पाच्छापूर किल्ला
(Pachhapur Fort) |
किल्ल्याची ऊंची : 
2400 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: डोंगररांग नाही |
जिल्हा : बेळगाव |
श्रेणी : सोपी |
पाच्छापूर म्हणजेच पातशहापूर या गावातील टेकडीवर एक किल्ला आहे . एकेकाळी सुंदर आणि बुलंद असलेल्या या किल्ल्याची आजची अवस्था दयनीय आहे . गावाच्या मधोमध असलेला हा किल्ला गावातल्या लोकांच्याच उपेक्षेचा धनी झालेला आहे.
हिडकल डॅम जवळ असलेला होन्नुर किल्ला आणि त्याच्या पुढे १४ किलोमीटरवर असलेला पाच्छापूर किल्ला एका दिवसात पाहाता येतात.
|
|
पहाण्याची ठिकाणे : |
पाच्छापूर गावाच्या मधोमध असलेल्या टेकडीवर पाच्छापूर किल्ला आहे . टेकडी भोवती दाट लोकवस्ती आहे . गावात शिरतानांच किल्ल्याचे बुरूज दिसायल लागतात. किल्ल्याच्या खाली गाव वसलेले आहे तेथेही एक तटबंदी आणि प्रवेशव्दार होती . किल्ल्यावर जाण्यासाठी गावाला वळसा घालून गावातल्या इंग्रजी माध्यमाच्या शाळेकडे जातांना एक प्रवेशद्वार लागते. शाळेच्या पुढे गेल्यावर एका दर्ग्याकडे जाणारा रस्ता आहे . याठिकाणी अतिशय रुंद पायऱ्या बांधून काढलेल्या आहेत . या पायऱ्यानी वर चढून गेल्यावर आपण एका भव्य प्रवेशद्वारापाशी येतो. प्रवेशव्दारावर दोन बाजूला दोन शरभ , दोन कमळ कोरलेली आहेत. प्रवेशव्दारासमोर वरच्या बाजूला एक बुरुज आहे . प्रवेशद्वाराचे रक्षण करण्यासाठी त्याची योजना केलेली आहे. प्रवेशद्वारातून आत शिरल्यावर रस्ता काटकोनात वळतो . याठिकाणी दोन्ही बाजूला पाहारेकर्यांसाठी कमानदार देवड्या आहेत . या देवड्यांच्या बाजूला प्रवेशव्दाराच्या समोरच्या बाजूला एक छोटा दरवाजा आहे . मुख्य दरवाजा बंद असताना त्याचा दिंडी दरवाजा म्हणून वापर होत असावा . किल्ल्यावर बाभळीच्या झाडीचे रान माजलेले आहे त्यातून फिरणे मुश्किल झालेले आहे . त्यामुळे किल्ल्यावरील इतर अवशेष पाहाता येत नाहीत . |
पोहोचण्याच्या वाटा : |
मुंबई - बंगलोर महामार्गावर हिडकल डॅमला जाणारा फाटा आहे . त्या रस्त्याने हिडकल डॅमच्या पुढे १४ किलोमीटर अंतरावर पाच्छापूर गाव आहे . या गावात पाच्छापूर किल्ला आहे . |
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही |
जेवणाची सोय : |
किल्ल्यावर जेवणाची सोय नाही . |
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही . |
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
गडमाथ्यावर जाण्यासाठी पायथ्यापासून १० मिनिटे लागतात. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
वर्षभर |