाने ढाकच्या किल्ल्यावर जातात. त्यांनी एक गोष्ट लक्षात घेणे आवश्यक आहे, ती म्हणजे गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे.
|
|||||
|
|||||
पहाण्याची ठिकाणे : | |||||
ढाकच्या किल्ल्याचे दोन भाग आहेत. १) बहिरीची गुहा / ३ लेण्यांचा समुह , २) ढाकचा किल्ला. १) बहिरीची गुहा /३ लेण्यांचा समुह : ढाक किल्ल्या वरील कातळाच्या पोटात ३ लेणी खोदलेली आहेत. येथ पर्यंत जाण्यासाठी अवघड कातळ टप्पा पार करावा लागतो. या बहिरीच्या गुहेत बहिरीचा शेंदुर फासलेला दगड आहे. पाण्याची २ मोठी टाक आहेत. या टाक्यांमध्येच गावकयांनी जेवणासाठी काही भांडी ठेवली आहेत. जेवण झाल्यावर ही भांडी धुवून पुन्हा या टाक्यातच ठेवावी. गुहेच्या वर दीड हजार फूटांची कातळभिंत आहे. गुहेच्या समोरच राजमाचीचे श्रीवर्धन आणि मनरंजन हे दोन बालेकिल्ले दिसतात. येथूनच नागफणीचे टोक , प्रबळगड , कर्नाळा, माथेरान असा विस्तीर्ण परिसर दिसतो. दुसर्या लेण्यात काहीही अवशेष नाहीत ,तर ३ रे लेणे अर्धवट खोदलेल्या स्थितीत आहे. २) ढाकचा किल्ला :- ढाक गावातून थेट किल्ल्यावर जाता येते किंवा कळकरायच्या खिंडीतून किल्ल्याला डावीकडे ठेवत वळसा मारुन आपण किल्ल्याच्या पूर्व भागातून माथ्यावर प्रवेश करतो. तेथून किल्ल्याच्या दक्षिण भागाकडे गेलो असता आपल्याला गडमाथ्यावरून कळकराय सुळक्याचे दर्शन होते. किल्ल्याच्या पठाराचा विस्तार हा खूप मोठा आहे. त्यावर अनेक वाटा फुटलेल्या आहेत त्यातून उत्तर दिशा पकडून एक वाट धरुन चालत राहिल्यास खुरट्या झाडीतून वाटचाल करत आपण मोकळ्या भागात येतो. इथे एक पडक्या अवस्थेतील वास्तूचे अवशेष पाहायला मिळतात, वास्तूच्या पुढे डावीकडे ओढ्यातून चालत गेल्यावर पाच मिनिटात तलावपाशी येतो. तलावात किल्ल्याच्या बांधकामाच्या चिरा पडलेल्या आहेत. तलावाच्या बाजूने वर चढल्यावर एक कोरड पाण्याचं टाकं लागत. पुढे सरळ चाल धरून उत्तरेकडे जाताना आपल्या उजव्या बाजूला म्हणजेच किल्ल्याच्या पूर्व भागाकडे लक्ष ठेवत जायचं. इथे दुरूनच आपल्याला चार टाक्यांच्या समूह नजरेस पडतो. या टाक्यांत पिण्यायोग्य पाणी तसेच बाजूला सावलीसाठी एक झाड देखील आहे. इथेच सलग तटबंदी देखील पहावयास मिळते. इथून आल्यामार्गे परत मागे फिरावे किंवा एक-दीड तासाची चाल करून ढाक गाव गाठू शकतो. गडफेरीसाठी दीड ते 2 तास लागतात. | |||||
पोहोचण्याच्या वाटा : | |||||
ढाक किल्ल्यावर पोहोचण्यासाठी २ वाटा आहेत. या वाटांनी प्रथम ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचावे लागते. १) वदप मार्गे :- कर्जत - वदप अंतर ७ कि.मी आहे. वदप गाव संपल्यावर एक वाट भिवगडा/भीमगडा कडे जाते. या वाटेने १० मिनीटात आपण एका खिंडीत पोहोचतो. येथून उजव्या बाजूची वाट ढाक किल्ल्याकडे तर डाव्या बाजूची वाट भिवगडा/भीमगडा कडे जाते. या वाटेने वदप गाव ते ढाक गाव हे अंतर कापण्यासाठी साधारणतः दिड ते २ तास लागतात. पुढे ढाक गाव ते किल्ल्यावर जाण्यासाठी दिड तास लागतो. किल्ल्यावरुन बहिरीच्या गुहेत जाण्यासाठी ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत पोहोचायला अर्धा तास लागतो. पुढिल मार्ग खाली ( अ व ब मध्ये ) दिल्या प्रमाणे आहे २) जांभिवली मार्गे :- पुणे - कामशेत - जांभिवली यामार्गे जांभिवली गावात पोहोचावे. तेथुन अर्धा - पाऊण तासात कोंडेश्वर मंदिरात पोहोचावे. येथून ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत तासभरात पोहोचता येते. पुढिल मार्ग खाली दिल्या प्रमाणे आहे. अ) बहिरीची गुहा /३ लेण्यांचा समुह : ढाक बहिरीच्या गुहेपर्यंत जाणार्या सर्व वाटा ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीतून जातात.