मुळाक्षरानुसार | डोंगररांगेनुसार | जिल्ह्यानुसार | प्रकारानुसार | श्रेणीनुसार | |
प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley) | किल्ल्याची ऊंची :  2100 | ||
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग | डोंगररांग: ताम्हणी घाट | ||
जिल्हा : पुणे | श्रेणी : कठीण | ||
आपल्या सभोवताली, जवळपासच खूप आश्चर्यकारक गोष्टी निसर्गात सामावलेल्या असतात. अशीच एक सर्वार्थाने सुंदर गिर्यारोहणाचा अनुभव देणारी जागा म्हणजे ‘प्लस व्हॅली’.प्लस व्हॅली हा दोन दिवसाचा मुक्कामी ट्रेक म्हणूनच सहसा करतात. देवकुंड किंवा भिरा गावाच्या अलीकडे मुक्काम करता येतो. तसेच भिरा गावातून फक्त देवकुंड धबधबा एका दिवसात पाहून येत येईल. या भागात उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध असल्याने उन्हाळ्यात हा ट्रेक करता येतो. |
|||
|
|||
पहाण्याची ठिकाणे : | |||
पुण्यापासून कोकणात उतरणार्या ताम्हणी घाटात ताम्हिणी गावाच्या पुढे डोंगरवाडी जवळ घाटातच पर्यटकांसाठी एक चौथरा बांधलेला आहे. या चौथाऱ्यापासूनच आपण दरीत उतरायला सुरुवात करतो. या ठिकाणी दोन दऱ्या एकमेकांना छेदत गेल्या आहेत, अवकाशातून तसेच या घाटातूनही बघितले असता तो आकार ‘+’ या चिन्हासारखा दिसतो. म्हणून या दरीला नाव प्लस व्हॅली दिले गेले. दरीत उतरण्यास सुरुवात केल्यावर ठिसूळ दगडांची मालिका लागते. उतरताना वाटेत दिसणार्या मोठया दगडांमुळे सांदण दरीची आठवण होते. उजवीकडे उंच कातळकडा ठेवत आपण पुढे मार्गक्रमण करतो. पट्टीच्या गिर्यारोहकांनी या कातळ कड्यावरही प्रस्तररोहणाचा सराव केलेला दिसून येतो. तीस ते पस्तीस मिनिटांमध्ये आपण दरीत पोहोचतो. गर्द झाडीनी हा भाग नटलेला आहे. दगडांच्या कपाऱ्यांमधून वाहत आलेले पाणी बऱ्याच ठिकाणी आढळून येते. उन्हाळ्यातही या ठिकाणी पाण्याची उपलब्धता मुबलक प्रमाणात असते. झाडीमधून उजवीकडे वळून आपण एका लहानशा डोहापाशी येतो. वाहते आणि स्वच्छ पाणी असल्याने पाण्याचा तळ स्पष्टपणे दिसतो. नितळ पाण्याने मन सुखावून जाते. येथे पाणपिशव्या, बाटल्या भरून घेऊन पुढच्या महत्त्वाच्या टप्प्याकडे आपण चालू लागतो. पाण्याच्या वाटेने न जाता डोहाच्या डावीकडून झाडीतून आपण एका कड्यावर पोहोचतो. इथून खाली १०० फुटांचा एक रॅप्लिंग चा टप्पा आहे. योग्य त्या साधनांसह व प्रशिक्षाकांसह हा टप्पा उतरणे आवश्यक आहे. ८० फुटांपर्यंत दगडाच्या मदतीने व शेवटच्या २० फुटांमध्ये ओव्हरहँग असल्याने दोराच्या व्यवस्थित हाताळणीने आपण पुन्हा पाण्याच्या प्रवाहात येतो. इथे दगडांच्या सावलीत तहानलाडू भूकलाडू पोटात ढकलावेत. पाण्याच्या वेगामुळे दगडालाही कसे आकार प्राप्त होतात हे येथे पाहता येते. येथे खाली उतरल्यावर आणखी एक पाण्याचा डोह नजरेस पडतो. या पाण्याच्या सान्निध्यामुळे हा टप्पा सुखावह वाटतो. इथून पुढे असाच एक रॅप्लिंगचा पॅच आहे. या ठिकाणाहून खाली पहिले असता एक कुंड दिसते, हेच ते प्रसिद्ध देव कुंड. आता आपण ज्या मार्गाने उतरणार तो मार्ग जलप्रपाताचा आहे. व्यवस्थीत उपकरणे लावून उतरण्यास सुरुवात केल्यावर ४०-५० फुटांपर्यंत पायाला दगड लागतो, त्याच्या मदतीने आपण हळूहळू खाली उतरतो पण यापुढे दगडाने वक्राकार धारण केल्याने दोराच्या कौशल्यानेच आपण खाली सरकतो. जवळजवळ १२५-१५० फुटांचा हा पुढचा टप्पा आपल्याला सरळ देवकुंडामध्ये उतरवतो. रॅपल करत असतानाही पाण्याची संततधार आपल्या शिरावर अभिषेक करीत असते. हवेतून दिसणारे खालील दृश्य येथे येऊनच पाहण्यात मजा आहे. कुंडाच्या आजूबाजूला पावसाळ्याव्यतिरिक्त मुक्काम करता येतो. दोन्ही बाजूनी अंगावर येणारे खोलगट कडे व मध्ये साठलेले पाणी. कुंडात मनसोक्त जलविहारही करता येतो.