प्रेमगिरी
(Premgiri) |
किल्ल्याची ऊंची : 
2657 |
किल्ल्याचा प्रकार : गिरीदुर्ग
|
डोंगररांग: चणकापूर डोंगररांग |
जिल्हा : नाशिक |
श्रेणी : मध्यम |
नाशिक जिल्ह्यातील कळवण या तालुक्याच्यस गावापासून ५ किलोमीटर अंतरावर एकलहरे नावाचे गाव आहे या गावा जवळ प्रेमगिरी किल्ला आहे. सेलबारी - डोलबारी या डोंगररांगांवर असलेल्या साल्हेर, सालोटा, मुल्हेर इत्यादी महत्वाच्या किल्ल्यांकडे जाणार्या मार्गावर आणि आसपासच्या चणकापूर डोंगररांगेवर पिंपळा, प्रेमगिरी, भिलाई सारखे छोटे टेहळणीचे किल्ले आहेत. प्रेमगिरी गडावर असलेल्या हनुमान मंदिरामुळे आजूबाजूच्या गावातील लोक मोठ्या प्रमाणावर दर्शनाला येतात. त्यामुळे किल्ल्यावर जाणारी वाट मळलेली आहे. |
|
पहाण्याची ठिकाणे : |
एकलहरे गावाच्या मागेच प्रेमगिरी किल्ला आहे. गावाची वस्ती पार करुन पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता किल्ल्याच्या दिशेला जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते. या टाकीपासून किल्ल्यावर जाण्यासाठी तीव्र चढाचा पण घसार्याची (स्क्री) पायवाट आहे. या पायवाटेच्या शेवटच्या टप्प्यात २० फ़ूटाचा कातळ टप्पा चढून जावे लागते. किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट मळलेली आहे. कच्च्या रस्त्याने प्रेमगिरीच्या डोंगरसोंडे पर्यंत चालत जाऊन डोंगरसोंडेवरुन गडावर चढाई करायची. या मार्गात शेवट़च्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. किल्ल्याचे पठार विस्तिर्ण आहे. किल्ल्यावर हनुमानाचे मंदिर व पाण्याची कोरडी टाकी आहेत. याशिवाय गडावर कोणतेही अवशेष नाहीत. गडफ़ेरी करण्यासाठी अर्धा तास पुरतो. |
पोहोचण्याच्या वाटा : |
मुंबई - पुण्याहून नाशिकमार्गे कळवण हे ७३ किलोमीटर वरील तालुक्याचे गाव गाठावे. कळवनहून ५ किलोमीटरवर एकलहरे हे किल्ल्याच्या पायथ्याचे गाव आहे. एकलहरे गावाच्या मागेच प्रेमगिरी किल्ला आहे. गावाची वस्ती पार करुन पुढे गेल्यावर डाव्या बाजूला एक कच्चा रस्ता किल्ल्याच्या दिशेला जातो. या रस्त्याने ५ मिनिटे चालत गेल्यावर एक पाण्याची टाकी लागते. या टाकीपासून किल्ल्यावर जाण्यासाठी तीव्र चढाचा पण घसार्याची (स्क्री) पायवाट आहे. या पायवाटेच्या शेवटच्या टप्प्यात २० फ़ूटाचा कातळ टप्पा चढून जावे लागते. किल्ल्यावर जाणारी दुसरी वाट मळलेली आहे. कच्च्या रस्त्याने प्रेमगिरीच्या डोंगरसोंडे पर्यंत चालत जाऊन डोंगरसोंडेवरुन गडावर चढाई करायची. या मार्गात शेवट़च्या टप्प्यात कातळात कोरलेल्या पायर्या आहेत. खाजगी गाडीने नाशिक सप्तशृंगी मार्गे (७३ किलोमीटर) प्रेमगिरी किल्ल्याच्या पायथ्याशी एकलहरे गावात पोहोचता येते. |
राहाण्याची सोय : |
किल्ल्यावर राहाण्याची सोय नाही. |
जेवणाची सोय : |
किल्ल्यावर आणि गावात जेवणाची सोय नाही. |
पाण्याची सोय : |
किल्ल्यावर पिण्याचे पाणी नाही. |
जाण्यासाठी लागणारा वेळ : |
एकलहरे गावतून गडमाथ्यावर पोहोचण्यास एक तास लागतो. |
जाण्यासाठी उत्तम कालावधी : |
जुलै ते मार्च |