खिंडीतून पलिकडील बाजूस उतरल्यावर उजव्या बाजूने (दरी डावीकडे ठेवत) अवघड कातळटप्पा पार करुन बहिरीच्या गुहा गाठता येते. ब) ढाकचा किल्ला :- ढाक गावातून थेट किल्ल्यावर जाता येते किंवा ‘कळकरायचा सुळका’ आणि बहिरीचा डोंगर यामधील खिंडीत चढतांना एक वाट डावीकडे जाते. या वाटेने ३० मिनीटात गड माथ्यावर पोहोचता येते. | |||||
राहाण्याची सोय : | |||||
येथील राहण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे बहिरीची गुहा हेच होय. | |||||
जेवणाची सोय : | |||||
जेवणाची सोय आपण स्वत:च करावी. | |||||
पाण्याची सोय : | |||||
गुहेत आणि गडावर पिण्याच्या पाण्याचे एक मोठे टाके आहे. वाटेत कुठेही पिण्याच्या पाण्याची सोय नसल्याने उन्हाळ्यात पाण्याचा भरपूर साठा असणे आवश्यक आहे. | |||||
जाण्यासाठी लागणारा वेळ : | |||||
वदप मार्गे ४ तास लागतात. जांभिवली मार्गे ३.५ तास लागतात. सांडशी ठाकूरवाडी ते बहिरीची गुहा ३ ते ३.३० | |||||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||||
वर्षभर | |||||
सूचना : | |||||
गिर्यारोहणाचे साहित्य व गिर्यारोहण तंत्राची माहिती असल्याशिवाय या किल्ल्यावर जाणे धोक्याचे आहे. यापूर्वी अनेक जणांचा या ठिकाणी पडून मृत्यु झालेला आहे. |
जिल्हा Raigad | अवचितगड (Avchitgad) | भीमाशंकर (Bhimashankar) | भिवगड / भिमगड (Bhivgad(Bhimgad)) | बिरवाडी (Birwadi) |
चांभारगड (Chambhargad) | चंद्रगड ते आर्थरसीट रेंज ट्रेक (Chandragad to Arthur seat) | चंद्रगड(ढवळगड) (Chandragad(Dhavalgad)) | कुलाबा किल्ला (Colaba) |
दासगावचा किल्ला (Dasgaon Fort) | ढाक बहिरी (Dhak-Bahiri) | द्रोणागिरी (Dronagiri) | घारापुरी (Gharapuri) |
घोसाळगड (Ghosalgad) | हिराकोट (Hirakot) | ईरशाळ (Irshalgad) | जंजिरा (Janjira) |
कर्नाळा (Karnala) | खांदेरी (Khanderi) | खुबलढा किल्ला (थळचा किल्ला) (Khubladha Fort (Thal Fort)) | कोकणदिवा (Kokandiva) |
कोंढवी (Kondhavi) | कोर्लई (Korlai) | कुर्डुगड (विश्रामगड) (Kurdugad) | लिंगाणा (Lingana) |
मानगड (Mangad) | मंगळगड (Mangalgad) | माणिकगड (Manikgad) | मिरगड (मिरा डोंगर / सोनगिर) (Mirgad(Songir)) |
मृगगड (Mrugagad) | पाचाड कोट (Pachad Fort) | पदरगड (Padargad) | पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) |
पालगड (Palgad) | पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) | पेब (विकटगड) (Peb) | पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) |
प्रबळगड (Prabalgad) | रायगड (Raigad) | रामदरणे (Ramdarne) | रतनगड(रत्नदुर्ग) (Ratangad(Ratnadurg)) |
रेवदंडा (Revdanda) | सागरगड (खेडदूर्ग) (Sagargad) | सामराजगड (Samrajgad) | सांकशीचा किल्ला (Sankshi) |
सरसगड (Sarasgad) | सर्जेकोट (रायगड) (Sarjekot (Alibaug)) | शिवथरघळ (Shivtharghal) | सोंडाई (Sondai) |
सोनगिरी (कर्जत जवळ) (Songir (Karjat)) | सुधागड (Sudhagad) | सुरगड (Surgad) | तळगड (Talgad) |
तुंगी (कर्जत) (Tungi (Karjat)) | उंदेरी (Underi) |