जर मुक्काम केला तर सकाळी लवकर उठून आवरून पुढे चालण्यास सुरुवात करावी. पाण्याच्या मधूनच प्रवाहमार्गातून चालत गेल्यास सप्तकुंडापाशी आपण येतो. येथेही मुक्काम करता येईल. आजूबाजूची किर्र झाडी चालताना सुखावून जाते. या सरळ वाटेने आपण १ ते १.३० तासात भिरा गावात पोहोचतो. रस्त्याने येताना आपण भिरा धरणाच्या बाजूनेच चालत असतो. उजवीकडे घनगड, कुंडलिका दरी लक्ष वेधून घेतात. भिरा गावात उतरल्याने आपण कोकणातील रायगड जिल्ह्यात प्रवेश करतो. म्हणजेच पुणे जिल्ह्यातून प्लस व्हॅली मार्गे आपण कोकणात उतरतो. भिरा गावातून देवकुंड पर्यंतचा सोपा ट्रेक उन्हाळ्या पर्यंत करता येतो. रस्ता व्यवस्थित असल्याने वाटाड्याशिवाय सुद्धा देवकुंडापर्यंत पोहोचता येते. | |||
पोहोचण्याच्या वाटा : | |||
मुंबईतून खोपोली, पाली मार्गे आणि पुण्यातून पौड मुळशीमार्गे ताम्हिणी घाटातील डोंगरवाडी जवळ पोहोचता येते. गरुडमाचीमुळे हा भाग प्रकाशझोतात आला आहे. आदरवाडी मध्ये राहण्याची व जेवण्याची सोय होऊ शकते. ट्रेक भिरा येथे संपतो. तेथुन बसने परत येता येते. | |||
राहाण्याची सोय : | |||
राहाण्याची सोय नाही. सोबत स्लिपिंग बॅग्ज, तंबू बाळगावेत. | |||
जेवणाची सोय : | |||
वरच्या टप्प्यात आदरवाडी येथे तर शेवटी भिरा गावात शेलारमामा यांचेकडे व्यवस्था होऊ शकते. परंतु मुक्काम करायचा असल्यास शिधा सोबत बाळगावा. | |||
पाण्याची सोय : | |||
उन्हाळ्यातही पाणी उपलब्ध असते. | |||
जाण्यासाठी उत्तम कालावधी : | |||
भिरा गावातून पाऊस कमी झाल्यावर करावा. प्लस व्हॅली पाणी ओसरल्यावर हिवाळ्यानंतर कधीही करता येईल. |
मुळाक्षरानुसार इतर किल्ले: P | पाबरगड (Pabargad) | पाचाड कोट (Pachad Fort) | पाच्छापूर किल्ला (Pachhapur Fort) | पदरगड (Padargad) |
पद्मदूर्ग (कासा किल्ला) (Padmadurg ( Kasa Killa)) | पद्मगड (मालवण) (Padmagad (Malvan)) | पालचा किल्ला (Pal Fort) | पळशीचा किल्ला (Palashi Fort) |
पालगड (Palgad) | पांडवगड (Pandavgad) | पन्हाळेदुर्ग (पन्हाळघर किल्ला) (Panhaledurg) | पन्हाळेकाजी (प्रणालक दुर्ग) (Panhalekaji Fort) |
पन्हाळगड (Panhalgad) | परांडा (Paranda) | पारडी किल्ला (Pardi Fort) | पारगड (Pargad) |
पारनेरा किल्ला (Parnera Fort) | पारोळा (Parola) | पर्वतगड (Parvatgad) | पाटेश्वर (Pateshwar) |
पट्टागड (Patta) | पेब (विकटगड) (Peb) | पेडका (Pedka) | पेमगिरी(शहागड) (Pemgiri(Shahagad)) |
पेठ / कोथळीगड (Peth (Kothaligad)) | पिलीवचा किल्ला (Piliv Fort) | पिंपळा (Pimpla) | पिंपळास कोट (Pimplas Kot) |
पिसोळ किल्ला (Pisol) | प्लस व्हॅली ट्रेक (Plus Valley) | प्रबळगड (Prabalgad) | प्रचितगड (Prachitgad) |
प्रतापगड (Pratapgad) | प्रेमगिरी (Premgiri) | पुरंदर (Purandar) | पूर्णगड (Purnagad) |